वारी चुकलेल्या वारकर्‍याचा अभंग

Submitted by harish_dangat on 29 June, 2009 - 22:02

.
मज पामरासी | नशीबाचा भोग |
वारीचा योग | नाही देवा ||

संसाराचा मज | झाला बहू व्याप |
आता अनुताप | होई मज ||

झालो एक किडा | भोवताली कोष |
आता माझा दोष | कोण सांगे ||

बैसलो मी घरी | मेळवाया धन |
परी माझे मन | तुझ्या पायी ||

मज डोईवरी | संसाराचा भार |
आठवण फार | येई आता ||

संत जाती पुढे | पाहतो मी पाठ |
तुझी माझी गाठ | होणे नाही ||

हरीश दांगट

गुलमोहर: 

सुरेख! वारी चुकल्याची व्याकुळता अत्यंत उत्कटतेने व्यक्त झालीय.

क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/

मनात असूनही वारीला जायला न जमल्याची खंत छान मांडलीये.
अभंगावर एकदम हुकूमत आहे तुमची!

सुरेख जमला आहे अभंग. वारी चुकल्या॑ची खंत छान व्यक्त होतेय.

सुंदर अभंग Happy प्रपंच व परमार्थ एकदम साधणार्‍या वारकर्‍याचे (प्रारब्धावर वार करणार्‍याचे) मनोगत आहे हे!
***************
युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
इति अनिरुद्ध महावाक्यम |

सुंदर जमलाय अभंग.

मस्तच. Happy आवडला.

सुरेख हरिबा !

छान आहेत करुणाष्टके.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

हरी हरी.. हरीष.. फार सुंदर!!!

व्वा!

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" सुरेख! "

वाह !

परागकण

झालो एक किडा | भोवताली कोष |
आता माझा दोष | कोण सांगे ||

बैसलो मी घरी | मेळवाया धन |
परी माझे मन | तुझ्या पायी ||

वाह वाह पुर्ण अभंग उत्कट आणि खुपच सुंदर....!

आधी प्रतिसाद दिलाच आहे आता लक्षवेधी कवितांमधे निवड झाल्याबद्दल अभिनंदन Happy

My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय. Happy