Submitted by webmaster on 27 October, 2026 - 17:26
गेले काही दिवस सुरक्षिततेच्या कारणामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मायबोली ऑफलाईन ठेवली होती.
फक्त मायबोलीच नाही तर जगातल्या लाखो वेबसाईटस , त्यात मोठ्या कंपन्या, काही सरकारी वेबसाईटस ही होत्या.
आता सर्व सुरळीत असले तरी डागडुजी करत रहावी लागणार आहे . त्यामुळे पुढचे काही दिवस मायबोली मधून मधून बंद ठेवावी लागेल.
तसेच ब्राऊझर मधून येणारी प्रत्येक मागणी तपासली जात असल्यामुळे मायबोली हळू चालते असे वाटेल. ही गोष्ट माहिती आहे आणि आता लगेच त्यावर उपाय नाही.
सुरक्षिततेच्या कारणासाठी नवीन सभासद नोंदणी सध्यासाठी थांबवली आहे.
तुम्हाला काही अडचण असली तर कृपया याच धाग्यावर कळवा.
इथे ही बातमी वाचता येईल.
https://www.theguardian.com/technology/2026/oct/22/websites-across-world...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<आशू म्हणजे तुमच्या बॉस ला
<आशू म्हणजे तुमच्या बॉस ला माहितेय की तुम्ही माबो बघता?? Uhoh> ये मायबोली के सर को नही जानती.
तेच की
तेच की

माबोचा अभ्यास कमी पडतोय
मायबोलीवर सर एकच
आने से उसके आये बहार
आने से उसके आये बहार
जाने से उसके जाएं बहार
बड़ी मस्तानी हैं
मेरी मायबोली
मायबोलीवर नवीन फोटो अपलोड
मायबोलीवर नवीन फोटो अपलोड करता येत आहेत का आता ?
<<<शेवटी सरांना विचारलं तर ते
<<<शेवटी सरांना विचारलं तर ते म्हणाले टेक्निकल इशू असं कळतंय>>> आशू म्हणजे तुमच्या बॉस ला माहितेय की तुम्ही माबो बघता?? Uhoh
Submitted by aashu29
>>>>
पण आशू तुम्ही हा प्रश्न स्वतःलाच का विचारत आहात
बाई दवे,
माझ्या ऑफिसमध्ये बॉस पासून बाई बाप्या ताई माई अक्का पर्यंत सर्वांना माहीत आहे मी ऑफिस वेळेत मायबोली बघतो आणि त्यावर लिहितो.
एवढे दिवस मायबोली बंद होती तर मी त्यांनाच पिडत होतो. त्यामुळे ते सुद्धा सोबतच मायबोली सुरू होण्याची वाट बघत होते. त्यांनीही वेमाना धन्यवाद कळवले आहे.
मायबोलीवर नवीन फोटो अपलोड
मायबोलीवर नवीन फोटो अपलोड करता येत नाहीयेत. पण खाजगी जागा क्षमता वाढलेली दिसत आहे.
आधी माझ्या या प्रोफाईल मधील जागा भरली म्हणून मी नवनवीन प्रोफाइल वापरून फोटो अपलोड करायचो.
आता सहज बघितले तर या प्रोफाईलमध्ये सुद्धा ९० mb जागे पैकी ७१ mb वापरली म्हणून शिल्लक जागा दाखवत आहेत.
मी पण वाट पाहणार्यांच्या,
मी पण वाट पाहणार्यांच्या, सारखे येऊन, एरर पाहून थोड्या वेळाने परत येणार्यांच्या यादीत… चालू झाल्यावर बरं वाटलं…
खाजगी जागा क्षमता दीड-दोन
खाजगी जागा क्षमता दीड-दोन वर्षांपूर्वीच ९० mb केलेली आहे मायबोलीवर. चांगले फोटो द्यायचे तर तीसुद्धा कमीच पडते
हा इमेज टॅग वापरा. डबल
हा इमेज टॅग वापरा. डबल कोट्सच्या मध्ये गूगल फोटोज वरुन पब्लिकली शेअर्ड अल्बल मधील फोटो द्या. (राईट क्लिक -> कॉपी इमेज अॅड्रेस)
< img src=" " />
टॅग मधील < आणि img मधील स्पेस काढून टाकायला विसरू नका. इथे तो एरर मुद्दाम केलेला आहे, जेणे करुन टॅग कसा आहे तो दिसेल.
