खूप लांब झाल्याने स्वतंत्र धागा काढला. संयुक्त धागा आहे, कुणालाही काहीही लिहावं वाटलं तर आवर्जून लिहा. फक्त चित्रपटच नाही तर रामायणाच्या अनुषंगाने असलेली सगळी माहिती, चर्चा, गंमत व चित्रपटावरील अभिप्राय इथे चालतीलच. अवांतराचे सुद्धा स्वागत आहे. गडबडीत पटकन लिहून टाकलेय. सांभाळून घ्या ! स्पॉयलर्स आहेत थोडेफार.
---------
रामायण - रणबीर कपूर (राम), साई पल्लवी (सीता), यश (रावण), रवी दुबे ( लक्ष्मण), अरूण गोविल ( दशरथ), आदिनाथ कोठारे (भरत), लारा दत्ता ( कैकयी), रकुल प्रीत (शूर्पनखा) , विवेक ओबेरॉय (विद्युतजीव- माझ्या माहितीप्रमाणे विद्युतजिव्हा होते शूर्पनखेच्या नवऱ्याचं नाव) , अजिंक्य देव (विश्वामित्र) , शीबा चड्ढा (मंथरा), सौरभ सचदेव ( मारीच) , काजल अगरवाल (मंदोदरी), फैजल मलिक (कुंभकर्ण). हा पंचायत मधला प्रल्हाद. शोभना पिल्लै (केकसी)
मला "रामायण" आवडला. कुठेही कंटाळवाणा होत नाही. मुलांना सुद्धा आवडला. खूप मजा आली आणि व्हिएफएक्स उत्तम आहेत म्हंटले. रिअल डी थ्री डी मधे पाहिला. सगळ्यात कमाल म्हणजे तगडे मार्केटिंग - आमच्या घराजवळच असणाऱ्या एएमसी मधे आला. तेथे कधीही कुठलाही भारतीय चित्रपट येत नाही कारण आमच्याकडे अजिबात डायव्हर्सिटी नाही. त्यामुळे फारच बरं वाटलं. त्यामुळे तर आवर्जून लगेच गेलो. तीन तास दहा मिनिटांचा रनटाईम आहे. चार तासांचाच कार्यक्रम झाला.
कथा तर सर्वांनाच माहीत असणारीच आहे पण तरीही काही गोष्टी उकरून नवीन जोडल्या आहेत. सुरवात एरवी श्रावण बाळाच्या गोष्टी पासून होते. तो शाप मग दशरथाला आशा आणि पुत्रकामेष्टी यज्ञ आणि चार मुलं. पण यांनी मुद्दाम ते सगळं टाळलं आहे व रावणाचे पूर्वायुष्य दाखवलं आहे. जे मला माहिती होते पण त्याला एक साऊथ इंडियन छाप दिला आहे. त्यात बऱ्याच चुका आहेत. माझ्या माहितीप्रमाणे तुलना केली तर काही गोष्टी उगाच वाढवल्या आहेत किंवा फक्त फिल्मी करण्यासाठी वेगळ्या दिशेने नेल्या आहेत. सुरवातीला रावणाला खूप, खूप फुटेज आहे. खरंतर रावणावर एक तास झाल्यावर मग राम येतो म्हंटले तरी चालेल. मलाही रावणायन वाटलं बऱ्यापैकी. थोडा कंटाळा आला तेव्हा आणि रामाची "पल पल है भारी वो विपदा है" आयी करत वाट पाहू लागले. थ्रीडी मुळे आणि राक्षस पाताळात राहात असल्याने थोडा अंधार वाटत होता पडद्यावर. किंवा पहाटेच्या अंधुक प्रकाशात केलेलं चित्रिकरण कसं दिसेल तसं दिसत होते. पण हे थ्री डी लव्हर्सना आवडतही असेल. मी ओल्ड स्कुल आहे एकदम, आहे त्याच खुर्चीवर आपलं सरळ सरळ दाखवा काही उडायबिडायचा- अंगात येऊन घुसायचा अनुभव नको. जास्त स्टिम्युलेशन सोसवत नाही गटात. तुम्ही जर चांगली कलाकृती केली असेल तर आम्हाला उडवायची, घुसवायची गरज नाही, जशी आहे तशी अनुभूतीही पोचू शकते. शिवाय देहबोली - आता हे थ्री डी मुळे की काय मला बऱ्यापैकी फ्रोजन वाटली काही जणांची. शेखर सुमनचे जुने मुव्हर्स ॲंड शेकर्समधे चेहरा लालूचा लावून ओठ तोच हलवून बोलायचा त्याची आठवण झाली. पण सगळ्यांची नाही अर्थात. दशरथ, दोन राण्या आणि ऋषी मुनी. बेसिकली ज्येना.
ज्येना हलत नव्हते पण बोलत होते. घरी ते दारी!
