चार दिवस सोनिया गांधींच्या आत्मचरित्रानं मनमस्तिष्क व्यापून टाकलं. एखाद्या सिनेमासारखी ही लव्हस्टोरी चालू झाली. प्रेमात डुबून गेलेल्या एका स्त्रीची गोष्ट. वाचत राहिलो वाचत राहिलो वाचत राहिलो. कधीतरी वॉशरूमला उठलो तेव्हा बाहेर पक्ष्यांचा आवाज ऐकू आला, तेव्हा लक्षात आलं की पहाट झालीय. म्हणजे सलग आठेक तास वाचत होतो.
यांचं लग्नाधीचं आयुष्य, माहेर, एकदमच मिडलक्लास आहे. इटलीच्या छोट्या गावात राहणारे साधे सरळ नोकरपेशा लोक. आर्मीतून रिटायर झालेले कडक शिस्तीचे वडील. आणि इकडून रोज पत्रामागून पत्रं पाठवून वडिलांना कन्व्हिन्स करण्याबाबत सोनियाला सल्ले देणारे राजीव.
केंब्रिजमधलं यांना काहीच आवडत नव्हतं ते राजीव भेटल्यानंतर अचानक सगळं जादूसारखं आवडायला लागलं. रोमान्स. विरह. घालमेल. बुजरेपण. या सुरूवातीच्या भागात मॅडम तर कवयित्री झाल्यात एकदम.
स्वतःबद्दल, फॅमिली लाइफबद्दल लिहिताना सोनिया गांधींनी फारसं हातचं राखलेलं नाही. लिखाणात एक जबरदस्त फ्लो आहे. मानवी संवेदनांनी खचाखच भरलेलं, धरून ठेवणारं लिखाण. पुढे राजकीय आयुष्याचा भाग सुरू होतो तेव्हा मात्र हा फ्लो काहीसा तुटतो. राजकीय घटनांबद्दल लिहिताना त्या अधिकाधिक कॉन्शस होत गेलेल्या दिसतात. स्वतःला रोखून धरतात. सुरुवातीच्या भागातला मोकळेपणा आणि बेदरकारी इथे जाणवत नाही. पहिल्या साडेतीनशे पानांनी वाचनीयतेचा जो ग्राफ उंचावून ठेवला आहे, तो हळूहळू सपाट व्हायला लागतो. शेवटी शेवटीच्या काही काही पानांमधला मजकूर एकदम सपाट राजकीय विवेचनासारखा वाटला.
बाकी, म्हातारपण छानपैकी घ्यायला जमलेलं आहे. पक्व म्हातारपण आल्यावरच अशी जुन्या आठवणींची कशिदाकारी जमत असावी. अतिशय बारीकसारीक आठवणी, अगदी व्यवस्थित डिटेलिंगसह, मुरवून मुरवून शांतपणे मांडल्या आहेत. दहाएक वर्षे लागली म्हणतात हे लिहायला. वाचताना जाणवतंही.
अशा गोष्टी ज्या फक्त एक बायकोच नवऱ्याबद्दल लिहू शकते. ज्या फक्त एक सूनच सासूबद्दल लिहू शकते. ज्या फक्त आयाच आपल्या मुलांबद्दल लिहू शकतात. आणि 'सत्ता' 'लीडरशीप' वगैरे गोष्टींबद्दल अशा फिलॉसॉफीकल/ डिटॅच्ड नजरेनं पाहून लिहिणंही अशाच व्यक्तीला शक्य आहे, जी तीस-पस्तीस वर्षं सत्ताकेंद्रात वावरली आहे, जिनं सत्ता हाताळली आहे आणि 'सत्ता' नावाच्या गोष्टीतल्या फॉल्टलाईन्स अनुभवातून जिला कळलेल्या आहेत.
एका सर्वस्वी अनोळखी जगात आलेली स्त्री. एका माणसावर विश्वास ठेवून. मागचं सगळं मागे टाकून. राजीव यांची चॉइस मात्र परफेक्ट होती, हे काळानं सिद्ध केलं आहे.