मायबोली वरील जागा न वापरता हायडेफिनिशन फोटो देण्याचा सर्वात सोपा मार्ग. अपलोड नको का काही नाही.
<< खाजगी जागा क्षमता दीड-दोन
<< खाजगी जागा क्षमता दीड-दोन वर्षांपूर्वीच ९० mb केलेली आहे मायबोलीवर.
>>
अच्छा धन्यवाद.. मी गेले कित्येक वर्षे वेगवेगळे प्रोफाइल वापरत असल्याने हे ध्यानातच आले नाही की ओरिजनल प्रोफाईलमध्ये देखील जागा तयार झाली आहे.
आता सहज चेक केले तर साधारण ५०० फोटो राहतात एका प्रोफाईल मध्ये ज्या resolution मध्ये मी टाकतो. सर्व प्रोफाईल मिळून एकदा चेक करायला हवे की मायबोलीवर आजवर किती फोटो अपलोड केले. आणि साधारण कुठल्या कुठल्या हेतूने. नवीन धाग्याचा विषय मिळाला
वेबमास्तर म्हणतील : हेचि फळ
वेबमास्तर म्हणतील : हेचि फळ काय मम तपाला..
अ नंतर त चा अंत झाला का?
अ नंतर त चा अंत झाला का?
अंतुले लिहिता येतं. अटल लिहिता येतं.
function at() { [native code] }उल नाही. (अ तुल).
function at() { [native code] }इरेक नाही चालत.
सुरु झालं हे महत्वाचं मराठी
मायबोली विनाअडथळा सुरु झालं हे महत्वाचं. मराठी माणसासाठी आणि त्याच्या भावनेच्या विरेचनासाठी मराठी संस्थळं अहोरात्र सुरु राहिली पाहिजेत. अधून मधून मायबोलीवर असतो एकदा दोनदा शटर डाऊन दिसलं. सुरु होईल म्हणून पानं रिफ्रेश करीत होतोच. धन्यवाद. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
(मायबोलीचा बहिस्थ विद्यार्थी )
<img src="https://lh3
वर अमितव यांनी सांगितलेच आहे तेच जरासं इस्कटून .
गूगल फोटोज मधली शेअर्ड लिंक अशी दिली तर....
<img src="https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczP-RIaM5u719CmkJDKhsF9uaQ4skAXN6m_KDRgVr0T4wN0bLfn7YPjHa_SGizH66bsnbZlhV4OkS6encaFNUGDKX0ZFdnuvgDC5bhxytuVu3DwHE78pJLoZD-iQgUMdw29sH3ZV6nEfRa0FOtpVDpGX=w1079-h1919-s-no-gm"/>
माबोवर फोटो असा दिसेल.
मायबोलीवर फोटो अपलोड
मायबोलीवर फोटो अपलोड करण्याची सुविधा पुन्हा सुरु केली आहे.
धन्यवाद. फोटो टाकता येत आहेत.
धन्यवाद. फोटो टाकता येत आहेत.
फोटो अपलोड होत आहे प्रोफाइल
फोटो अपलोड होत आहे प्रोफाइल पिक बदलता येत आहे आता सर्व काही सुरळीत आहे
मध्ये हा प्रॉब्लेम होता
मध्ये हा प्रॉब्लेम होता तेव्हा काही माझ्याच फोन मध्ये गडबड असावी म्हणून अँप delete केले होते पण आता परत इन्स्टॉल करताना अँपल स्टोर वर मायबोलीचे अँप सापडत नाही. कृपया लिंक द्याल का ?