आधीचे रावणायन व त्यावर सौदिंडियन छाप - यासाठी रावणमाता केकसी हिने असुरांच्या वतीने युद्धात भाग घेतला होता व इंद्राला विष्णूचे वरदान असल्याने तो विजेता झाला व असुरांचा पराभव झाला. यातली एक नॅक - रावण राक्षस होता का असुर होता? दोन्ही वेगवेगळे आहेत. असुर हे सुरांचेच चुलत भाऊ व राक्षस पृथ्वीवर राहणारे होते. ह्याची मलाही खात्री नाही. पण दितीचे दैत्य, दनुचे दानव, अदितीचा आदित्य, विनितेचे वैनतेय गरूड. यात नेहमी फक्त सुरा पिणारे सुर ( देवता) व न पिणारे ते असुर असेही वाचले आहे. ज्यात राक्षस कुठेच नाहीत. कारण ते पृथ्वीवासी होते नेहमीच. त्यामुळे मला ह्या युद्धाचा प्रपंच नीट कळाला नाही. त्यात केकसी राक्षस वंशाची व रावणाचे वडील पुलस्त्य वंशी ऋषी. त्यामुळे रावण अर्धा राक्षस - अर्धा ब्राह्मण. इथे त्याच्या वडिलांचा लवलेशही दाखवला नाही पण सतत जाणवं घातलेलं मात्र दाखवलं आहे. पण एवढं आवर्जून म्हंटले आहे की बिभिषण पित्यावर गेला आहे, कुंभकर्ण आणि शुर्पनखा आजोळवर आणि रावण मात्र "बेस्ट ऑफ बोद वर्ल्ड्स" असल्याने बळ आणि बुद्धी दोन्ही त्याच्या ठायी जन्मजात आहे.
अगदी सुरुवातीला केकसी आणि असुर गट यांचा दणदणीत पराभव होऊन इंद्र जिंकून घेतो आणि लंका कुबेराची असते तेथे पाताळात या पिडीत राक्षसांना राहावे लागते व तेथे त्यांची अन्नान दशा होते. मग केकसी रावणाला उचकावते, तू यांना याच्या बाहेर काढ. तू जर हे तुणतुणं वाजवत बसलास तर आमचं काय होणार. (वीणा)
येथे पूर्ण साऊथ इंडियन छापाची दुर्दशा व तारणहाराची वाट पाहणारी प्रजा. वर लंका कुबेराची म्हणून देव असुरांवर वाटेल तसा अन्याय करत आहेत असे दाखवण्यासाठी खूप वेळ घालवला आहे. मग रावण तपश्चर्या करायला निघून जातो व सगळे लूपहोल ताडून जवळपास अमरत्वाचे वरदान मागतो. परत आल्यावर त्याचा रजनीकांत झालेला असतो तो दे दणादण- दे दणादण देवांना एकटाच मारायला सुरुवात करतो. देवांचे ढीगच्या ढीग! एवढे तर एखाद्याच्या देवघरातही नसतील. चक्क साऊथ इंडियन स्टाईलने मां का कर्ज+ बदला= देवांचे ढीग. पण कुबेर पळून जातो कारण देव तर मरत नाहीत. इथे लूपहोल - लंका पार्वतीसाठी महादेवाने घडवली, नंतर कुबेराने मागितली तर भोळ्या सांबाने त्याला दिली आणि कुबेर रावणाचा सावत्र भाऊ होता. ह्याचा उल्लेखच नाही. रावणाने लंका त्याला मागितली व त्याने देऊन टाकली होती. त्यामुळे तर दागिने न ल्यालेल्या स्त्रियांसाठी "लंकेची पार्वती" ही म्हण आहे. कारण मुळात सोन्याची लंका पार्वतीची होती पण तिला मिळालीच नाही. हे "रजनीकांतीकरण" विनाकारण होते. कुठल्यातरी व्हर्जन मधे हे होते असे म्हणून काहीही खोडून काढता येते, कसेही वाढवता येते हाच पौराणिक कथांचा फायदा आहे.
पण हिरो लार्जर दॅन लाईफ दाखवायला आधी व्हिलनला त्याहीपेक्षा खौफनाक दाखवायची नेहमीची क्लृप्ती रामायणासाठी अनावश्यक होती. राम लोकांच्या जनमानसात आद्यनायक आहे, मर्यादापुरुषोत्तम आहे. त्यामुळे रावणही आपोआपच आद्यखलनायक होताच. असो. क्रिएटिव्ह लिबर्टी. ती बोअरिंग नाही मात्र. त्यांनी ती रंजक- वेधकच केली आहे.
जटायू लहानपणापासून रामाच्या आयुष्याचा भाग होता हे एक नवीन. तो नेहमीच अयोध्येला हॅंग आऊट करताना दिसला. त्याचं रामावर जातीने लक्ष होतं. एवढंच काय तो चोचीतून घंटा सोडायचा, त्या राम डोळ्यांवर पट्टी बांधून लक्षवेधी बाणाने मारून टणत्कार घुमवायचा. ऐकावे ते नवलच! रावणाला फुटेज दिल्याने राम वसिष्ठांच्या आश्रमात जे शिकला ते फारच कमी दाखवून पुन्हा जटायूला "घंटा ट्यूटर" केले आहे.
हे सगळे बघायला चांगलेच वाटावं असे व्हिज्युअल्स ठायी ठायी आहेत फक्त मलाच आवर्जून लिहावं वाटलं. कैकयीच्या रोलमधे लारा दत्ता आवडली, मस्त काम केले आहे.अरुण गोविलही बरा वाटला, त्याला विशेष कामच नाही. हेही पथ्यावर पडले.
