शब्द सखा

Submitted by पुरंदरे शशांक on 24 November, 2026 - 04:19

शब्द सखा

जडावा घडावा असा शब्द साधा
पुरा मोकळासा नभा सारखा
भरोनी झरो आशयाने पुरेसा
जसा सावळा मेघ आल्हादसा

नको बोचरा, चालही वाकडी ना
नसे दिव्यता भव्यता आगळी
परी स्पर्शता सौख्य लाभे जिवाला
मिटो अंतरींची जरा काजळी

जरी जाणिवेच्या फुले माळरानी
कडे नेणिवे पालवे सर्वथा
स्फुरे ते पुरे अर्पूनिया स्वभावे
पुन्हा मोकळा कोण जाणे सखा

Group content visibility: 
Public - accessible to all site users