मायबोली ऍप बहुधा आता राहिले
मायबोली ऍप बहुधा आता राहिले नाही कुठेच असे मागे कानावर आले तेव्हापासून मी ते कधीच उडवले नाही.. तरी बाकीचे कन्फर्म करतील.
मायबोलीचे अॅप सध्या अ
मायबोलीचे अॅप सध्या अॅपस्टोअर मधे नाही. त्यावर काम सुरु आहे.
माझा जुना इश्यू परत आळवत आहे
माझा जुना इश्यू परत आळवत आहे :: ह्या जाहिरातींच काही तरी करा . प्रत्येक क्लिकवर सुरू होतात .
मी क्रोम वापरणे बंद
मी क्रोम वापरणे बंद केल्यापासून मला जाहिराती दिसत नाहीत. मुलीने मला एक ब्राउजर सजेस्ट केला. सुरुवातीला विचित्र वाटलं पण आता सवय झाली. जाहिराती पिच्छा करत नाहीत हे सर्वात महत्वाचे.
राज अज्ञानी, डक ब्राउज़र का ?
राज अज्ञानी, डक ब्राउज़र का ? तो आयफोन वर चालत नाहीये माझ्या .
ब्रेव्ह.
ब्रेव्ह.लॉपटॉपवर. फोन मधे वेगळी सेटिंग करून दिली होती.
काल इथे लिहिल्यानंतर मुलीला ब्राउजरचे नाव विचारले
Ok
Ok
काल इथे वाचून जिप्ट्याला
काल इथे वाचून जिप्ट्याला विचारलं तर त्यानेही फोनसाठी ब्रेव्ह सुचवला. मीपण जामच वैतागले होते. आता ब्रेव्ह वरूनच आले आहे. चांगला वाटतोय. नो नॉन्सेन्स.
पण मी वेगळी काही सेटिंग्स केली नाहीत.
फोन मधे वेगळी सेटिंग करून दिली होती.>> इथे सांगू शकाल का तिला विचारून?
पुन्हा विचारलं कि चिडेलच. अ
पुन्हा विचारलं कि चिडेलच. अॅड प्रिफरन्सेस असा काही तरी मेन्यू तिने दाखवला होता. मला मोबाईलवर ब्रेव्ह जमत नाही. क्रोम त्याच्यात बाय डिफॉल्ट आहे म्हणून हे सेटींग केलं होतं.
( जाहीराती बंद करायच्या सेटींग्जवर चर्चा केली तर आयडी उडेल का?)
मी मोबाईल, लॅपटॉप दोन्हीवर
मी मोबाईल, लॅपटॉप दोन्हीवर ब्रेव्ह वापरतो, अनेक वर्षे झाली.
मोबाईलवर मायबोलीसाठी ब्रेव्हमध्ये काही सेटिंग करावे लागत नाही.
क्रोम/फायरफॉरक्स वगैरे मध्ये ad blockers वगैरे ऍड ऑन इन्स्टॉल/एनेबल करावे लागतील.
इतर काही ट्रस्टेड/वेल नोन साईट्स जर "your ad blocker is on" वगैरे मेसेज देऊज लोड होत नसतील तर ब्रेव्हच्या सिम्बॉलवर क्लिक करून शिल्ड ऑफ केली की त्या साईट साठी शिल्ड ऑफ होते आणि पेज लोड होते. यापेक्षा अधिक सेटिंग्ज क्वचित कुठल्या साईट्सला लागतात. त्याकरता क्रोम/फायरफॉक्स वापरता येईल, खोलात जायचे नसल्यास.
धन्यवाद राज अज्ञानी आणि
धन्यवाद राज अज्ञानी आणि मानवदादा. (राज अज्ञानी >विपुसुद्धा मिळाली.)
Pages