अजिंक्य देव विश्वामित्र म्हणून खूप मस्त सरप्राइज होतं आणि त्याचं कामही छान आहे आणि तो दिसलाही छान. सिक्स पॅक, उंचे पुरे मादक ऋषी पाहायची सवयच नव्हती. शीबा चड्ढा अगदी पर्फेक्ट मंथरा आहे. मला तिचं काम नेहमीच आवडतं. रादर मला सगळी कास्टिंग पर्फेक्ट वाटली. साई पल्लवी खटकली नाही , चालून गेली. इथे सीतेला तलवार चालवताना व अभ्यास करताना शिवाय शेतीचे प्रशिक्षण देताना दाखवलं आहे. आणि काही वेळा ती लढतानाही दाखवली आहे. पण एवढी शांत, विचारी असूनही सुवर्ममृगाचा एक मोहाचा क्षण आणि कैकयीचा एक दुस्वासाचा क्षण, त्यांना त्यांच्या स्वभावाच्या विपरीत वागायला भाग पडतो. सौरभ सचदेव एकदम मारिचासारखाच छद्मी वाटतो, फार संवाद नाहीत तरीही लक्षात राहातो.
रावणाचे कमळासारखे फिरणारे पुष्पक, ग्रहताऱ्यांसाठी केलेली यंत्रणा फार वेगाने दाखवली आहे. शिवाय इंद्राचा एआय ऐरावत व गेंड्यांवरून असुरांनी केलेलं युद्ध जरा कैच्याकै वाटले. गेंड्यांना झूल पांघरली तरी त्याचा युद्धात वापर केला जात असेल?! एआय सिजिआय वापरता येते म्हणून उद्या डायनासोर घेतील पण झेपायला हवं.
खरदुषण सोबतच्या युद्धात कुत्री जी हाईना सारखी वाटतात ते पाहायला बरं वाटलं. सीता बुद्धिमान दाखवली आहे, ती लक्ष्मणाचा वास ह्या कुईनांना ( कुत्री+ हाईना) लक्षात राहू नये म्हणून जखम पाण्याने धुवून काढते. नंतर उपचार करते. तिचं बुद्धिमान असणं फार वरवरचंच दाखवलं आहे पण "नहीं मामुसे नकटा मामु अच्छा!"
रणबीर कपूर मला नेहमीच आवडतो, यातही आवडला आहे. यापेक्षा जास्त चांगले कोणी दिसलेही असते आणि वयही जास्त आहे पण त्याचा वावर आणि काम दोन्ही आवडले. त्याचा आवाज आणि देहबोली अजिबात चंचल न वाटता कुठेतरी सतत स्थितप्रज्ञ आणि विचारी वाटते. एखादं माणूस एकाच वेळी व्हल्नरेबल आणि कणखर दोन्ही असणं - सुपरपावर नसूनही ईश्वर होत जाणं हे रामाचं मर्यादापुरुषोत्तम असणं होय. तो जास्तीत जास्त माणूसच वाटायला हवा. तसा हा वाटला आहे. त्याचे संवादही चांगले आहेत. त्याचे व सीतेचे मोजकेच संवाद आहेत , तरीही कंफर्टेबल वाटतात. लक्ष्मणाचे काम चांगले आहे, विनोदी केले आहे. पण फक्त ताण हलका करण्याइतपत विनोदी वाटेल इतकेच. गोड चेहरा आहे त्याचाही.
विवाहाच्या वेळी खूप सुंदर वाटतं पाहायला पण दागदागिने मला आवडले नाहीत. काही वेगळेपणा नाही. अयोध्येचे, मिथिलेचे आणि लंकेचे लोक सारखेच दागिने घालतात असं वाटलं. जे शक्य नाही. कपडेपट वेगळा आहे पण दागदागिन्यांत वैविध्य दिसलं नाही. मला रणबीरची धनुर्विद्या/ ती देहबोली आवडली. बाण मारणारे काही शॉट्स जमून आलेत. आर्चरीचे ट्रेनिंग घेतलं असावं त्याने.
चित्रिकरण छान आहे. काही ठिकाणी अतिशय सुंदर दृश्य आहेत. काही ठिकाणी मात्र खोटं वाटतं, जसं की ताडका, खर, दुषण, कुंभकर्ण हे सिजिआय असल्याने उगाच अवाढव्य आणि लिबलिबीत शरीराचे मांसाचे गोळे वाटतात. हॅग्रीडचे मावस भाऊ केल्यासारखे वाटले पण चेहरा तरी जिवंत द्यायचा असता. ट्रोल टाईप चेहरे आहेत.
संगीत - पार्श्वभूमीवर जे येते ते सुरेख आहे. कुठे घंटेची किणकिण, नदीचा प्रवाह, मंत्रांचे ध्वनी, शांतेतेचे नाद, पक्ष्यांचा किलबिलाट, रथांची चाकं , टणत्कार वगैरे उत्तम. मला "मंगल रंग" गाणं खूप आवडलं. त्यात काही तरी"अवधी" आहे. अजिबात कव्वाली सारखे वाटले नाही. जसं असायला हवं तसंच आहे. गुणगुणत राहावं असं आहे.
रावणाचे काम चांगले आहेच आणि अपेक्षेपेक्षा जास्त आव्हानात्मक आहे. खूप छटा आहेत. स्वतःच्या बहिणीवरच्या प्रेमापासून तिच्या नवऱ्याला मारण्यापर्यंत. बऱ्याचदा विधिनिषेध राहात नाही, दोन मनांमधे संवाद होऊन अहंकारी मन तेवढं जिंकते. दशबुद्धी दशानन रावण कसा दहापट बुद्धी असलेला होता वगैरे विषादाच्या रूपाने येऊन जातं. पण अजून "डेफ्थ" येऊ शकली असती याला. VFX खूप कमी ठिकाणी खटकले असं वाटलं. त्यापैकी इथे अगदी योग्य वापर झाला आहे. दहा तोंडे, दहा शरीरं आणि दहा विचार. मग त्यात सगळ्याच भावना येऊन अहंकाराचाच विजय होतो. कल्पक वाटलं.