भारतात पहिल्यांदा आल्यानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांत इथले रंग, गंध, ध्वनी, आहार, पोषाख, भाषिक लकबी, रस्ते, घरं, खिडक्या, झाडं... या सगळ्यांमधलं निराळेपण त्यांनी ज्या पद्धतीनं टिपलं आहे, त्यासाठी एक सर्जनशील मन लागतं. त्याची झलक या वर्णनांमधून दिसतेच म्हणजे. शिवाय माणसांना बारकाईनं ऑब्झर्व करण्याचा त्यांना छंद असावा. ही निरीक्षणं राष्ट्रप्रमुखांची, परदेशी पाहुण्यांची आहेत आणि बॉडीगार्ड्स, शेफ, स्टाफमधल्या लोकांबद्दलचीही आहेत.
इंदिरा गांधींबद्दल लिहिताना सुरुवातीला राजीवज् मदर, मग मदर-इन-लॉ, मग मिसेस गांधी, मग ममी अशी संबोधनं येतात. ही संबोधनं प्रसंगानुसार, भावनेनुसार, काळानुसार बदलतायत हे एक शंभरेक पानं वाचल्यानंतर जाणवलं.
पहिल्यांदा दिल्लीत फिरताना रस्त्याकडेच्या भिंतींवर लालभडक शिंतोडे दिसलेले जे त्यांना रक्त वाटलेलं. कळत गेलं नंतर की ह्या पानाच्या पिचकाऱ्या आहेत. हे 'अशा प्रकारे' सांगायला असं कुणीतरी लागतं ज्याच्या गाठीशी दोन ऑलटुगेदर वेगळ्या जगांचा अनुभव आहे.
एवढी वर्षे ही स्त्री आपल्या डोळ्यांपुढे पब्लिक लाईफमध्ये दिसत आली आहे तरी आपल्याला यातलं काहीही माहीत नव्हतं, याचं आश्चर्य.! आठवणींची लड लावून दिलेली आहे मॅडमनी. खजाना आहे यांच्याकडे तर.! इंदिरा-राजीव यांच्या काही सवयींचा खरपूस समाचार घेतलेला आहे. कसलेल्या लेखिकेसारखा सटल सेन्स ऑफ ह्युमर ठेवून लिहिलंय ते. हे किस्से, निरीक्षणं वाचणं एक डिलाईट, एक मौज आहे.
आत्मचरित्र वाचतोय की एखादी कादंबरी वाचतोय, असा भ्रम व्हावा असं लिखाण. प्रसंग, संवाद, मनस्थिती यांची मांडणी एवढी प्रभावी की डोळ्यांसमोर घडतंय असं वाटावं. साठेक वर्षांचा मोठा पट आहे. आणि लेखिका वाचणाऱ्याला त्यात गुंतायला भाग पाडते. या प्रवासात वाचणारा मनानं त्यांच्यासोबत असतो. त्यांच्या घरात राहतो. त्यांच्यासोबत वावरतो, माणसांना भेटतो, देशात विदेशात, सभांमध्ये, कुठे कुठे.
इंदिरा गांधींच्या, राजीव गांधींच्या हत्येचे प्रसंग, त्यानंतरची मनस्थिती, दहशत, भावनांचे बेभान स्फोट, इंटेन्स रॉ इमोशन्स, डिप्रेशन. छाती दडपून गेली. लांबून बघताना वाटत असतं हे काय गांधी घराणं, रॉयल, ग्लॅमरस लोक आहेत वगैरे ! पण हे लाईफ काही झेपलं नसतं आपल्याला तर.! डेंजर आहे हे. नॉर्मल जगणंच उरत नाही काही. कितीही ठरवा, यातनं एस्केप करणं शक्य होत नाही. परिस्थितीचा दबाव दुसरा मार्गच ठेवत नाही. हे लिहून काढल्यामुळे सोनिया गांधींच्या मनावरचं ओझं उतरलं असेल कदाचित, पण जे कुणी वाचतील त्यांच्या मनावर या आठवणींचं ओझं पडत राहणार आहे, पुढची दहा पंधरा वीस पंचवीस तीस वर्षे, जसजसं हे पुस्तक झिरपत जाईल तसतसं.
