Submitted by harish_dangat on 29 June, 2009 - 22:02
.
मज पामरासी | नशीबाचा भोग |
वारीचा योग | नाही देवा ||
संसाराचा मज | झाला बहू व्याप |
आता अनुताप | होई मज ||
झालो एक किडा | भोवताली कोष |
आता माझा दोष | कोण सांगे ||
बैसलो मी घरी | मेळवाया धन |
परी माझे मन | तुझ्या पायी ||
मज डोईवरी | संसाराचा भार |
आठवण फार | येई आता ||
संत जाती पुढे | पाहतो मी पाठ |
तुझी माझी गाठ | होणे नाही ||
हरीश दांगट
गुलमोहर:
शेअर करा
सुरेख!
सुरेख! वारी चुकल्याची व्याकुळता अत्यंत उत्कटतेने व्यक्त झालीय.
क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/
मनात
मनात असूनही वारीला जायला न जमल्याची खंत छान मांडलीये.
अभंगावर एकदम हुकूमत आहे तुमची!
सुरेख जमला
सुरेख जमला आहे अभंग.
सुरेख जमला
सुरेख जमला आहे अभंग. वारी चुकल्या॑ची खंत छान व्यक्त होतेय.
सुंदर अभंग
सुंदर अभंग
प्रपंच व परमार्थ एकदम साधणार्या वारकर्याचे (प्रारब्धावर वार करणार्याचे) मनोगत आहे हे!
***************
युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
इति अनिरुद्ध महावाक्यम |
सुंदर
सुंदर जमलाय अभंग.
मस्तच.
मस्तच.
आवडला.
सुरेख
सुरेख हरिबा !
फार सुरेख
फार सुरेख जमलाय अभंग !
हरीष, अप्रत
हरीष,
अप्रतीम जमलय
अप्रतिम
अप्रतिम !!!!!!!!!!!
मस्त !!
मस्त !!
मस्तय! आवा
मस्तय! आवा जाती पंढरपूरा
संदर
संदर
अप्रतिम्....
अप्रतिम्....फार सुंदर
सुंदर.
सुंदर.
छान आहेत
छान आहेत करुणाष्टके.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..
हरी हरी..
हरी हरी.. हरीष.. फार सुंदर!!!
व्वा!
व्वा!
*******************
सुमेधा पुनकर
*******************
वार्याची
वार्याची बात !
वार्यावरची नाही !! ---
" सुरेख! "
वाह
वाह !
परागकण
सुरेख
सुरेख अभंग.
मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com
भगवद्गीता:- http://marathi-bhagavadgita.blogspot.com
झालो एक
झालो एक किडा | भोवताली कोष |
आता माझा दोष | कोण सांगे ||
बैसलो मी घरी | मेळवाया धन |
परी माझे मन | तुझ्या पायी ||
वाह वाह पुर्ण अभंग उत्कट आणि खुपच सुंदर....!
आधी
आधी प्रतिसाद दिलाच आहे आता लक्षवेधी कवितांमधे निवड झाल्याबद्दल अभिनंदन
My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय.