वेळ असा वाचवला जाऊ शकतो!

Submitted by नंदिनी on 22 July, 2009 - 02:46

घरामधे काही काही कामं खूप कंटाळवाणी असतात. कित्येक कामांना भरपूर वेळ लागतो. आधीच्या पिढीमधल्या बायका सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करतात. आताच्या आमच्यासारख्या मुलीना ते जमणं शक्य नाही. उलट अर्ध्या तासांत पूर्ण स्वयंपाक ही काळाची गरज आहे. तशीच उपकरणं देखील उपलब्ध आहेत. या बीबीवर अशाच "वेळ वाचवण्याच्या" उपायांवर चर्चा करावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला स्वयंपाक करायला आवडतो आणि तो लवकर पण होतो.. पण त्यानंतर ते ओटा आवरण फार फार बोरींग.. अगदी कंटाळवाण असत माझ्यासाठी..

यासाठी टिप्स असल्या तर सांगा माझ्यासाठी..

-योगिता

दाण्याचे कुट करायचे हाताने फिरवायचे यंत्र मिळते तसेच कांदा , सिमला, कोबी चिरण्यासाठी एक यंत्र मिळते. त्याने लगेच चिरुन होतो कांदा. फक्त ४ तुकडे करुन टाकायचा.

मला कांदा आणि टोम्याटो क्रशरचे फारच फन्टास्टिक यन्त्र मिळाले आहे. अक्षरशः दोन सेकन्दात कान्दा व टोम्याटो चे खूप बारीक म्हनजे ४-५ मिमीचे तुकडे मिळतात . टोमॅटोचा तर रसही निघत नाही क्रश करताना. तेव्हापासून सर्वत्र कान्दा आणि टोमॅटोच वापरतो मी Proud

अय्या पिल्लु छोटा, एकेकाळी मलाही त्या ओटा आवरणे प्रकाराचा कंटाळा यायचा.

पण आता मी जे करते ते तुला सांगते,

१. प्रत्येक गोष्ट काम झाल्याबरोबर जागेवर ठेवते. नाहीतर ओट्यावर पसारा वाढत जातो आणि मग नंतर आवरायला कठिण जाते. अगदी मसाल्याच्या डब्यापासुन छोट्या चमच्या पर्यंत एक एक गोष्ट मी लगेच जागेवर पाठवते Happy
२. दुसरे म्हणजे स्वयंपाक करतांनाच चारपाच्दा ओटा पुसुन घेते. सिंकजवळच एक हँडवॉशही ठेवलेय (ओटा पुसल्याबरोबर हात धुण्यासाठी). पोळ्या केल्या की लगेच पुसले, भाजी कापली की पुसले ई.ई.
३. स्वयंपाक झाला की ओट्यावर एक ही स्वयंपाकाशी संबंधित भांडे राहु द्यायचे नाही सगळे टेबलवर ठेवुन एकदा फायनल ओटा पुसला की झाले Happy

...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...

रॉबिन अंकल फोटु टाका ना कांदा आणि टोम्याटो क्रशरचा इथे...

पिल्लु शेगडी किंवा ओट्यावर पदार्थ बनवताना डाग पडला तर ओला असतानाच पुसत जा शक्यतो. जर डाग सुकला तर लवकर निघत नाही. अगदीच शक्य नसेल तर आवरताना ओट्यावर आणि शेगडीवर पाणी मारुन पुसुन घे.एखादा पदार्थ बनवलास की लगेच नको असलेली भांडी सिंक मध्ये किंवा शेल्फमध्ये टाकत जा. त्याने शेवटी आवरताना जास्त भांडी पडणार नाहीत. ( ओटा आवरायचं काम माझ्याचकडे असतं त्यामुळे इतका अनुभव. Wink )
-------------------------
अंधेरा मांगने आया उजाले की भिख हमसे,
अपना घर ना जलाते तो क्या करते हम.