मी बऱ्याच त्रुटी लिहिल्या आहेत पण चित्रपट मला आवडला आहे. रंजक आणि एंगेजिंग आहे. कामं चांगली आहेत. काही गोष्टी अतिशय जलद वाटतात. उगाच फापटपसारा नाही पण काही गोष्टींवर खूप वेळ घालवून काही तरी नवं द्यायचा प्रयत्न केला आहे. मी एन्जॉय केला सिनेमा. राम-रावण हा विषय कोळून प्यायलेला आहे त्यामुळे खरेतर एंगेजिंग करणं चॅलेंजिंग असेलही आणि आदिपुरूषचा धसका घेतलेले प्रेक्षकही आहेत. पण तरीही मजा आणतो सिनेमा. रामायण - महाभारत म्हणजे आपली पाळेमुळे - ज्यावर आपली नीतीमुल्ये सुद्धा कुठेतरी पोसलेली आहेत त्यामुळे यावेळी तेच महाकाव्य कशा नव्या स्वरूपात आलं असेल हे पाहण्याची उत्सुकता होती आणि मजाही आली. मी एक "प्लेटो" आलेला प्रेक्षक आहे, मी सगळ्याला समान दृष्टीने पाहायचा निदान प्रयत्न करते. मला होमरचे ओडिसी आणि वाल्मिकीचे रामायण सगळेच कुठंतरी मेटॉफॉरिकल काव्य होते हे माहीत आहे आणि प्रत्येक जण अनादी काळापासून आपापल्या परीने त्या काव्याचे वेगवेगळे अनोखे अर्थ लावत आहे. कथा तशी सरळसोटच असली तरी अर्थ अनेक निघू शकणे हीच कुठल्याही काव्यामागची गंमत असते. खूप अपेक्षा न ठेवता ती गंमत जाणून घ्यायला पाहायचा असेल तर नक्की पाहा.
-अस्मिता.
<<< रणबीर आणि साई पल्लवीला
<<< रणबीर आणि साई पल्लवीला उगाचच ट्रोल केलं. दोघेही आवडले
>>>
+७८६
तसे मी तर सपोर्टच केलेले.
कारण ट्रेलर बघून नावे ठेवण्यात काही अर्थ नव्हता. पिक्चर ट्रेलरच्या पलीकडे आहे.
रणबीर आणि साई पल्लवी दोघे मलाही छान वाटले. मी तिचे काही साऊथ चित्रपट पाहिले आहे आणि त्यात मला ती आवडलीच होती.
रणबीर सुद्धा संयत व्यक्तिमत्व छान दर्शवतो. राम म्हणून साजेसा वाटला. फक्त एक मिसिंग वाटले ते म्हणजे आवेश दाखवताना कमी पडतो. म्हणजे शिट्ट्या टाळ्या खेचत नाही. तो अनुभव आज थिएटर मध्ये आला नाही. पण लोकांना आवडला चित्रपट.
सीतेला नीती अनितीची समज दाखवलीच. पण सोबत दिलेली ॲक्शन दृश्य सुद्धा आवडली. सहज अपहरण होणारी बाई दाखवली नाही. बाहुबली चित्रपटात जसे देवसेना दाखवली होती त्याची आठवण झाली. ते फार आवडीचे कॅरेक्टर होते.
>> यांनी रामायणाचा शिनुमा कसा
>> यांनी रामायणाचा शिनुमा कसा केला , कोणाचा अभिनय कसा आहे, कपडेपट . स्पेशल इफेक्ट्स इ. पाहण्यासाठी मी थेटरात जाऊन हा चित्रपट पाहणार नाही. <<
मुला नातवंडांना घेऊन पाहा हो भरत थेटरात जाऊन.
समकालीन पॉप आर्ट आहे ती कितीही भंगार तरी ती कन्स्यूम करावी या मताचा मी आहे.
शिवाय यात काही अनपेक्षित गोष्टी सापडतात. दशरथ कशी भाषणे देतो किंवा उलट्या पालट्या उड्या मारून मारून बाण सोडताना सुद्धा रामलक्ष्मणाची धोतरं कशी फुगत नाहीत आणि वर खाली येत नाहीत इत्यादी इत्यादी लहान सहान गोष्टी मनाला आनंद देऊन जातात.
म्हणजे शिट्ट्या टाळ्या खेचत
म्हणजे शिट्ट्या टाळ्या खेचत नाही>>> त्याची गरजही नाही वाटली. रामाची संयमित, शांत, विचारी भूमिका त्याने वठवण्याचा उत्तम प्रयत्न केलायं. आज चित्रपटगृहातल्या प्रेक्षकांप्रती मला आदर वाटला. कुठेही अति - उत्साह दिसला नाही. टाळ्या नाहीत की शिट्या नाहीत. श्रीरामाचा चित्रपट असूनही रामनामाचा घोष नाही. हे सगळं आवडलं. चित्रपट हाऊस फुल्ल होता. पूर्ण चित्रपटगृह श्वास रोखून सिनेमा पाहत होते. सगळ्यांना चित्रपट आवडला असेल असं वाटलं.
