अटलांटा GTG १८ जुलै २००९

Submitted by राहुल on 12 July, 2009 - 23:05

थोडक्यात वृत्तांत -

दि. : १८ जुलै
वेळ : संध्याकाळी ६:०० ते १०:३०
ठिकाण : 'मो' ह्यांच्या घरी

एखाद्या अनोळखी ठीकाणी, काही अनोळखी लोकांना भेटून.... 'कसली धम्माल केली' अशी प्रतिक्रीया येणे हे मायबोलीकरांना नवीन नाही. हेच मायबोली कुटुंबाचे यश आहे असे म्हणता येईल. आजपर्यंत अनेक मायबोलीकरांनी असेच अनुभव घेऊन त्याबद्दल इथे वृत्तांत लिहीले आहेत.

अटलांटा GTG सुद्धा ह्याला अपवाद नव्हता. ७ मायबोलीकर आणि त्यांचे कुटंबीय ह्यांनी ३ - ४ तास एकत्र जमून धमाल केली.

सुरुवात, मी मायबोलीकर कसा(कशी) झालो(झाले ), इथुन झाली. माबोवरचे सध्याचे ताजे विषय, विशेष लक्ष पुरवावे असे बाफ.... थोडक्यात रोज पार्ले/बारा/शिट्टी/पुपु/अटलांटा बाफ वरचे ड्वायलॉग पुढे चालू....

माबोकरणींनी खादाडीची जय्यत तयारी केलीच होती. बटाटेवडे, सामोसे, पावभाजी, पुलाव खात खात गप्पा चालू राहिल्या.
food.jpg

('एक्झोटीक डेझर्ट' चा विषेशोल्लेख इथे आवश्यक आहे. Proud ).
exotic.jpg
निघायच्या आधी पुणे-मुंबईकरांच्या वविसाठी फोन वरून शुभेच्छा दिल्या.
आणि पुन्हा भेटायच्या तयारीवर सगळ्यांनी निरोप घेतला.

त.टी. : माझ्या ऑर्कुटवर GTG चे फोटो टाकले आहेत.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो.. लक्षात आहे ना गटग च?? मुख्य म्हणजे आपपल्या पदार्थांची तयारी झाली ना?? Happy

माझं एक्झोटीक डेझर्ट ऑलमोस्ट तयार आहे.. Proud

अटलांटा GTG ला भरघोस शुभेच्छा!!

मस्त भरपुर गप्पा, मजा, दंगा करा...यथेच्छ खा-प्या (खाताना आमच्या आठवणी काढायला विसरू नकात Wink ), फोटो काढा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नंतर वृत्तांत लिहायला विसरु नकात Happy

------------------------------------------
दिल का भँवर करे पुकार, प्यार का राग सुनो
प्यार का राग सुनो रे S

झाला झाला.. आमचा गटग..
आम्ही गटग संपता संपता पुणे आणि मुंबईकरांना खो दिला.. आणि ववी ची पण सुरुवात झालीये..

वृत्तांत टू फॉलो..... Happy

लवकर येवु द्या हो वृत्तांत वाट बघतोय.

खाऊन खाऊन सुस्त झालेले अजगर कधी वृत्तांत लिहिणार !!! Uhoh

एक्झोटीक डेझर्टचे फोटो टाकलेत माझ्या ऑर्कुटवर. Happy
GTG एकदम मस्त झालं. छान वाटलं सगळ्यांना भेटून.

राहुल ऑर्कुटवर फोटोत नावे का नाही दिली सगळ्यांना, मला फक्त अडम ओळखू आला.

