तीन तळटीपा

Submitted by slarti on 24 July, 2009 - 06:17

माझ्या एका जर्मन मित्राच्या कवितेचा मी मराठीत अनुवाद केला. मित्राला मराठी येत नाही. अनुवादाखाली मित्राने पुढील तीन तळटीपा दिल्या (अर्थात, त्याही अनुवादित) :
(१) कवितेचा अनुवाद केल्याबद्दल मी स्लार्टीचा ऋणी आहे.
(२) वरील तळटीपेचा अनुवाद केल्याबद्दल मी स्लार्टीचा ऋणी आहे.
(३) वरील तळटीपेचा अनुवाद केल्याबद्दल मी स्लार्टीचा ऋणी आहे.

प्रश्न असा की, हा प्रकार अनंत सुरू राहू शकत असताना मित्राने एवढ्याच तळटीपा का दिल्या असतील ?
(अनंत सुरू राहू शकत असल्यानेच कुठेतरी थांबायचे म्हणून इथे थांबला हे बरोबर उत्तर नाही Happy त्याच्या लहरीचा इथे संबंध नाही.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय की..
इन्डक्शन मधे असंच करून दाखवतात का? Uhoh

एव्हढ त्रिवार बजावून सांगितल्यावर समजेल अस गृहित धरल असेल बिचार्‍याने. Happy
किंवा थकला असेल बिचारा
किंवा कविता दोन ओळींची असेल तर तळटिपा तीनपेक्षा जास्त बरोबर दिसतील का ?

भाषा येत नसेल तरी खालच्या दोन ओळी शेम टू शेम आहेत हे आंधळा सोडून कोणीही सांगेल.
तात्पर्य: तो जर्मन कवी आंधळा नाही. Light 1

कवितेचा अनुवाद केल्याबद्दल त्याने एका तळटिपेद्वारे धन्यवाद दिले -> तो कवितेबद्दलच्या ऋणातून मुक्त झाला
त्या धन्यवादाच्या तळटिपेचा अनुवाद केल्याबद्दल धन्यवाद दिले -> या ऋणातूनही तो मुक्त झाला

अन शेवटी धन्यवादाच्या तळटीपेच्या अनुवादासही धन्यवाद कळविल्यानन्तर, त्याचे उद्दीष्ट पूर्ण झाल्यावर जरी अनन्त काळपर्यन्त चालू रहाणार असेल, तरी त्याचा धन्यवाद देण्याचा व तो लोकान्पर्यन्त पोचविण्याचा मूळ हेतू सफल झाल्याने तो थाम्बला

किन्वा अगदी थोडक्यात सान्गायच तर, कवितेच्या अनुवादासहित तळटिपेच्या अनुवादास देखिल धन्यवाद देतोय हे वाचकान्पर्यन्त पोचविण्याचे उद्दीष्ट पहिल्या तीन टिपान्मधे पूर्ण होते म्हणून पुढे नाही!
मूळात धन्यवाद देणे हा उद्देश नसून, देत असलेले धन्यवाद तळटीपेस देखिल देतो हे, हे वाचकान्च्या मनावर ठसविण्याचे उद्दीष्ट जिथे पूर्ण झाले तिथे तो थाम्बला!!

अमित Happy पण जर्मन कवी आंधळा असता तरीही त्याने तीनच लिहिल्या असत्या Happy

    ***
    प्रश्न पडला, उत्तर मिळाले
    उत्तर मिळता ढळला तोल,
    प्रश्नाच्या अस्तित्वाचे हेच मोल

    वरील तळटीपेचा अनुवाद केल्याबद्दल मी स्लार्टीचा ऋणी आहे.
    या वाक्याचा अनुवाद स्लार्टीला एकदाच करावा लागला आणि त्यासाठी एकदाच धन्यवाद दिले(क्र. ३ चे धन्यवाद)
    हे वाक्य(जर्मन लेखकाने) परत लिहिल्यास स्लार्टीला पुन्हा अनुवाद करावा लागणार नाही, कारण तो एकदा केलेला आहेच.

    मुलात जर्मन लोकाना सर्व तीन्दा बोलायचि सवय असते.

    माझ्यामते इथे स्लार्टीने कशा कशाचा अनुवाद केला हे महत्वाचे. स्लार्टीने कवितेचा अनुवाद केला, त्याबद्दल धन्यवाद दिले. ते धन्यवाद मराठी वाचकांपर्यंत कसे पोचतील? म्हणून स्लार्टी ने त्या तळटीपेचा अनुवाद केला. म्हणून धन्यवाद दिले. हे धन्यवाद कसले म्हणून स्लार्टीने त्याचा अनुवाद केला त्याबद्द्ल धन्यवाद दिले. इथून पुढे unending loop सुरू होईल. तो टाळण्यासाठी स्लार्टीने सुद्धा अनुवाद केला नाही; आणि कवीने सुद्धा धन्यवाद दिले नाहीत.