महात्मा गांधींचं आत्मचरित्र हे माणसानं स्वतःबद्दल किती खरंखुरं लिहावं, याचा बेंचमार्क मानला जातो. त्या लेव्हलला जाणं अवघड आहे. पण हे पुस्तकही काही कमी नाही. स्वतःच्या कमतरता, भीती, मानसिक द्वंद्वं लिहायला जिगर लागते.
पेंग्विननं हे पुस्तक नाकारून कर्मदरिद्रीपणा केला. ज्याला चांगला कंटेंट कळतो असा कुणीही संपादक असला ऐवज नाकारणार नाही. दबाव असणार, समजू शकतो. पण मग बसा आता हात चोळत ! तिकडे हार्पर-कॉलिन्सवाल्यांच्या हातावर रेष उमटली. ज्याचं त्याचं नशीब !
बाकी, काही जणांचा अभिप्राय पडला की या पुस्तकाच्या माध्यमातून बिगर-नोंदणीकृत कुजबूज गॅंगला परस्पर उत्तर मिळालं असेल. मला तसं काही वाटलं नाही. त्यांना कोण उत्तरं देत बसणार.! एक उत्तर द्यायला जावं तर त्यातनं अजून दहा कंड्या पिकवतील.
तर माणसानं आपापलं लिहावं, हे बरं. जसं यांनी लिहिलंय. आपापली गोष्ट लिहिलीय. चांगल्या अंतःकरणानं, मोकळ्या मनानं लिहिलीय. आणि हे गांधी-नेहरूज् सभ्य लोक आहेत. त्यामुळे शालीन संयत सुसंस्कृत डिग्निफाईड भाषा अपेक्षितच होती. एवढी वर्षे एवढ्या बेकार पद्धतीने ट्रोलिंग होऊनही कटुतेचा लवलेश नाही, विखार नाही, हे मात्र भारी.!
छान लिहिलंय !
छान लिहिलंय !
उत्सुकता चाळवली आहे.
छान पुस्तक परिचय!...
छान पुस्तक परिचय!...
+१.
मराठी अनुवाद आला की वाचेन!...+१.
शेंडे, रागानेच ते सांगितलं
शेंडे, रागानेच ते सांगितलं कारण त्याच्या दृष्टीने ते नाॅर्मल आहे. पण दुसर्याच्या आईवडलाविषयी तुमचे तेच बोलणे रंगवून रंगवून पुन्ह पुन्हा सांगणे आणि त्यावरची लंपट टिप्पणी फारच घाण आहे. कळत नसेल तर असो. चालुद्या. तुमच्या विचारसरणीचे लोक असेच लंपट आहेत हे सर्वांना माहितेय. बारडान्सर म्हणून मीम बनवणारे, करोडोवेळा तेचतेच बारडान्सर म्हणून खिजवणे..
सगळे ठाऊक आहे. इट्स ओके. भक्तपरिवाराने काहीही म्हटले तरी करोडो लोक आजही त्यांच्याविषयी आदर बाळगतात.
ते तिकडे जात नसतंय. जास्तीत
शेजारच्य धाग्यावर चक्कर टाका
>>>
ते तिकडे जात नसतंय. जास्तीत जास्त विकृत कुठे होता येईल तिकडे जायचं. तिथं कानफटात पडल्या की मग दुसरीकडे- असं ते
फाल्सिफिकेशन अँड एलिमिनेशन टेक्निक आहे. या अशा function at() { [native code] }इकोडग्यांचं काय करता येईल? काहीच नाही.
परिचय आवडला.