<<< श्रीरामाचा चित्रपट असूनही
<<< श्रीरामाचा चित्रपट असूनही रामनामाचा घोष नाही. >> हो, मलाही याची भीती वाटत होती. म्हणजे हे कलाकृतीला दाद द्यायला उत्स्फूर्त आले की बरे वाटते. माहोल बनतो. पण एखाद्या पूजनीय व्यक्तिरेखेबाबत शो ऑफ करणारा आदर किंवा फॅड म्हणून घोषणा देणे हे रसभंग करणारे ठरते.
चित्रपट बनवताना सुद्धा मला वाटते एकांगी होणार नाही याची काळजी घेतली आहे. रावण क्रूर एके क्रूर न दाखवता तो देखील आधी योद्धा बनून आपल्या सन्मानासाठी लढताना दाखवला आहे तर लक्ष्मणाने सुद्धा शूर्पणखा प्रकरणात थोडा आगाऊपणाच केला हे मान्य केले आहे. पण त्याचसोबत कैकेयीने केलेल्या वनवासापासून नाक कापेपर्यंत सगळ्याच गोष्टी राम-रावण यांचे युद्ध व्हावे यासाठीच रामाच्या भाग्यात लिहिल्या होत्या हे पोहोचते.
केकू >> रॉजर एबर्ट वाल्याने
केकू >> रॉजर एबर्ट वाल्याने तो इंग्लिश मधला २:४५ तासांचा सिनेमा पाहिला. तो बहुतेक तरी काही जमलेला नाही. एकतर हे दोन वेगळे का केले त्यात काही पॉइंट नव्हता असे माझे मत आहे. इथल्या लोकांनी RRR चालवून डोक्यावर घेतला तसा हा पण घेतला असता. इंग्लिश आणि तो सुद्धा AI वापरून करून त्यांनी पायावर धोंडा पाडून घेतला आहे.
बाकी मी पण रूपाली सारखेच म्हणेन. शिट्ट्या टाळ्या पेक्षा प्रेक्षक सगळे खिळून बघत होते. शेवट पर्यंत mesmerizing होते. संपल्यावर मग टाळ्या वाजल्या.
जे नावं आल्यावर लगेच गेले त्यांनी हनुमानाचा सीन मिस केला. आणि शेवटची हनुमान चालीसा खूपच सुंदर जमलेली आहे. त्यात रहमानाने त्याचे आवडते गायक आणल्याने एकदम फरक पडला असे वाटले.
मलाही रूपाली सारखेच वाटते.
मलाही रूपाली सारखेच वाटते. राम संयमी, शांत आणि विचारीच वाटायला हवा आहे. वाचतेय हं!
रात्रीचे अकरा व पाऊस सुरू झाल्याने ड्रायव्हिंग करत घरी यायचं असल्याने पहिल्या नावालाच उठलो. हनुमान चालीसा युट्यूबवर मिळाली तर पाहेन. फेफची पोस्ट वाचल्यावर क्लिक झाले.
देवसेनाला मम ऋ .
>> मला रणबीरची धनुर्विद्या/
>> मला रणबीरची धनुर्विद्या/ ती देहबोली आवडली. बाण मारणारे काही शॉट्स जमून आलेत. आर्चरीचे ट्रेनिंग घेतलं असावं त्याने. <<
अस्मिता, लॉर्ड ऑफ दी रिंग्स च्या कानटोक्यांनी / पानकान्यांनी / सूचिकान्यांनी ( elf) विशेषत: लेगोलास ने सुपरफास्ट आर्चरी कशी करावी याचा एक अत्यंत इलॉजिकल पायंडा पाडला.
पुढच्या भागात हनुमानासह
पुढच्या भागात हनुमानासह वानरसेनेतील एकेक कॅरेक्टर, रामसेतू बांधणे, हनुमानाने लंका जाळणे, झोपाळू कुंभकर्ण, मायावी इंद्रजीत, हनुमानाचे पर्वत उचलून आणणे वगैरे बरेच आयटम असे आहेत ज्यात स्पेशल इफेक्ट आणि कल्पकता दाखवायला पुरेपूर वाव आहे. जमले तर बघायला मजा येईल.
रणबीर कपूर करिअरच्या
रणबीर कपूर करिअरच्या सुरुवातीच्या सिनेमांत जत्रेत चुकलेल्या पोरासारखा, विरही लव्हरबॉय टाईप चेहरा करून वावरलेला. त्याकाळी ते अनेकींना क्यूटबिट वाटलेलं. त्यामुळे त्ये अजून त्याच साच्यात अडकून पडलंय.
पण आता हा थोराड ॲब्सेंट माईंडेड टोणगा 'राम' म्हणून फार वेळ सहन करणं शक्य होत नाही. हजमच होत नाही.
म्हणजे ठीक आहे, नाय जमत एखाद्याला इतर भाव चेहऱ्यावर प्रकट करणं. पण प्रयत्नही करता येऊ नये म्हणजे काय!
शिवतांडव स्तोत्रम् चा सीन कानांना, डोळ्यांना सुखद वाटला. रावणाचा तो डान्स आवडला.
सीतेची छान शोभेची बाहुली करून टाकलीय या लोकांनी. अपेक्षेप्रमाणेच.
संवाद थातूरमातूर वाटले. विशेषत: रामाच्या बाजूच्या संवादांमध्ये तरी अजून डेप्थ पाहिजे होती. सारखं सारखं हवेत उडून हाणामाऱ्या करत बसणाऱ्या रामाऐवजी थोडा तत्वज्ञ रामा वर अधिक भर दिला असता तर बरं झालं असतं.