    शरद
    .............................
    "तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
    बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
    ............................

    चक्रमादित्याचे लॉजिक बरोबर वाटते, सेम शरदनेही सान्गितलय वेगळ्या शब्दात Happy

    >>>प्रश्न असा की, हा प्रकार अनंत सुरू राहू शकत असताना मित्राने एवढ्याच तळटीपा का दिल्या असतील ?
    सारखं सारखं त्याच झाडावर नको म्हणुन... Wink
    ----------------------------------------
    मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...

    नंतर त्याला ऋणी वगैरे वाटलं नसेल! Proud
    उलट इतक्या ओळींचा (पुनःपुन्हासुद्धा) अनुवाद करू दिल्याबद्दल स्लार्टीनेच आता ऋणी व्हायला हवं असं त्याला वाटलं असेल. Proud

    -----------------------------------------------
    I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

    क्रमांक ३ चे धन्यवाद दिल्यानंतर तो पुढचे धन्यवाद मराठीत देऊ शकतो. त्याचा परत अनुवाद करायची गरज नाही.
    ------------------------------------------
    प्यार की कसम है, न देख ऐसे प्यार से

    खरतर २ दिल्यानंतर (तळटीपा Happy तो थांबला असता पण even numbers गोष्टी कोणाला देत नाहीत ना.
    उदा. पहा लग्नात आहेर २०, ५० असे न करता २१, ५१ असे करतात की नाही? Happy

    सकाळ पासुन हि मी इथे २-३ दा आले ... डोक चालवायला नाही इथले मजेशीर प्रतीसाद वाचायला Happy

    प्रकार अनंत सुरू राहू शकत असताना मित्राने एवढ्याच तळटीपा का दिल्या असतील ?>>>>> माझ्या मते हा ज्याचा त्याचा वै. प्रश्न आहे कुठे थांबायच कुठे नाही Happy

    मला पन्नाचे उत्तर आवडले. Happy

    मित्राला वेळीच कळल की तुम्ही निव्वळ टाईमपास करीत आहात तेव्हा उगाच कशाला आपला वेळ वाया
    घालवावा ?

    कवि ने तीन गोष्टी केल्या व अनुवादकाने त्या तिन्ही गोष्टीचा अनुवाद केला.
    प्रथम कवि ने कविता पाडली व अनुवादकाने त्याचा अनुवाद केला
    द्वितीय कवि ने अनुवादका चे आभार मानले व अनुवादकाने त्या तळटीपेचा अनुवाद केला.
    तृतिय कवि ने तळटीपेचा अनुवाद केल्या बद्दल आभार मानले व अनुवादकाने आता ह्या द्वितीय तळटीपेचा अनुवाद केला
    आता कवि ने तिसरी तळटीप लिहिली जी दुसरी प्रमाणेच होती. अनुवादकाने तिसरी तळटीप् द्वितीय तळटीपे सारखीच असल्यामुळे तिचा पुन्हा अनुवाद करायची गरज भासली नसल्या मुळे त्याने तृतीय तळटीपेचा अनुवाद नव्याने केलाच नाही. हे घडल्यामुळे कविला चौथी तळटीप लिहिण्याची गरजंच् पडली नाही.
    थोडक्यात कवि आणि अनुवादक दोघे ही शहाणे असावे मात्र कवि कृतज्ञ देखील आहे. आणि अनुवादक बिनडोक नक्की नाही.

    जे लोक
    १. पहिले आभार कवितेच्या अनुवादाकरता.
    २. दुसरे आभार 'कवितेच्या अनुवादाच्या अनुवादाकरता'
    ३. तिसरे आभार 'आभाराच्या तळटीपेच्या अनुवादाकरता'

    चौथे आभार मानल्यास 'आभाराच्या तळटीपेच्या अनुवादाकरताचे आभार' ह्याचीच पुनरुक्ती होत राहिल म्हणून थांबविले

    ह्या अर्थाचं बोलले - मी त्यांच्या बाजूने..

    बाकीच्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेतच!

    spoiler alert:

    ;;;;;;;

    ...

    ///

    ,,,

    ह्ह्ह

    ल्ल्ल

    तिसरी टीप भाषा येत नसुन त्याने जशीच्या तशी उतरवली (घोटली). स्लार्टीचा त्याच्याशी संबंध नव्हता.

    पहिली तळटीप कवितेच्या अनुवादाबद्दल आभार
    दुसरी "वरील तळटीपेचा" अनुवाद केल्याबद्दल
    दुसर्‍या तळटीपेचा अनुवाद केल्याबद्दल आभार मानन्याकरता तळटीपेचा आशय दुसर्‍यातळटीपेप्रमाणेच असल्याने कवीने दुसरी तळटीप copy-paste केल्यास त्याला आता परत आभार मानन्याची गरज भासली नसनार Happy

    प्रतिक्रिया भन्नाटच Happy