परिचय आवडला.
हे पुस्तक (अजूनतरी) वाचनयादीत नाहीय.
मी जिथे चर्चा करण्यात
मी जिथे चर्चा करण्यात स्वारस्य आहे तिथे जाण्याचे स्वातंत्र्य बाळगून आहे. उगीच गटारतोंडी लोकांनी गलिच्छ वैयक्तिक चिखलफेक करून काही होत नाही.
साजिर्या गोजिर्या महामूर्ख लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेले उत्तम. असो.
>>शेंडे, रागानेच ते सांगितलं कारण त्याच्या दृष्टीने ते नाॅर्मल आहे. पण दुसर्याच्या आईवडलाविषयी तुमचे तेच बोलणे रंगवून रंगवून पुन्ह पुन्हा सांगणे आणि त्यावरची लंपट टिप्पणी फारच घाण आहे.
<<
विकृत माणसाला आपले वागणे कधीच विकृत वाटत नाही. परंतु समाजाला ते विकृत वाटू शकते.
प्रत्येकाने आपापल्या घरात, नातेवाईकांच्या घरात पहा. कुणाचे वडिल आपल्या आईला रोज मांडीवर घेऊन पोराबाळांसमवेत जेवतात ह्याचा शोध घ्या म्हणजे कळेल काय विकृत आणि काय सरळ आहे ते.
रोज मम्मीला मांडीवर घेऊन पप्पा नीट जेवू शकत असेल असे खरे वाटत नाही. मम्मी देखील पप्पांच्या मांडीवर बसून अवघडलेल्या अवस्थेत जेवू शकेल असे वाटत नाही.
वामाङ्कारूढसीता
वामाङ्कारूढसीता
बाकी कुणाची आई त्याच्या वडलांच्या मांडीवर बसायची की नाही, तिने त्यांना पप्पी दिली की नाही, अजून काय केले याची फार उत्सुकता असते लोकांना. तरी इथे ती लग्नाची बायको आहे.
लग्न केले असताना इतर स्त्रीयांशी लफडी, पैसे देऊन पोर्नस्टार बरोबर संबंध आणि मग पैसे देऊन ते झाकणे, अभिमानाने आपण स्त्रीयांचे गुप्तांग पकडतो याची दर्पोक्ती करणे, बेटांवर जाऊन तर काय काय करत असतील ते सगळे आपले राष्ट्राध्यक्ष म्हणून लोकांना चालते . तसेच लग्नाची बायको सोडणे, दुसर्याच्या लग्नाची बायको ठेवणे हे पण काही ठिकाणी चालते.
गंमतच आहे बुवा सगळी.
शेंडे इथेच बोला पण जरा
शेंडे इथेच बोला पण जरा शेलक्या भाषेत बोला की! हे काय नुसतं युवराज आणि राजमाता.
अनंतकोटी ब्रह्मांडनायक, जिवंत प्रेत, म्हातारडा असली काही विशेषणं लावायला सरस्वतीच्या मांडीवर बसा की सरस्वती तुमच्या जिभेवर नाचेल आणि बोटातून स्रवेल! बाकी हे असं कालिदासाने म्हटलंय, मी नाही.
बारडान्सर म्हणून मीम बनवणारे,
बारडान्सर म्हणून मीम बनवणारे, करोडोवेळा तेचतेच बारडान्सर म्हणून खिजवणे..<<< हो आणि काँग्रेस की विधवा
आणखी काय अपेक्षा करणार यांच्याकडून
चर्चा भलतीचकडे चालली आहे. पण
चर्चा भलतीचकडे चालली आहे. पण राहुलना हेच सांगायचं का सुचलं? किंवा सभेत काहीतरी विनोदी सांगितलंच पाहिजे असा कानमंत्र दिलाय कुणी. श्रोत्यांची आवड.
असो. पुस्तकाकडे वळुया.