दृश्यं चांगली आहेत. सेट, कॉस्च्युम वगैरे सगळं चांगलं आहे. मनाचं रंजनही चांगलं झालं. पण सिनेमा बघून उठल्यावर काही मिळालं असं वाटलं नाही.
आधीच एवढं जडजड वाचता तुम्ही
आधीच एवढं जडजड वाचता तुम्ही, अजून पिक्चर मधे कशाला हवं तत्त्वज्ञान? इटर्निटी पर्यंत न नेता मोमेंटरिली एन्जॉय करावं नाहीतर खटकवून घ्यावं आणि बसावं. हे घ्या तत्त्वज्ञान.
राम चिरंतन असेल तर तो असा तुकड्यात कसा मावेल.
मागे कधीतरी राम आणि कृष्णाबद्दल लिहिले होते. ते इथे चिकटवते. काही जणांनी वाचलेले असेल. तेव्हाही संप्रतिंनीच विषय सुरू केला होता, त्यामुळे ही चर्चा आठवली.
ओह, रॉय. लक्षात आले. तंत्रज्ञानाच्या अतिकृपेने "आता वाढता वाढता वाढे, भेदिले शून्य मंडळा" पाहावं लागणार आहे.
>> "आता वाढता वाढता वाढे,
>> "आता वाढता वाढता वाढे, भेदिले शून्य मंडळा" <<
स्पॉइल(र)स्पोर्ट होण्याचा धोका पत्करून म्हणावेसे वाटते यांची धाव फार फार तर डॉक्टर स्ट्रेंज सारख्या Dormammu किंवा silver surferच्या गॅलॅक्टस पर्यंतच.
>> भेदिले शून्य मंडळ << कधी कधी वाटते की आपल्या लोकांनी स्पेस इमॅजिन करताना फारच एक्यूरेसी दाखवली होती की काय? कमाल कांसेप्ट वाटली शून्य मंडळ म्हणजे.
>> पण त्याचसोबत कैकेयीने
>> पण त्याचसोबत कैकेयीने केलेल्या वनवासापासून नाक कापेपर्यंत सगळ्याच गोष्टी राम-रावण यांचे युद्ध व्हावे यासाठीच रामाच्या भाग्यात लिहिल्या होत्या हे पोहोचते. <<
हा नियतिवाद दिसायला नको पाहिजे होता. आपल्याला रामायणाची स्टोरी माहिती आहे म्हणून आपल्याला पुढे काय होणार हे माहितच असते. हा एक क्रूर नियतीवादच आहे म्हणा. परंतु कथेच्या लॉजिक ने गोष्टी घडतात असे दाखवले की मज्जा येते. मला याच कारणाने dune आवडत नाहीत. ३ बॉडी प्रॉब्लम सिरीज सारखी एपिक मात्र मुद्दाम आवडते कारण पुढे काय वाढून ठेवले आहे याची सुत'राम' कल्पना येत नाही.
रामायणाबाबत आता थोडा
रामायणाबाबत आता थोडा क्रिएटिव्हीटी डेड एन्ड आलेला आहे, unless खरंच कुणी खोलवर अभ्यास करून नवीन पर्स्पेक्टिव्ह मांडायला सुरुवात केली तरच. आर्थिक गणितापुढे सखोल अभ्यास टिकत नाही, गरजेचा वाटत नाही हे वास्तव आहे किंवा काळाची गरज आहे असेही म्हणता येईल. आपल्या सारखे लोक मग पुस्तकात जंग जंग पछाडतात ते त्यामुळेच. पण चित्रपटात शक्यच नाही. नियतीवाद नाही म्हणणार मी रॉय, रामाला आलेले आयडेंटिटी क्राईसेस म्हणेन. जे आपल्याला पृथःकरण करून कधीही कळणार नाहीत. आले असतील हे मात्र नक्की. कारण आयुष्यभर जीवापाड प्रेम केलेली कैकयी अचानक स्वार्थी होणं, कधीही काहीही न मागणारी त्याच्यासाठी सगळं वैभव सोडून देणारी सीता सृवणमृगाच्या मोहात पडणं याने पुढचं सगळं घडत जाणं याला काहीही स्पष्टिकरण न दिसल्याने आपल्या आयुष्याचे ध्येय नेमके काय असे तर त्याला वाटले असेलच.
सुग्रीव सारख्याची मदत घ्यावी लागणं, सुग्रीव किती weak वाटतो. पण अडला हरी, माकडाचे पाय धरी. त्यासाठी वालीला लपून मारणे. हे रामाला कधीही पटले नसते आणि करावेही लागले नसते. अहिल्येचा आणि रामाचा काहीही संबंध नव्हता तरीही ती त्याची वाट पाहत होती, शबरीचा आणि त्याचा तरी काय संबंध होता?! ह्या सगळ्यांमुळे त्याला प्रश्न पडले असतीलच. अगदी नियती, भाग्य म्हणून नाही पण सेन्स ऑफ पर्पज काय आहे म्हणून. स्पिरिच्युअल लोकांनाच येतात अशे प्रश्न छळायला. जे नाहीत त्यांना पडत नाहीत आणि त्यांचं आयुष्य सुद्धा इतक्या खोलवर विचार करावा लागेल असे मुळातच नसतं. त्यामुळे सगळ्या वाटा कुठेतरी आधीच ठरल्यासारखे आहे वाटू शकते. नियतीवाद म्हणता येईल पण कनेक्टिंग द डॉट्स कुणीही बुद्धिमान माणूस करू शकतं याची शक्यता नाकारता येत नाही. हे पिक्चर बद्द्ल नाही. तेथे हे भाग्य म्हणूनच आलेय. पण मला असं वाटलं आणि ते प्रकर्षाने त्याज्य वाटलं नाही. कारण दुसरा ॲंगल मनात आला. माणूस म्हणून रामाचा विचार केला तर असं वाटतं.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/Db_FCS5pqwd/?dlrf=MWlucG44M3ZyOGhvdA==
सुशांत सिंग राजपूत असता आज तर राम म्हणून... ही रीळ पाहिली आणि भरून आले.
