चंद्र- गुरूची युती

Submitted by मार्गी on 2 November, 2026 - 09:30

नमस्कार. आज मध्यरात्री म्हणजे 3 नोव्हेंबरच्या पहाटे साधारण 2 च्या सुमारास दक्षिण भारतातून व अन्य काही प्रदेशांमधून बघताना चंद्रामुळे गुरू झाकला गेलेला दिसेल. भारताच्या उर्वरित भागातून त्यांची युती दिसेल. चंद्र व गुरू एकमेकांच्या अतिशय जवळ दिसतील. दोघेही अतिशय ठळक असल्यामुळे ते शहरात दिव्यांच्या प्रकाशातूनही दिसतील. मध्यरात्रीच्या सुमारास ते पूर्वेला उगवतील. नोव्हेंबरमध्ये आकाशात अशा अनेक गमती बघायला मिळणार आहेत.

ह्या युतीनंतर 7 नोव्हेंबरच्या पहाटे सूर्योदयाच्या थोडा वेळ आधी तेजस्वी शुक्र व चित्रा पूर्वेला एकमेकांच्या जवळ दिसतील. शुक्र आता पहाटेच्या आकाशात दिसायला सुरूवात झाली आहे आणि तो सध्या अतिशय तेजस्वी आहे. ह्या दोघांच्या जवळ पहाटेची अगदी बारीक चंद्र कोरसुद्धा असेल. त्यानंतर 16 नोव्हेंबरच्या पहाटे लालसर मंगळ आणि गुरू हे एकमेकांच्या जवळ दिसतील. त्याच सुमारास सिंह राशीतला उल्कावर्षाव त्याच परिसरात बघायला मिळेल. तो 18 नोव्हेंबरला सर्वांत चांगला दिसतो. त्यासाठी शहरापासून दूर अंधार असलेल्या ठिकाणी जावं लागेल. त्यामुळे येत्या रात्री आकाश निरीक्षणासाठी छान आहेत.

(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल: https://niranjan-vichar.blogspot.com/2026/11/conjunction-of-moon-and-jup... त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, सायकलिंग, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.)

मी घेतलेला फ्लेम तेजोमेघाचा फोटो.

प्रसिद्ध युट्युबर आणि इन्फ्लुएंसर मुक्ता नार्वेकर ह्यांनी अंजनवेल कृषि पर्यटनाच्या व्हिडिओमध्ये आकाश दर्शनाचा उल्लेख केला आहे. मी व माझा मित्र गिरीश मांधळे- आमच्या आकाश दर्शन सत्रांबद्दल मुक्ताने त्यात माहिती दिली आहे. ह्या व्हिडिओमध्ये २८ मिनिटांनंतर आकाश दर्शनाचं वर्णन आणि काही फोटोजसुद्धा आहेत.

-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 2 नोव्हेंबर 2026.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users