दिवाळी अंक २००९ - पूर्वतयारी

Submitted by admin on 27 July, 2009 - 14:38

नमस्कार मायबोलीकर

यंदा मायबोली दिवाळी अंकाचे १०वे वर्ष. गेली ९ वर्षे आपल्या सहकार्यामुळेच दरवर्षी उत्तमोत्तम अंक प्रकाशित होत आहे.
सांगायला आनंद होत आहे की या वर्षीच्या दिवाळी अंकाच्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी "स्वाती आंबोळे" यांनी घेतली आहे. त्यांच्या संपादक मंडळात यंदा " कौतुक शिरोडकर, चिनूक्स, गजानन देसाई, मृण्मयी, परागकण, फ, ट्युलीप, विनय देसाई" यांनी सहभाग घेतला आहे. सर्वाना या कामाबद्दल शुभेच्छा.

संपादक मंडळाला जशी आवश्यकता लागेल तसं मदतीचं आवाहन करतीलच. तसेच आपल्या काही सूचना असल्यास इथे लिहाव्यात.

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा. स्वाती आणि मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा.. !

अरे वा संपादक मंडळाचे अभिनंदन. काही करण्याजोगे काम असेल तर आवश्य सांगा.

मंडळाचे अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा!
हॅप्पी दिवाळी. Happy

वा वा! संपादकमंडळीत माझे आवडते लेखक /चित्रकार असल्याने दिवाळी अंक नेहमीसारखाच देखणा होणार यात शंका नाही. आता या अंकाच्या प्रतिक्षेत.

वा वा स्वाती आणि मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा Happy करण्यायोग्य काही काम असल्यास जरुर सांगा.

सही, सगळे मायबोलीचे यशस्वी लेखक/कलाकार आहेत संपदक मंडळात, अभिनंदन !

शुभेच्छा! मी करण्यालायक काही काम असेल तर जरूर कळवा .. Happy

अरे वा! मस्तच.. दशकपूर्ती ची तयारी लवकर सुरू झालेय हे खूप चांगलं आहे. सगळ्यांना भरप्पूर शुभेच्छा, काही अगदी कसलीही मदत हवी असेल तर सांगालच.

सर्वांचे अभिनंदन! काम असल्यास कळवणे.

अरे व्वा! दिग्गज मायबोलीकरान्चे सम्पादक मण्डळ आहे की! Happy छान!
या वेळेस्(तरी) मला काही लिहीता येईल का अन्कात? Sad अस वाटत की आत्तापासूनच सुरुवात करावी! Happy यस्जीरोडवर वाहवुन टाकण्यापेक्षा स्वगते डेस्कटॉप वर एकत्रित करावीत! Happy
बघू........!
बर एकदोन शन्का हेत
पूर्वी, रोमन मधे लिहून ठेवल तरी चालायच (नन्तर देव टॅग वापरला जायचा), सध्याही रोमनमधे चालेल का? की नाही?
बर, नसेल चालणार तर, एरवी वर्ड फाईल मधे लिहीताना बरहा वापरुन लिहील जात! अनुभव असा हे की तेथिल मजकुर कॉपी करुन इथे कुठे टाकला तर नीट येतोच असे नाही, कारण वर्ड मधे अ‍ॅन्सी फॉरमॅटमधे बरहा वापरायला लागते तर इथे वेबपेजवर युनिकोड मधे! तर याबद्दल काय सूचना देऊ शकाल?
बरहामधे मजकुर तयार केलेला चालेल का? कशात करावा? वर्ड्/नोटपॅड की कसे? काय काय काळजी घ्यावी?

चांगलच जोरदार मंडळ आहे की ह्यावेळी पण.. ह्या वेळी किती फुल्यांची कथा द्यावी? Proud

संपादक मंडळाचे अभिनंदन...

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

मायबोलीवरच लिहिण्याची सोय आहे की. सध्या लिहायला सुरूवात करून 'अप्रकाशित' म्हणून सेव्ह करू शकता. दिवाळी अंकासाठी लेखन सबमिट करायची सोय झाली, की तेच कट-पेस्ट करू शकाल.