अरे वा, माझा आवडता विषय आहे .[:)] पूर्वीच्या मायबोलीवरच्या बीबी ची लिंक इथे द्यायला हवीये , मला तिथल्या टीप्सचा अजून छान फायदा होतो . माझ्या काही टीप्स लिहिते .
१. फ्रीझ / डीप फ्रीझ केलेल्या डब्यांवर तारखा लिहिणे आवश्यक आहे . कोणती गोष्ट वेळेत संपायला हवीये , ह्याचे प्रायोरिटायझेशन होण्यासाठी .
२. चिंचेचा कोळ काढून , त्यात हवा असेल तर गूळ किंवा चटणी म्हणून वापरायचे असल्यास साखर घालून मायक्रोवेव्ह मधे शिजवून घ्यावा. साधारण ३० मि. शिजवणे आवश्यक . म्हणजे पाणी बर्‍यापैकी आटून छान कोळ तयार होतो , जो आमटी , भाजी , माश्यांचे मॅरिनेशन ह्यासाठी वापरता येतो . ( हे काम गॅसवर केल्यास तो कोळ आटायला लागला की बुडबुडे उडून किचन प्लॅटफॉर्म खराब होण्याची शक्यता असते , त्यासाठी मायक्रोवेव्ह उत्तम . ) ही पद्धत माझ्या सासूबाईंची .
३. काकड्यांच्या सीझन मध्ये काकडी चोचवून / किसून ठेवणे , हवी तेव्हा कोशिंबीर छान होते .
४. कांद्याची पात आणल्यावर लगेचच स्वच्छ धूवून , नीट पुसून , चिरून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावी . पटकन वापरता येते आणि इतर गोष्टींना वास लागत नाही .
५. कणिक भिजवून ठेवणे / पालक पुरी / टोमॅटो पुरी / ठेपला ह्याचे मिश्रण १ आठवड्यात करून संपेल एव्हढेच भिजवून ठेवणे .
६. बटाटे उकडून ठेवणे .
७. जुन्या मायबोलीवरच्या मनुस्विनीच्या टीप्स प्रमाणे फिश , चिकन एकावेळी लागेल एव्हढे मॅरिनेट करून , वेगवेगळ्या डब्यात घालून मी ठेवते . हवे तेव्हा वापरता येतात , फुकट काहीच जात नाही .
८. सॅलड्स खायची आवड असेल , तर पोर्शन नुसार गाजर किसून , मुळा किसून , कोबी चिरून , बीट उकडून आणि किसून , झिपलॉक्स् च्या बॅग्समध्ये ठेवावेत . आवडीनुसार किंवा मूड नुसार हवे ते सॅलड बनवता येते .
९. मी हल्ली आठवड्याचा कांदा सुद्धा चिरून डीप फ्रीझमध्ये ठेवते , बारीक आणि उभा असा दोन पद्धतीचा . ( कॉमेडी वाटेल हे काहींना , पण मला कांदा खूप लागतो आणि रोज चिरत बसून वेळ फुकट जातो , हे माझे प्रामाणिक मत आहे . )
१० . ओले खोबरे , कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची चटणी मी करून ठेवते . कधी चटणी म्हणून तर कधी भाजीचा मसाला म्हणून , कधी सँडविच स्प्रेड म्हणून वापरता येते .
११. काजू , उकडलेला कांदा , खसखस , मगज बीज अशी पांढरी मसाल्याची पेस्ट करून ठेवता येते .
१२. टोमॅटो , आले , लसूण , कांदा असे सगळे तेलात परतून , हवा तो तयार मसाला जसे गरम मसाला , पावभाजी मसाला , चिकन करी मसाला घालून ही पेस्ट तयार ठेवायची . भाजीत किंवा डाळी शिजवून त्यात हा मसाला घालून फार चविष्ट लागते .
१३. पास्ता , पिझा आवडत असल्यास त्यांचे सॉसेस सुद्धा करून ठेवता येतील . हव्या त्या किंवा मुले ज्या भाज्या खात नाहीत , त्या घालून सॉस बनवता येतील .

आत्ता एव्हढेच आठवतेय , अजून आठवले की लिहिते .

मी स्वतः अभ्यास , जॉब करत असूनही ,रोज संध्याकाळी , भात आमटी / वरण , पोळी भाजी आणि कोशिंबीर ( जमल्यास स्वीट डिश Happy ) एव्हढा सगळा स्वयंपाक आम्हांला तिघांना आवडत असल्याने हा सगळा खटाटोप . हे सर्व एकदा करून ठेवले की अक्षरश: १ तासात स्वयंपाक होतो . हल्लीच्या वेगवान जीवनात आपल्या तब्येतीकडे आपण लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे , पूर्वी आई सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवत असे , जे इकडे होत नाही . म्हणून एकच सांगणे आहे की खाण्याकडे दुर्लक्ष किंवा शॉर्टकट अजिबात नको . [:)]

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/138753.html?1209144766

अगदी अगदी पिलू. पसरलेला ओटा पाहिला की डोक्यात लाल दिवा लागतो.
प्रिन्सेसला अनुमोदन.पडू दिले की नंतर जाम कंटाळ येतो.