पुस्तकाकडे वळुया. +१
पुस्तकाकडे वळुया. +१
'सोनिया गांधींची निंदानालस्ती' असा नवा बीबी उघडून अवांतर चर्चा तिथे करूयात.
इथे या पुस्तकातील आवडलेल्या व खटकलेल्या गोष्टी ची चर्चा करूया
इंग्रजीच्या बाबतीत फारच आनंद
इंग्रजीच्या बाबतीत फारच आनंद असल्याने अहिराणी भाषेतील अनुवाद फारच दर्जेदार अनुवादकाकडून व एखाद्या प्रतिष्ठित प्रकाशक मंडळीकडून लवकर उपलब्ध व्हावा व हे स्पाय थ्रिलर लवकर वाचायला मिळावे ह्या प्रतीक्षेत आहे.
स्पाय थ्रिलर म्हणण्याएवढा
स्पाय थ्रिलर म्हणण्याएवढा इंग्रजीचा आनंद आहे तर.
ते सार्कास्टिक आहे हो.
ते सार्कास्टिक आहे हो.
सोनिया गांधी खमक्या आहेत
सोनिया गांधी खमक्या आहेत
राजीव गांधी पश्चात काँग्रेसची अवस्था वाईट असताना आणि समोर वाजपेयी सारखे लोकप्रिय व्यक्तिमत्व असताना त्या राजकारणात आल्या. खूप ट्रोल झाल्या ( तेव्हा वेगळी पद्धत होती, सोशल मीडिया नसली तरी ) राजकारणात आल्या.
आणि त्यांनी काँग्रेसला तारण्याचे काम करून दाखवले असे मला वाटते.
पुस्तक सहज कुठे वाचायला मिळाले (।मराठी अनुवाद ) तर नक्कीच वाचेन.
राजकारणाबाबत पुस्तकात लिहिलेलं सगळं जसेच्या तसे खरे असेलच असा विचार न करता तटस्थ बुद्धीने वाचता येईलच.
पण पहिला भाग जास्त वाचायला उत्सुकता.
त्यांचे राजकारणात आल्यांनतरचे बरेचसे आयुष्य आपल्याला माहीत आहेच.
त्यांचे भारतात adjust करणे ह्याबाबाबत नक्कीच वाचायला जावे.
पुस्तकाबद्दल खूप सुरेख,
पुस्तकाबद्दल खूप सुरेख, संतुलित अभिप्राय आहे ह्या लेखात. हा लेख काल वाचला पण प्रतिसाद द्यायला जमले नव्हते. ओघवत्या व वेगवान शैलीत लेखिकेबद्दल व पुस्तकाबद्दल लिहिले आहे.
संजयजी, इंदिराजी व राजीवजी हे फार वाईट पद्धतीने मेले. राजकीय, सामाजिक धोरणे काहीही असोत, असा मृत्यू नशिबात नसोच. (अजितदादा ह्यांचीही ह्या निमित्ताने आठवण झाली. तसेच सिंदिया, मुंडे अशांचीही)
शेंडेनक्षत्र ह्यांनी काढलेला मुद्दा भयंकर जिव्हारी लागलेला दिसतो. इतका बिनडोक, किंबहुना 'विरोधी पक्ष नेता म्हणूनसुद्धा नालायक' माणूस देशाच्या नशिबात आहे हे दुर्दैव! त्याला counter करण्यासाठी शिव पार्वती, राम सीता वगैरे उदाहरणे देणे हे frustration चे cute शिखर आहे. सरळ सरळ मान्य करणे की 'हा आमचा माणूस काही बरोबर नाही बुवा व हे आम्हाला मान्य आहे' हे सोडून तिसरेच काहीतरी चालले आहे.
मूळ लेख मात्र सुरेख आहे, पुस्तक वाचावेसे वाटत आहे. उगाच सोनियाजी ह्यांची निष्कारण बदनामी होऊ नये. त्यांच्या सुपुत्राला हे जमले नसेलही.