रिव्ह्यू छान, अस्मिता
रिव्ह्यू छान, अस्मिता
माझे २ पैसे :
दशरथाला सगळी मुलं एकाच वेळेला झाली हे इथल्या कोणालाच खटकलं नाही का? ती पण सगळी विष्णूचा अंश असलेली दाखवली गेली आहेत हे ही?
रणबीर काही काही सीन्स मध्ये राम अचानक म्हातारा झाला की काय ही शंका यावी इतपत अनावश्यक थरथरला आहे हे पाहिलंत का?
बाकी पिक्चर वेगवान आहे आणि मनोरंजक सुद्धा. पहायला मजा आली. रावण सगळ्यात जास्त आवडला. लक्ष्मण पण क्यूट.
एवढी शांत, विचारी असूनही सुवर्ममृगाचा एक मोहाचा क्षण >>> याचं उत्तर त्यांनी पिक्चरमधेच दिलं आहे - मारिचाने तिला संमोहित केल्याचे दाखवून. त्यामुळे ती मोहात पडते हे खटकलं नाही.
>> दशरथाला सगळी मुलं एकाच
>> दशरथाला सगळी मुलं एकाच वेळेला झाली हे इथल्या कोणालाच खटकलं नाही का? <<
क्काय? असे का झाले असावे हे इमॅजिन करून मला थोड्या गुदगुल्या झाल्या. खरेतर त्या काळात नागर लोकांत अशा गोष्टींना प्रतिष्ठाही होती म्हणा.
दशरथाला सगळी मुलं एकाच वेळेला
दशरथाला सगळी मुलं एकाच वेळेला झाली हे इथल्या कोणालाच खटकलं नाही का? ती पण सगळी विष्णूचा अंश असलेली >> पायस-दान मिळाल्यावर,
राण्या करितील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण... वरुन मला ही चारी मुलं एकदम, म्हणजे जवळपास एकदम झाली असंच वाटत आलेलं आहे.
तसंच श्री विष्णूंची आज्ञा म्हणुनी, आलो मी हा प्रसाद घेऊन
धन्य दशरथा तुला लाभला देवपित्याचा मान ... वरुन पूर्ण पायस विष्णूच्या थिंगींने अफेक्टेड होते आणि त्यामुळे चारही भावांत विष्णूचा अंश असणार असाही विचार माझ्या मनात आलेला.
अजुन पिक्चर बघितलेला नाही. त्यामुळे तू काय म्हणते आहेस यात माझी गल्ल्त होत असेल.
थरथर मीही नोट केली रमड. पण
थरथर मीही नोट केली रमड. पण चारही मुले एकाच यज्ञाच्या पायसाने मागेपुढे जन्मली असावीत. अगदी एकदाच नाही. लक्ष्मण आणि शत्रुघ्न जुळी म्हणून एकदाच आणि रामाच्या पाठचा भरत म्हंटले आहे. त्यामुळे राम , भरत आणि लक्ष्मण शत्रुघ्न. ते सगळंच गुंडाळले आहे पिक्चर मधे. बहुतेक अयोध्याकांड नाहीचे. चौघेही एकाच विष्णूचा अंश असणं सुद्धा वेगळं वाटलं. आता काय काय खटकून घ्यावं म्हणून जाऊ द्या म्हंटले. अगदी पळीने तीर्थ दिल्यासारखे पायस दिले तेही मोठा वाडगाभर असताना, उरलेले पायस अयोध्येतील दुसऱ्यांना वाटले की काय काय माहीत. काय करणार होता उरवून?!
सुटेना गेलं पायस दशरथाच्या हातून. मी वाटी वाटी वाढलं असतं.
राण्या करितील पायस भक्षण उदरी
राण्या करितील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण... वरुन मला ही चारी मुलं एकदम, म्हणजे जवळपास एकदम झाली असंच वाटत आलेलं आहे >>> हो, पण पिक्चरमधे सगळी मुलं एकाच वेळी जनतेला इंट्रोड्युस केली जातात. म्हणजे काय चारही मुलं एकदम झाली? त्या अनुषंगाने मग लक्ष्मण आणि शत्रुघ्न जुळे होते असं होईल. पण असं वाचल्याचं आठवत नाहीये. त्यातही राम मोठा असंच वाचलं आहे कायम. मोठ्या मुलाला मान पण मोठा. असं असताना रामाचा जन्म झाल्या झाल्या त्याला जनतेसमोर आणतील की 'बाकीची पण जन्मूदेत एकदाची म्हणजे सगळी बाळं घावकीत दाखवता येतील' असा विचार करून थांबतील?
शिवाय लक्ष्मण हा शेषाचा अवतार होता ना?
