अटलांटा GTG १८ जुलै २००९

Submitted by राहुल on 12 July, 2009 - 23:05

थोडक्यात वृत्तांत -

दि. : १८ जुलै
वेळ : संध्याकाळी ६:०० ते १०:३०
ठिकाण : 'मो' ह्यांच्या घरी

एखाद्या अनोळखी ठीकाणी, काही अनोळखी लोकांना भेटून.... 'कसली धम्माल केली' अशी प्रतिक्रीया येणे हे मायबोलीकरांना नवीन नाही. हेच मायबोली कुटुंबाचे यश आहे असे म्हणता येईल. आजपर्यंत अनेक मायबोलीकरांनी असेच अनुभव घेऊन त्याबद्दल इथे वृत्तांत लिहीले आहेत.

अटलांटा GTG सुद्धा ह्याला अपवाद नव्हता. ७ मायबोलीकर आणि त्यांचे कुटंबीय ह्यांनी ३ - ४ तास एकत्र जमून धमाल केली.

सुरुवात, मी मायबोलीकर कसा(कशी) झालो(झाले ), इथुन झाली. माबोवरचे सध्याचे ताजे विषय, विशेष लक्ष पुरवावे असे बाफ.... थोडक्यात रोज पार्ले/बारा/शिट्टी/पुपु/अटलांटा बाफ वरचे ड्वायलॉग पुढे चालू....

माबोकरणींनी खादाडीची जय्यत तयारी केलीच होती. बटाटेवडे, सामोसे, पावभाजी, पुलाव खात खात गप्पा चालू राहिल्या.
food.jpg

('एक्झोटीक डेझर्ट' चा विषेशोल्लेख इथे आवश्यक आहे. Proud ).
exotic.jpg
निघायच्या आधी पुणे-मुंबईकरांच्या वविसाठी फोन वरून शुभेच्छा दिल्या.
आणि पुन्हा भेटायच्या तयारीवर सगळ्यांनी निरोप घेतला.

त.टी. : माझ्या ऑर्कुटवर GTG चे फोटो टाकले आहेत.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चीअर्स !!
भेटु मग शनिवारी. Happy

भावना अम्हाला पण चालतील समोसे. अल्फारेटा मधे थोडे पाठवून द्या. बाकी जाऊन आलात की कळवाच.

sorry ppl but I have to cancel my plans for GTG. Office चे फारच काम निघाले आहे आणि बायकोची पण डेंटीस्ट्ची अपॉईंट्मेंट आहे. पून्हा कधीतरी !!

कोणी Atlanta शहरात राहणारे आहेत का? की सगळे शहराबाहेर (alpharetta/sandy springs etc.)?

मी ४०० च्या एक्झिट ५ वर रहातो. Near North Spring Marta station.

-

ज्यांच्याकरता होते त्यांना पोचलेय ते Wink

जीतला दहिवडे करायला सांगितले म्हणून कॅन्सल केलं की काय त्याने? Proud

आर्च अस काही नाही !! पण कालच बायकोला डॉक्टरने शनिवार सकाळची दात काढायची अपॉईंटमेंट दिली !! काय करणार !! आता सगळा मेनू नुसता ऐकावा लागणार !! Sad

जीत तु पोस्ट दनवुडीत राहतोस का? आम्ही आधी तिथे रहायचो. आता वॅलमार्टजवळ शीफ्ट झालो. Happy

पोस्ट डनवूडी मधे नाही. त्याच्या आधी डनवूडी प्लेस म्हणून आहे तिथे रहातो. तू वॉलमार्ट जवळ कुठल्या काँप्लेक्समधे रहाते ?

अ‍ॅडमा : गटग च्या वेळेस जमल्यास आमच्यापैकी कोणाला तरी फोन कर रे, म्हणजे निदान लांब असूनही तुला गटग चा आनंद घेता येईल ............ Happy

~~~~~~~~~~~~~~
उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही

जीत, मी अ‍ॅशफोर्ड पार्क मध्ये राहते.

लोक्स.. किती वाजता जमंणार आहोत आपण ???

६ ते ७ च्या दरम्यान कसं वाटतय? म्हणजे गप्पांनाही वेळ मिळेल.
आधीही येऊ शकता बरं का! Wink

>>> किती वाजता जमंणार आहोत आपण ???
मो गडाचे दरवाजे कधी उघडते त्या वर अवलंबून आहे ते. Proud

आरजे, मि पा अजून अ‍ॅड नाही झाले मेनुत ? Sad

गडाचे दरवाजे पहाटेच उघडतात ;). त्यानंतर कधीही सर्वांना प्रवेश असतो.
बाहेर तुमच्या स्वागतासाठी तुतार्‍या घेऊन दरवान संध्याकाळी ५ पासून उभे असतील.
सगळ्यांना ओवाळण्याकरता सुवासिनी औक्षणाचे तबक घेउन उभ्या असतील.
सगळ्यांचा यथोचित सत्कार करण्याकरता कॅरिंटन पथ सज्ज आहे, चिंता नसावी :).

सिंडी, GTG खानपान सेवेच्या पदाधिकार्‍यांनी मेन्यु मधे बदल केला आहे.
तेव्हा आता मि.पा. ऐवजी पावभाजी असणार आहे.
तु मसाल्याच पाकीट पाठवल्याबद्दल खूप धन्यवाद.
ते पाकीट तसेच राखून ठेऊन, ९ ऑगस्टला GTG पार्ट doux मधे वापरण्यात येईल. Happy

काय म्हणावे लांटाकरांना, गटगला मिसळ करतो म्हणुन मसाला मागितला आणि आता पाकिट हडप करुन भलताच मेनु. छे छे आमचे शीट्टीकर नाही हो असं करणार !!!

शीट्टीकरांनी जरा जास्तच घाई केली का पाकीट पाठवायची? Wink
मिसळ/पावभाजी असे होते ठरवताना.
आता आर्जेंना मिसळ बनवून पोस्टानी पाठवा म्हणाव!

>>> पोस्टानी पाठवा म्हणाव!
त्यापेक्षा शीट्टीकरांना ईकडे बोलावून घेणे सोयीचे पडेल.
*** सर्व शीट्टीकरांना अटलांटा भेटीचे जाहीर निमंत्रण ! ***

आरजे.. तशी पावभाजी आणि मिसळ ही आयड्या पण वाईट नहिये.. Wink

सिंडीच्या सल्यानुसार तिने पाठवलेल्या मसाल्यात दिड लिटर कट होतो.
तु सगळा संपवण्याची जबाबदारी घेणार असलास तर माझी तयारी आहे. (दुसर्‍या दिवशीच्या परिणामांना आम्ही जबाबदार नाही. Proud )

'पण पूर्ण दिड लिटर चा कट कशाला करायचा ??? कमी करायचा ना.. उरलेला मसाला आपण आर्जे च्या घरी जाऊ तेव्हा मिसळ करण्यासाठी उपयोगी पडेल.. Wink

दुसर्‍या दिवशी परिणाम होतील असे काही "कट" केलेस का तू ???? Proud

पावभाजी आणि मिसळ ही आयड्या पटली.
हायकमांडला विचारणेत येईल.

अडम, आर्जेंनी केलेल्या 'कटा'वर उपाय आहे की.. थंडगार मसाला ताक प्यायचं २-३ वाट्या.. हाकानाका Proud

पाकिटावर दिलेल्या सूचनांअप्रमाणे कट करा नाहीतर म्हणाल माझ्यामुळे अपेक्षित परिणाम साधला नाही.

Pages