दगडू तेली चिकन

Submitted by मेधा on 27 June, 2009 - 11:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

२ पाउंड चिकन -( शक्यतो बोनलेस घेऊ नये)
३ मध्यम लाल कांदे
आले-लसूण पेस्ट २ टेस्पून
ओले खोबरे २ टे स्पून
सुके खोबरे कीस दोन टे स्पून ,
हिरव्या मिरच्या २-३
कोथिंबीर बारीक चिरून -४-५ काड्या.
दगडु तेली मसाला दोन टेस्पून भरून
हळद, ब्याडगी मिरची पावडर, मीठ , तेल

क्रमवार पाककृती: 

चिकनचे लहान तुकडे करून त्याला हळद तिखट मीठ आले-लसूण पेस्ट व एक चमचा दगडू तेली मसाला लावून ठेवावा.
एक कांदा बारीक चिरून थोड्या तेलात परतून घ्यावा. कांदा ब्राउन झाला की त्यातच ओले खोबरे परतुन घ्यावे. मग सुके खोबरे घालून परतून घ्यावे.
गार झाल्यावर कांदा खोबरे बारिक वाटून घ्यावे.

उरलेले कांदे बारीक चिरून तेलात परतून घ्यावेत. कांदा पारदर्शक झाला की चिकन व हिरव्या मिरच्या घालून परतावे व मंद आचेवर शिजू द्यावे. शिजत आले की त्यावर कांदा खोबरे वाटण व उरलेला मसाला घालावा. शेवटी बारिक चिरलेली कोथिंबीर घालावी.

भाकरी ,पाव याबरोबर अगदी मस्त लागते.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी.
अधिक टिपा: 

नाशिकला रविवार कारंजाच्या जवळ दगडू तेली म्हणून एक जुनं अन प्रसिद्ध मसाल्याच्या सामानाचं दुकान आहे. हा तिथला गोडा /काळा मसाला.

माहितीचा स्रोत: 
वहिनी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मसाला आला की करणार.
(शोनू तुला मसाल्याची कृती लिहिता येईल का?)

शोनू बढीया कृती.
मसाला कोण आणतंय? (वैद्यांकडून मिळणारा तो हाच का मसाला? Happy )

बाप रे शोनू, दगडू तेली वाचुन एकदम काळा कभिन्न, उघडाबंब, ढेरपोट्या, मोठ्ठ्या मोठ्ठ्या मिश्या, कमरेला मळक आखुड धोतर, अंगाला तेल असा माणुस डोळ्यासमोर आला. आणि त्याचे चिकन म्हणजे तसेच दगडु असेल असे वाटले..पण रेसिपी छान आहे. मसाल्याची रेसिपी टाक ना? की कुठलाही गोडा मसाला वापरुन करता येइल?

दगडू तेलीचा मसाला इतका प्रसिध्द आहे मला माहितच नाही. अगदी लहानपणी दुकानातून सामान आणायला सुरुवात ह्याच दुकानातून केली मी. मसाला मात्र कधी वापरला नाही, आता आणुन बघिन आणि अश्या पध्दतीने वेगळी कुठली तरी भाजी - वांगी किंवा पाटवड्या करुन बघिन.

त्यापेक्षा चिकनच करा आणि आम्हाला बोलवा.

त्यांच्याकडे तयार मसाला न घेता जर मसाल्याचं सामान घेतलं तर त्यावर माप अन कृती लिहिलेली असते. पण माझ्याकडे नाहीये :-(. वहिनीला विचारून पाहिन.

दगडू तेली हे गृहस्थ नाशिकचे . त्यांचे तेल , मसाले नाशकात प्रसिद्ध आहेत. ते आता नसावेत पन त्या नावाची फर्म मात्र आहे. त्यांचे आयुर्वेदिक औषधाचेही दुकान नाशिक मध्ये आहे...

हो रॉबीन आता बहुतेक त्यांची ३-४ थी पिढी दुकान सांभाळते आता. त्यांचं आडनाव चांदवडकर आहे पण ते तेली लावतात.

फायनली दतेम आमच्यापर्यंत पोहोचला (थँक्स टू 'मिनी') Happy
तो मसाला वापरून दतेम चिकन केलं. मस्त झालं एकदम. बाकी कुठल खडा मसाला न वापरता (दतेम मध्ये असतील ते ऑलरेडी) करायचं असल्याने एकदम सोपी रेसिपी वाटली ! धन्यवाद शोनू.