बरहातच लिहायचे असेल, तर बरहा डाऊनलोड केलेत, की बरहा डॉक्यूमेन्ट उघडू शकाल, त्यात लिहा. वर्ड किंवा नोटपॅडमध्ये नको. ते लेखन एक रफार सोडला, तर जसेच्या तसे पेस्ट होते इकडे. शुद्धलेखन तपासणी करताना ते दुरूस्त करता येईल.
---------------------------------------------
नेकी कर और पानीमें डाल.

मंडळाचे स्वागत. काही काम असेल तर नक्की सांगा.

अरे वा!! यंदाचा दिवाळी अंक सर्वोत्तम होणार ह्यात शंकाच नाही.

संपादक मंडळाला भरघोस शुभेच्छा!!

नवीन मंडळाचे स्वागत व दर्जेदार अंकासाठी खुप शुभेच्छा.. Happy

---
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा, सुंदर साजिरा, श्रावण आला..!

इंटरनेट नेहमी उपलब्ध होऊ शकत नाही म्हणून - किंवा अन्य कारणांनी - रोमनमध्ये ऑफलाईन लेखन करावे लागते, तेव्हा असे लेखन पाठवण्यापूर्वी खालील दुवा वापरून त्याचे देवनागरिकीकरण करता येईल. आणि त्यातल्या चुका सुधारून मग पाठवता येईल.

http://www.maayboli.com/jslib/html/dvedt.html

यापेक्षा दुसरा पर्याय असेल तर अ‍ॅडमिन सांगतीलच.

LT, तू हेच विचारत आहेस ना?

----------------------------------------------
ऐसीयांचा संग देई नारायणा | ओलावा वचनां जयाचिया ||

ओके पीएस्जी, नोटेड Happy
जीड्या, हो रे, तसच काहीसे! Happy ते पण अन वरील बरहाचा पर्याय देखिल!
धन्यवाद

खरं तर मायबोलीवर इथेच लिहून WordPad मध्ये Cut-Paste करता येतं. त्यामुळे चुका होणार नाहीत आणि लगेच दुरुस्त करता येतील. Gmail Account असेल तर असे Document , Google Doc म्हणून पण Save करता येतात. त्यामुळे कुठूनही Login केलं तर आपलं Document मिळू शकेल...

विनय Happy

संपादक मंडळाचे मनापासून अभिनंदन...
काही मदत हवी असेल तर जरूर सांगा.

------------------------------------------------------------------------
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

मंडळाचे अभिनंदन.
मदत करायला आवडेल.

मंडळाचे अभिनंदन आणि खुप सार्‍या शुभेच्छा!!

ऑफ लाईन देवनागरी लिखाणासाठी ' ओंकार' ह्यांच्या 'गमभन' सुविधेचा फायदा घेउन मी एक 'गमभन पॅड' बनविले आहे. ते इथून उतरवून घेउ शकाल - ' गमभन पॅड '

ह्याबाबतची अधिक चर्चा इथेही वाचता येईल.

संपादक मंडळाचे अभिनंदन आणि आणखी एका दर्जेदार दिवाळी अंकासाठी शुभेच्छा !ÿÿ

संपादक मंडळाचे अभिनंदन!

मंडळी, तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद. Happy

त्या मिळाल्यामुळे हुरूप आलाच, पण परंपरेला साजेसा आणि तुम्हाला सर्वांना आवडेल असा अंक तयार करायच्या जबाबदारीची जाणीवही ठळक झाली.

तेव्हा त्या दृष्टीने काही सूचना असतील तर आम्हाला जरूर सांगा. इथे या धाग्यावर लिहू शकता किंवा sampadak आयडीच्या विचारपुशीत किंवा संपर्कात लिहू शकता.
दिवाळी अंकासंदर्भात काही प्रश्न असतील तर तेही अवश्य विचारा.

आम्हाला मदतीची आवश्यकता वाटेल तेव्हा आम्ही तुम्हाला हक्काने सांगूच.

कळावे लोभ असावा,
- संपादक मंडळ,
हितगुज दिवाळी अंक २००९

Pages