इंदिराजी ह्यांना संबोधताना सोनियाजी कश्या मिसेस गांधी येथून मम्मीवर आल्या हे वाचताना खूप आवडले. इतक्या वरच्या लौकिक दर्जाच्या कुटुंबातही जो भावनिक ओलावा टिकलेला असतो त्यावर सोनियाजी ह्यांनी प्रकाशझोत टाकलेला असणे आवडले.
अमिताभ बच्चन ह्यांनी त्यांना सक्रिय राजकारणात येऊ नये असे सुचवले होते हे वाचल्याचे आठवते. थ्रेट त्यांनाही होती.
एक aura असतो, तो त्या घराण्याला लाभला होता बरीच वर्षे!
मुद्द्यावर दिलेली उत्तरं खरं
मुद्द्यावर दिलेली उत्तरं खरं तर जास्त जिव्हारी लागलेली दिसतायत..
>>> सरळ सरळ मान्य करणे की
>>> सरळ सरळ मान्य करणे की 'हा आमचा माणूस काही बरोबर नाही बुवा व हे आम्हाला मान्य आहे'
खरं आहे. नेतेपदी प्रेमाऐवजी द्वेषाचा उद्घोष करणारा, कौटुंबिक जिव्हाळ्याऐवजी स्वतःची टिमकी वाजवणारा, सद्यावस्थेतील प्रश्न आणि भविष्याच्या उभारणीऐवजी भूतकाळाच्या फसव्या सोयिस्कर वर्णनात जनतेला गुंगवून ठेवणाराच नेता हवा! आईवडिलांबद्दल हळव्या आठवणी सांगणारे नेते काय कामाचे! तिथे नॉनबायोलॉजिकल व्यक्तीच हवी!
अगदी मान्य!
मला ते मांडीवर बसणं हे
मला ते "मांडीवर बसणं" विवादास्पद सुद्धा वाटलं नाही. नवरा बायकोची इंटिमसी इतकी जज केली जातेय त्याचीच कमाल वाटली. तो व्हिडिओ मी पाहिला नाही पण कॉन्ट्रोव्हर्सी पोचली. ते खूप मोठं घराणं आहे म्हणून त्यांना जज करणं आपलं आद्यकर्तव्य होत नाही. घराण्यापलिकडे त्यांना त्यांची जडणघडण, संघर्ष आणि प्रचंड तणाव होता/ असतो. राजीव गांधी जिवंत असताना त्यांचं कुटुंब पूर्ण होते, व काही प्रसंग अगदी आनंदाचे असतील. ते चौघे एकमेकांसोबत असतानाच्या काळातल्या स्मृती आहेत ह्या. पुन्हा त्यांना असा सहवास अशी इंटिमसी किती क्वचित लाभली आहे म्हणूनही ह्या स्मृती अधिक अनमोल , अधिक ecstatic झाल्या आहेत. त्या पैकी साधीशी गोड आठवण राहुलला सांगाविशी वाटली इतकंच. घराण्यापलिकडे असलेल्या कुटुंबाच्या गोष्टी आहेत, त्या आता त्यांनीही कुठेतरी जतन करून ठेवल्या आहेत. आपण फक्त रिस्पेक्ट करू शकतो, समजून घेऊ शकत नाही. त्यांचं आयुष्य अत्यंत असुरक्षित गेलं आहे, त्यांचा माईंडसेट वेगळा आहे. पुस्तकापलिकडची, घराण्यापलिकडची, राजकारणापलिकडची म्हणून सुद्धा उरतात ही माणसं. आपण तेवढं समजून घेऊ शकतो. त्यामुळेच या पुस्तकाबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. As a person आपण कुणालाच ओळखत नाही, त्यामुळे त्यांचे अनुभव, आठवणी किंवा त्यांनी काय शेअर करावं/ करू नये हे आपण ठरवू शकत नाही. त्यांचं नॉर्मल आणि आपलं नॉर्मल सगळ्याच लेव्हलवर वेगळे असणार ना! हे विचित्र वाटणाऱ्या कुणाच्या आजीला गोळ्या घालून मारलं आहे, काका विमान अपघातात दगावला आहे किंवा बाबांच्या चिंधड्या उडवल्या आहेत. ते समजून घेता येत नाही तसं हेही!