रॉबिन कुठले हे यंत्र ? (आता विळी म्हणू नका) Proud
संपदा- पोस्ट एकदम आवडले.

वा मस्त टिप्स!

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

लसूणाच्या पाकळ्या सुट्ट्या करून १० सेकंद मायक्रोवेव्ह मधे ठेवणे.इकडच्या कूकिंग शो मधे पाहिलेली लसूण सोलायची टिप..पण ही फक्त जाड पाकळ्यांचा अमेरिकन लसूण सोलतानाच कामी येते हा मागील भारत फेरीमधिल स्वानुभव.

या उपरिनिर्दिष्ट यंत्राने मी कान्दा व टोम्याटो क्रश करून फ्रीझ्मध्ये ठवतो. फोटो टाकतो.

एक महत्त्वाची टीप- आळस नको!
कितीही कंटाळा आला की रोजचे काम रोज व्हावेच.
मी चिरलेल्या भाज्या आणते- एस्प. गवार, घेवडा वगैरे.. अत्यंत कंटाळवाणं काम- गवार मोडणे अन् मेथी निवडणे Sad
तसेच, दळण- माझ्या कणिकेच्या डब्याची री-ऑर्डर लेव्हल मी ठरवलेली आहे Happy तिथे कणिक आली, की पुढचं दळण द्यायचं. हेच डाळीचं पीठ, तांदूळ पिठीबद्दल. याने आयत्या वेळची धावपळ वाचते.
रवा, दाणे भाजणे -हे भाजी टाकली फोडणीला की दुसर्‍या गॅसवर चढवायचे. आपले लक्षही रहाते अन् कामही होते.
लोणचे, साखरांबे सीझनला जमले तर करावेत. नाही जमले, तर विकत आणावेत. हेच चटणीलाही लागू. असते सोपीच करायला, पण विकत आणली, तर गिल्ट नको. पोळीला बरं असतं, काहीतरी. आईने जन्मात न केलेल्या बर्‍याच गोष्टी आपण करतो, त्यात हीही Happy

रैनाचा मंत्र- प्रायॉरटाईज. जिथे लक्ष पाहिजे, तिथे द्यायचेच. प्रत्येक ठिकाणी नाही दिले तरी चालेल, असे स्वतःलाच समजावायचे. बर्‍याच छोट्या गोष्टी- अनुभवाने, कामाच्या अंदाजाने होतात, येतात.

संपदाचेही पटले- थोडे कष्ट आहेत. सतत अ‍ॅलर्टवर रहावं लागतं, हेही खरं. पण तरीही खाण्यात समझौता नकोच. थोड्या प्लॅनिंगने सगळे जमते.

आपल्या सगळ्यांनाच ऑल द बेस्ट Happy
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

एक महत्त्वाची टीप- आळस नको!

>>>

याला काय अर्थ आहे. सगळं घोडं तर तिथं पेण खातय ना! म्हणून तर या टिप्स चा उपद्व्याप. आळस आणि आराम कायम ठेवून झटपट उरकेल अशाच टिप्स हव्या आहेत. उगीच सुविचार आणि उपदेश नको Proud

आळस आणी आराम पेक्षा मला वाटतं घड्याळाचे काटे जास्त महत्वाचे आहेत. Happy

पिल्लू छोटा, मी ओटा लगेच पुसून घ्याय्ची एक टीप दिलेय ती बघ. मी भांडी पण लगेच घासून पुसून जागच्या जागी ठेवते. किचन्मधे भांड्याचा ढीग दिसला की मला कसं तरी व्हाय्ला लागतं. Happy

कांदा कापून फ्रीझमधे ठेवल्यास त्याला एक प्रकारचा वास येतो असं मला वाटतं. त्यामुळे ते मी नाही करत. Sad

मी प्रत्येक भाजी/आमटी कशी करायची कृती लिहून ठेवलेली आहे. सकाळच्या वेळेला ती कृती उघडूनच मी स्वयपाकाला सुरुवात करते. (यामुळे काही विसरायचा प्रश्न येत नाही.) तसेच पूर्वतयारी नीट करता येते. उदा. डाळ अथवा चिंच भिजत घालणे.
--------------
नंदिनी
--------------

मी वर लिहायला विसरले , कांदा कापून मी फ्रीझर मध्ये ठेवते , फ्रीझमध्ये नाही . [:)]

फ्रीज मधे इतक्या बचका भर वस्तु ठेवल्यावर वेळेवर सापडतात का? की शोधण्यामधे वेळ घालवायचा? दही, दुध, आणी इतर भाज्या कुठे ठेवायच्या ???