पिक्चरात विष्णूचा निळा उजेड पायसात पडतो असं दाखवलं आहे त्यामुळे सगळीच मुलं विष्णूचा अंश घेऊन जन्मली असा अर्थ होतो.
एक्स्पायरी असते त्याला! आणि
एक्स्पायरी असते त्याला! आणि ऊस गोड लागला म्हणून! आणि वाडगाभर देऊन शेवटी एकच मूल जन्माला घालायचं आहे! पायस हा कोड वर्ड आहे फक्त! उगा केशर वेलची घातलेली खीर फुकट गेली म्हणून हळहळू नका!

उरलेले पायस अयोध्येतील
उरलेले पायस अयोध्येतील दुसऱ्यांना वाटले की काय >>>
लक्ष्मण आणि शत्रुघ्न जुळी >>> हे खरंच आठवत नव्हतं. असं असेल तर क्षमा!
तरीही विष्णूच्या अंशाचा मुद्दा मी सोडणार नाहीच 
अमित
लोक असं करतात म्हणून आपली
उगा केशर वेलची घातलेली खीर
उगा केशर वेलची घातलेली खीर फुकट गेली म्हणून हळहळू नका! >>>

सगळी मुलं एकाच वेळी जनतेला
सगळी मुलं एकाच वेळी जनतेला इंट्रोड्युस केली जातात. >> आता अॅपल आय-फोन तयार आहे, आय पॅडची पुढली व्हर्जन तयार आहे, वॉच ची पुढली वर्जन रेड्डी आहे तरी इण्ट्रोड्युस करायला फ्लॅगशिप इव्हेंट, फॉल शोकेस वगैरे काय काय नावं देऊन अॅपल बडा धमाका दर वर्षी इमाने इतबारे करतं. चकल्यांचा घाणा झालाय तर वाढा पंगतीत, लाडू मग देऊ असं आपल्या ममव सारखं करतात होय!
आम्ही रेस्टॉरंट मध्ये खायला गेलो आणि स्टार्टर आणि मेन कोर्स दोन्ही एकदम ऑर्डर केलं की सांगतो, की बनेल तसं घेऊन ये. उगा सगळ्यांचं झालं नाहीये मग एक दोन डिश कशा आणू प्रकार करू नको. भुक्कड लोक आहेत काय आणशील ते आणि तसं खाऊ सांगतो. आता तुम्ही ममव लोक दशरथाला ही आपल्या पंगतीला बसवलंत!
अस्मिता मला वाटतं की मूळ
अस्मिता मला वाटतं की मूळ रामायणाच्या इमोशनल core ला प्रामाणिक राहिले तरी चालून जावे. आधी तिथेच कमी पडल्यावर इतर ठिकाणी डोकं लावतील याची काहीच अपेक्षा नाही खरेतर. संगती पेक्षा विसंगतीच जास्त असणार. अगदी सखीच्या वियोगाने लहान मुलासारखे स्फुंदणाऱ्या कोवळ्या तरुणापासून पासून ते बायकोवर संशय घेऊन अग्निपरीक्षा द्यायला लावणाऱ्या आणि नंतर ती गेल्यावर शरयूत जीव देणाऱ्या एका पुरुषाचा ठळक स्ट्रोक्सने प्रवास दाखवला तरी उत्तम.
सहमत रॉय. पुढच्या भागात काय
सहमत रॉय.
पुढच्या भागात काय माहीत काय वाढून ठेवलंय. आपण बघावं, चर्चा करावी हीच गंमत. आपल्याला काही तरी नवीन विषय मिळतो.
ममव वृत्तीप्रमाणे "पायस हिअर ऑर टू गो?" सुद्धा मनात आले. कारण हनुमान जन्मला त्या कथेत हेच पायस घारीने टू गो केले व अंजनीला दिले म्हणे. हनुमान जयंती पौर्णिमा सुद्धा बरोबर रामनवमी नंतर लगेच येते पण इथे सन्नी देओल तर वीस वर्षे आधीच टू गो होऊन बसला आहे. इतका मोठा हनुमान.
लगेच येते, पण वर्षे माहित आहे
लगेच येते, पण जन्मसाल एका वर्षांतील आहे का, वर्ष माहित आहे का कोणाला!?? सॉलॉमन ग्रँडी, बॉर्न ऑनं मंडे, ख्रिश्चन ऑन ट्युसडे, मॅरिड ऑन वेंसडे सारखं व्हायचं!
वर्ष माहित आहे का कोणाला >>
वर्ष माहित आहे का कोणाला >> काहीही काय विचारतोस अरे, असे धोतरला हात नसतो घालायचा
चकल्यांचा घाणा झालाय तर वाढा
चकल्यांचा घाणा झालाय तर वाढा पंगतीत, लाडू मग देऊ असं आपल्या ममव सारखं करतात होय! >>>
अस्कसं? इतने बडे इंतजार के बाद राजा दशरथ को लडका हुआ आहे ही ग्रँड इव्हेंट नाही??? 'बधाई हो' म्हणत अयोधेतली माणसं सैरावैरा पळणार नाहीत? क्या बातां करते मियां!! 
अस्मिताचं सिंबाचं उदाहरण करेक्ट आहे. पहिला सिंबा झाल्यावर लगेच डिस्प्ले!
एकदाच जन्मले म्हणजे काय दोनदा
एकदाच जन्मले म्हणजे काय दोनदा नाहीच जन्मले न... एकच वेळेस जन्मले म्हणायचंय का?
Pages