यांनी ( नेट भगव्यांनी)
यांनी ( नेट भगव्यांनी) नेहरू आणि त्यांची भाची नयनतारा सहगल यांच्या फोटोत विकृत अर्थ शोधले.
मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ते आणि सोनियांचे विकृत फोटो शेअर केले.
आता सोनियांचं पुस्तक आल्यापासून पुन्हा एकदा प्रत्येक ठिकाणी बारबाला हा शब्द घेऊन , अनेकदा भलतेच फोटो घेऊन विकृत टिप्पण्ण्या केल्या. शाखेतली कुजबूज उघडपणे बोलायची सवय लागलेल्या अनंत हेगडे या यांच्या नेत्याने केल्या तशा विकृत कमेंट्स केल्या.
डोक्यातच विकृती आणि द्वेष भरलेले असल्याने आणि प्रेम म्हणजे काय हे माहीतच नसल्याने प्रेमाची सहज अभिव्यक्ती तरी यांना कशी रुचणार ?
त्याच भाषणात तो त्याच्या
त्याच भाषणात तो त्याच्या आईच्या एरवी तल्लख असणार्या स्मरणशक्तीबद्दल बोलला आहे. तिला नवरा गेला त्या दिवसाचं मात्र काही काही आठवत नाही! केवढा खोल ट्रॉमा असेल आपण कल्पनादेखील करू शकत नाही. हे ऐकताना ज्यांचं काळीज हललं नसेल आणि त्या साताठ मिनिटांतल्या एका उल्लेखावरच ज्यांची सुई अडकली असेल त्यांच्या माणुसकीबद्दल काय बोलावं!
स्वाती , अस्मिता +१
स्वाती , अस्मिता +१
त्याही पुढे जाऊन नन ऑफ माय बिझनेस हे ही आहेच. + कोणी भीड न बाळगता, काही 'कव्हर' न करता, जे जसं आहे तसं सांगत असेल, ते लोकांना कसं दिसेल, त्याने आपली प्रतिमा कशी होईल, असं काहीही इंजिनिअर न करता, उगा मनाला प्रतिबंध न लावता सांगत असेल, कँडिडली बोलत असेल तर ते मला आवडलं.
त्याही पुढे जाऊन उजवे लोक राहुल काहीही बोलला तरी टर आणि विपर्यास करणारच आहेत, तर त्या निमित्ताने समाजाला एक पाऊल पुढे घेऊन जाणे/ प्रामाणिक वागणे इ. का करू नये?
एकदा चित्रकेतूने भगवान
एकदा चित्रकेतूने भगवान शिवांना देवी पार्वतीला मांडीवर बसवून सभेत विराजमान झालेले पाहिले. भगवान शिवांसारख्या महान योगीश्वराने पत्नीला मांडीवर बसवून एखाद्या सामान्य गृहस्थाप्रमाणे सभेत बसावे, हे चित्रकेतूला अनुचित वाटले. त्याने भगवान शिवांच्या या वर्तनाची निर्भत्सना केली आणि त्यांना निर्लज्ज म्हटले. चित्रकेतूच्या या टीकेमुळे देवी पार्वती क्रोधित झाली आणि तिने चित्रकेतूला शाप दिला.
- श्रीमद्भागवत महापुराण – स्कंध ६, अध्याय १७, श्लोक २८
अस्मिता +१
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.
छान ओळख.
छान ओळख.
बाप्याने कायदेशीर रित्या बाईला मांडीवर बसवणं नैसर्गिक दृश्य आहे.