टपरवेअरचा एक डबा मिळतो दांडा असलेला , फ्रीझमधे कुठेही अडकवता येतो. त्यात ठेवला तर नाही येत वास. पण मी खुप नाही ठेवत . रात्री चिरुन सकाळी वापरते. आणि कांदा आणी टोमेटो एकत्र नाही ठेवत.
रात्रीच कांदा , मिरच्या चिरुन ठेवायचे. पोळी उरली तर रात्रीच मिक्सरवर काढुन ठेवायची. नाहीतर ब्रेडचे तुकडे.
भात उरला असेल तर तो मोकळा करुन ठेवते. उपमा असेल तर रवा भाजुनच ठेवलेला असतो.
सकाळी फक्त एक फोडणी आणी एक वाफ काढली की ५ मिनटात नाश्ता तयार.
हे नसेल काही तर रात्रीच कणीक मळताना पराठ्याची पण कणीक मळुन ठेवायची ( मेथी , पालक किवा टोमेटो प्युरि, ओवा , मीठ , हळ्द आणि तिखट घालुन).
किवा डोस्याचे पीठ भिजवायचे सकाळपर्यंत आंबते . सकाळी डोसे घालायचे.

बाकी चटण्या वगैरे ठीक आहे, पण भाज्याही आदल्या दिवशी किंवा आठवड्याच्या चिरुन? Uhoh
अश्या फार काळ चिरून ठेवू नये म्हणतात.. Sad

कांदा कापून फ्रीझमधे ठेवल्यास त्याला एक प्रकारचा वास येतो असं मला वाटतं. त्यामुळे ते मी नाही करत.

>>>>
फ्रीजम्ध्ये एक प्रकारचा वास येतो, पण बाहेरही त्याला 'दुसर्‍या' प्रकारचा वास येतच असतो. आणि खाल्ल्यानन्तर खाणाराच्या तोंडाचा एक 'तिसर्‍या' प्रकारचा वास येतच असतो . Proud

तात्पर्य काय कांद्याच्या वासापासून तुमची सुटका नाही. Proud Proud

हे भाज्या घाऊक कापून फ्रीजमद्ये ठेवणे मलाही जरा अनैसर्गिकच वाटते. कारण फाईन केमिकल्सच्या स्वरूपात असलेली विटॅमिनसारखी द्रव्ये हवेच्या सम्पर्काने डिजनरेट होण्याची शक्यता नाकारता येत ना

ही.आणि चवीतही फरक होत असावा. केवळ वेळेकडे पाहून हे सॅक्रिफाईस करण्याची तयारी पाहिजे.

फ्रीज मधे इतक्या बचका भर वस्तु ठेवल्यावर वेळेवर सापडतात का? की शोधण्यामधे वेळ घालवायचा? दही, दुध, आणी इतर भाज्या कुठे ठेवायच्या ???
>>>
अहाहा , आमच्या घरचा फ्रीज तर इतक्या मॅक्रो आणि मायक्रो वस्तूनी भरून वाहात असतो की विचारू नका ! मला वाटते अंग घासण्याचा दगडच आता फक्त फ्रीजमध्ये ठेवायचा राहिलाय . Proud

रैना, मस्त पोस्ट. स्वयंपाकघर आणि एकुणातच घरातली कामे हा बायकांच्या जीवन-मरणाचा किंवा कर्तव्याचा प्रश्न न बनवल्यास रैना म्हणते ते implement करायला सोप्पे आहे. "मी असताना 'ह्यांनी' कशाला स्वयंपाकघरात/घरात काम करायचे" वगैरे फालतुपणा फार जमतो काही लोकांना. असो, तो काही ह्या बाफचा विषय नाही.

सर्वांच्या टिप्स भारी आहेत. आ स्व पु जिंदाबाद !!!

रैना, बेष्ट पोष्ट!!

