दिवाळी अंक २००९ - पूर्वतयारी

Submitted by admin on 27 July, 2009 - 14:38

नमस्कार मायबोलीकर

यंदा मायबोली दिवाळी अंकाचे १०वे वर्ष. गेली ९ वर्षे आपल्या सहकार्यामुळेच दरवर्षी उत्तमोत्तम अंक प्रकाशित होत आहे.
सांगायला आनंद होत आहे की या वर्षीच्या दिवाळी अंकाच्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी "स्वाती आंबोळे" यांनी घेतली आहे. त्यांच्या संपादक मंडळात यंदा " कौतुक शिरोडकर, चिनूक्स, गजानन देसाई, मृण्मयी, परागकण, फ, ट्युलीप, विनय देसाई" यांनी सहभाग घेतला आहे. सर्वाना या कामाबद्दल शुभेच्छा.

संपादक मंडळाला जशी आवश्यकता लागेल तसं मदतीचं आवाहन करतीलच. तसेच आपल्या काही सूचना असल्यास इथे लिहाव्यात.

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही... जोरदार संपादक मंडळ आहे की यावेळी पण...
मंडळाला अनेक शुभेच्छा. यावेळीसुध्दा एकदम दर्जेदार अंक वाचायला मिळणार म्हणजे... Happy

लई भारी बगा! येकदम बेश्ट!!
आता कायतर लिवायलाच पायजेल!

अरे वा! यंदा तयारी लवकर सुरु झाली की Happy
अभिनंदन, सगळीच दिग्गज मंडळी आहेत संपादक मंडळात; अंक जोरात होणार म्हणजे. Happy

वा वा! अभिनंदन सर्वांचेच. दणदणीत मंडळ आहे.

अभिनंदन!!

मंडळ स्थापन झालयं! मंडळी लिहायला लागली (निदान कट्-पेस्टेबल) ..! ही दिवाळी कधी येणार? Happy

सर्व संपादकांचे अभिनंदन आणि ह्या वर्षीपण दर वर्षीसारखाच दर्जेदार अंक निघावा ह्यासाठी शुभेच्छा..

काही मदत हवी असल्यास करण्याची तयारी आहे..

Pages