आधी "नावे (ID) ओळखा" होऊन जाऊ दे. मग लिहीतो. Happy

नंबर १ आहेत फोटोज.
फ्युच्रर माबोकरांनाही चांगलं कॅप्च्रर केलय Happy

एक्झॉटीक डेझर्ट पण लय भारी होतं.
RJ, तू त्या सगळ्यात आधी बनवलेल्या 'सँपल'चे फोटोस घ्यायला हवे होतेस ;).
GTG एकदम मस्त झालं. छान वाटलं सगळ्यांना भेटून.>> पाहिजे तेवढे मोदक

>>> तू त्या सगळ्यात आधी बनवलेल्या 'सँपल'चे फोटोस...
ते कोणी संपवलं नंतर? Proud

अरे तुम्ही लोक फोन करणार होतात ना खो द्यायला?

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

केला होता... मोठ्या मुष्कीलीने लागला तो.. !!!
वैनी, आज्जी, साजिरा तिघांनीही उचलला नाही.. !!!!!!!! मग शेवटी आज्जींनी कॉलब्यॅक केला तेव्हा बोलणं झालं...

नी.. आठवण काढली हो आम्ही तुझी.. तू एक माजी जॉर्जियाकर आहेस ना त्यामूळे.. Happy

मुंबई गाडीवर बहिष्कार टाकलात काय!!
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

ते कॉल करून आणि ते लागूनच दमलो आम्ही.. !!!!
आणि मग निघायचीच वेळ झाली..

हो मला आला होता फोन दोनदा, बसमध्ये लोकं आणि सामान कोंबायच्या नादात किंवा बहूतेक गाडीला बॅनर बांधायच्या नादात तो मिसला. Sad

वविचे वृत्तांत पण आलेत. तुमचे कधी? Happy

---
असं एखादं पाखरू वेल्हाळ..

RJ, बिघडलेलं एक्झॉटिक कोणाला दिसायला नको म्हणून अडमानी लगेच संपवलं ते ;).

ए ते मुळात बिघडलेलं नव्हतं... आर्जे नी त्यात बदलीभर व्हिप्ड क्रिम ओतलं... Proud

>>आर्जे नी त्यात बदलीभर व्हिप्ड क्रिम ओतलं
Lol

>> बदलीभर
Rofl
~~
परिमळु विद्गदु रे भ्रमरा |

मजा केलीत तर !! आता आमच्यासाठी परत एक गटग !!

राजे राजे, घात झाला....आपल्यामधे हेर पेरण्यात आला होता.....
काही का असेना..हेराने एक्झॉटीक डेझर्ट खाऊ घातलं ना.....पुष्कळ झालं....

अहो अडमतडम,
आपला व्रुतांत कुठे गेला??हा बीबी तुम्हिच चालवता अस ऐकलं होतं.
चालवताय का रांगवताय??
--------------------------------------------------------------------------------
भिंतीला कान असतात आणि पाठीला डोळे!!!

माझ्या सुमार लेखन प्रतिभेला अनुसरून वृत्तांत लिहीण्याचा एक प्रयत्न (!) केला आहे.
(हे वृत्तांतापेक्षा meeting minutes वाटत आहेत, ह्याची पूर्ण कल्पना आहे. कृपया चालवून घ्या.) Happy

पुढचं GTG (सर्वांच्या सोयीनुसार) माझ्याकडे करावं अशी इच्छा आहे.

लिहिणार उद्या नक्की.. आज जरा कामात अडकलो.. आणि जरा वेळ काम नव्हतं तेव्हा बाकीच्या गोष्टींमधे.. Wink

चालयचंच...
--------------------------------------------------------------------------------
भिंतीला कान असतात आणि पाठीला डोळे!!!

>> माझ्या सुमार लेखन प्रतिभेला अनुसरून वृत्तांत लिहीण्याचा एक प्रयत्न (!) केला आहे.
RJ, कुठाय वॄत्तांत?
adm पण लिहितोय. आम्हाला २ वॄत्तांत वाचायला मिळणार म्हणजे सहीच!
(पण आता आणा)
>> पुढचं GTG (सर्वांच्या सोयीनुसार) माझ्याकडे करावं अशी इच्छा आहे
पुढच्या GTG बद्दल विचार करायला सुरुवात झालीये तर ! Happy

Pages