पण बाप्याने बाप्याला मांडीवर घेऊन भरवणार्या संस्कृतीला ते खटकणारच. जेजुरीला जाताना बायकोला उचलून घेऊन जावं लागतं. हा त्यातल्या त्यात देवाच्या आडून केलेला पब्लीक रोमान्स असतो. म्हणून तर नवविवाहितांमधे देवदर्शनाचं आकर्षण निर्माण होतं. दक्षिणेत तर कडेवर घेऊन मंदीरात जावं लागतं. अशानेच परंपरांची गोडी लागून संस्कृती टिकून राहते.
https://www.npr.org/2016/10
https://www.npr.org/2016/10/07/497087141/donald-trump-caught-on-tape-mak...
हे विकृत कसे वाटले नाही शेंडेनक्षत्र?
(No subject)
या माणसाला प्रश्न विचारून
या माणसाला प्रश्न विचारून मोठं करू नका. तो विकृत आहे आहे हे त्यालाही माहिती आहे.
याच्या नशिबात कधीतरी सहजसोपंऑर्ग्गॅनिक असं प्रेम यावं अशी प्रार्थना. पण ते होणार नाही, ते माहितीय.
आवडला परिचय! पुस्तक वाचायचे
आवडला परिचय! पुस्तक वाचायचे आहेच.
सोनिया गांधींबद्दल आधी एक दोन पुस्तकांत वाचले आहे त्यावरून कायम आदरच वाटलेला आहे (त्यातले एक बहुतेक "२४ अकबर रोड"). त्यांच्या राजकीय गोष्टी सगळ्या आवडल्यात असे नाही पण एक व्यक्ती म्हणून कायमच डिग्निफाइड वाटल्या आहेत. माझ्या डोक्यात त्यांची कायमची ठसलेली इमेज म्हणजे भारताने २०११ चा वर्ल्ड कप जिंकताना धोनीने ती सिक्स मारल्यावरची त्यांची प्रतिक्रिया. क्रिकेटप्रेमाची काही वैयक्तिक पार्श्वभूमी नव्हती त्यांची. पण एखाद्या अस्सल क्रिकेटप्रेमीप्रमाणे उत्स्फुर्तपणे उभे राहून हात वर केलेले आणि चेहर्यावर अकृत्रिम हास्य! यानिमित्ताने केलेल्या रागाच्या भाषणाची आणि त्या समारंभाच्या इतर एक दोन क्लिप्सही पाहिल्या. एरव्ही काँग्रेसच्या सभांमधे अलिप्त गांभीर्याने वावरणारी ही बाई काल स्वतःच्या पंचाहत्तरीच्या सोहळ्यात मिळत असलेल्या अटेंशनने बुजलेल्या एखाद्या आजीसारखी वाटली.
रागाही मस्त बोलला. इटलीतील त्या रेस्टॉ मधे गेल्याचा किस्सा मजेदार होता. "मांडीवर" बद्दल खूप पोस्टी कालपासून फिरत आहेत. अशा लोभस सोहळ्यातून तेवढे एकच पकडून काहीतरी आचरट विनोद आणि शेरेबाजी करून काय मिळते ते ते करणार्यांनाच माहीत. देश, धर्म, वंश, सोशल स्टेटस सगळे वेगळे असताना प्रेमात पडलेले आणि लग्न केलेले कपल जेव्हा त्यांना प्रायव्हसी मिळत असेल तेव्हा थोडे टची फीली असेलही. त्याचे काय एवढे?
समोरच्या खुर्च्यांमधे मोदी दिसले असते तर आवडले असते. एरव्ही कितीही विरोध असेना. नरसिंह राव/ममो - वाजपेयी यांच्या जमान्यात हे इतके कल्पनेतही शक्य नसल्यासारखे वाटले नसते. मोदी सध्या भारतात नाहीत पण या गोष्टी आधी ठरवून होतात. हे प्रकाशन आत्ता इंदिरा गांधींच्या जयंतीच्या १-२ दिवस आधी आले हा योगायोग आहे की ठरवून केले आहे कल्पना नाही.
Pages