सुपरवूमन व्हायच्या फंदात पडू नये आणि न केलेल्या कामांचा स्ट्रेस (अजून झालं नाही, हेच काय तेसुद्धा झालं नाही, आई कसं करायची, कोणी आलं तर काय म्हणेल, मला एक वेळ नाही पण xxx*ने करायला काय हरकत आहे) घेऊ नये - हे अनुभवांतून आलेलं शहाणपण. As it is ती कामं केल्याने काही 'कायमस्वरूपी' नाहिशी होणार नसतात. आज आवरलं म्हणून उद्या पसारा होत नाही असं नसतंच. तेव्हा जे 'आत्ता आवश्यक' आहे आणि जे करायला वेळ आणि उत्साह आणि मूड आहे, ते आणि तेवढंच आनंदाने (हे महत्त्वाचं!) करावं आणि बाकी कामांकडे चक्क दुर्लक्ष करावं.

त.टी. : xxx placeholder आहे, शिवी नाहीये. Proud

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

"मी असताना 'ह्यांनी' कशाला स्वयंपाकघरात/घरात काम करायचे" वगैरे फालतुपणा फार जमतो काही लोकांना
>>>सिंड्रेला, हेच पोस्ट लिहायला आले होत.

नवरोबाला स्वयंपाक घरातील सर्व्वस्तू कुठे ठेवल्या आहेत हे माहित पाहिजे, म्हणजे कधी घरी यायला उशीर झालाच तर त्याला फोनवरून काय करायचं ते सांगितलं की काम झालं. Happy उगाच नाहीतर तिसर्या बरणीत बडीशेप आहे, जिरे नाहीत हे ऑफिसमधून सांगायला नको Happy

मी कधी कधी ब्रेकफास्ट म्हणून पोळीचे सापडेल ते सारण भरून रोल करते. उशीर झालच तर ट्रेन्मधे पण खाता येतात. Happy

--------------
नंदिनी
--------------

सांगायचं कशाला ? घरातच आहेत ना सर्व वस्तु मग शोधेल नाहीतर बाहेरुन जेवण मागवेल. ऑफिसमधे जास्त काम असल्यावरच उशीर होतो मग त्यात अजून स्वयंपाकाचं कंसल्टिंग कशाला ? Wink

सिन्डे , हे जरा जास्तच होतय हं!

मला तसं वाटत नाही Happy

नवरोबाला स्वयंपाक घरातील सर्व्वस्तू कुठे ठेवल्या आहेत हे माहित पाहिजे, >>
हे बायोलॉजिकली अशक्य आहे म्हणे.

असं म्हणतात की गर्भाशय नसल्यामुळे कुठलाही पुरुष फ्रीझ उघडून 'दारात, उजव्या बाजूला, तुझ्या हाताच्या लेव्हलला ट्रॉपिकानाचा बुधला ' हे ऐकल्यावर सुद्धा "कुठेय ऑरेंज जूस' असे विचारू शकतो Happy
त्यांची चूक नाही काही त्यात.

सुपरवूमन व्हायच्या फंदात पडू नये आणि न केलेल्या कामांचा स्ट्रेस घेऊ नये >> याच बरोबर जे आपल्याला जमतं पण मैत्रिणीला, नणंदेला किंवा इतर कोणाला जमत नाही त्याबद्दल फार अभिमान /गर्व बाळगू नये. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रित्या आपण इतरांकडून सुपरवूमन असायची अपेक्षा करत नाही याकडे लक्ष असावं. हे सोप्प नाही अजिबात, पण महत्त्वाचं आहे .

' तिला काय , सासूबाई मदत करतात ', ' त्यांच्याकडे आठवड्यातून तीन दिवस टेक आउट असतं' असे शेरे देण्याने काही साध्य होत नाही.

>>>सुपरवूमन व्हायच्या फंदात पडू नये आणि न केलेल्या कामांचा स्ट्रेस घेऊ नये.
आजपासून हेच माझं ब्रीदवाक्य! Happy

>>असं म्हणतात की गर्भाशय नसल्यामुळे कुठलाही पुरुष फ्रीझ उघडून 'दारात, उजव्या बाजूला, तुझ्या हाताच्या लेव्हलला ट्रॉपिकानाचा बुधला ' हे ऐकल्यावर सुद्धा "कुठेय ऑरेंज जूस' असे विचारू शकतो
त्यांची चूक नाही काही त्यात.<<
गर्भाशय नसल्यामुळे वगैरे हे खरोखर खरे आहे का? चला मग आता, 'शेवटी मलाच उठायला लागले म्हणून forgiving असायला हरकत नाही.' Happy

Pages