आता सर्व सुरळीत आहे

Submitted by webmaster on 27 October, 2026 - 17:26

गेले काही दिवस सुरक्षिततेच्या कारणामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मायबोली ऑफलाईन ठेवली होती.
फक्त मायबोलीच नाही तर जगातल्या लाखो वेबसाईटस , त्यात मोठ्या कंपन्या, काही सरकारी वेबसाईटस ही होत्या.
आता सर्व सुरळीत असले तरी डागडुजी करत रहावी लागणार आहे . त्यामुळे पुढचे काही दिवस मायबोली मधून मधून बंद ठेवावी लागेल.
तसेच ब्राऊझर मधून येणारी प्रत्येक मागणी तपासली जात असल्यामुळे मायबोली हळू चालते असे वाटेल. ही गोष्ट माहिती आहे आणि आता लगेच त्यावर उपाय नाही.

सुरक्षिततेच्या कारणासाठी नवीन सभासद नोंदणी सध्यासाठी थांबवली आहे.

तुम्हाला काही अडचण असली तर कृपया याच धाग्यावर कळवा.

इथे ही बातमी वाचता येईल.
https://www.theguardian.com/technology/2026/oct/22/websites-across-world...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच मस्त वाटलं पुन्हा मायबोली ला अप बघून. हि एकच site मी नित्यनेमाने बघते ऑफिसमध्ये पण server error बघून चुकल्या चुकल्या सारखं वाटत होतं . काहीही झालं तरी आता एवढ्या दिवसांसाठी मायबोली बंद ठेवू नका .

बेष्ट 👌

अरे वाह
इथे येऊन बरं वाटलं
.....
सगळे बग मरो
आणि मायबोली ला कुण्णाची दृष्ट ना लागो
...
भस्मबीज चा भाग यायला पाहिजे आता

किमान १० वेळा तरी चेक करत होते की चालु झाली का..
५०३ एरर बघुन परत फिरायचे
फेसबुक पेज वर पण चक्कर मारली..>> मी पण.

मलाही वाटलं मला बॅन केलं का काय
शेवटी सरांना विचारलं तर ते म्हणाले टेक्निकल इशू असं कळतंय
मग म्हणलं ठिके आणि आज लगेच सुरू झाली

हा पायगुण म्हणाचया ला? Happy

सुरू झाली मायबोली
मस्त मस्त
वाड्यावर गप्पा मारणे मिस करत होतो,
त्या कल्लू ला अघोरी साधना करायला जास्त वेळ मिळतोय ह्या विचाराने चिंता वाढली होती.
असो आता सुरळीत सुरू झाली आहे.

एक- दोन दिवसात मायबोली सुरू होईल असं वाटलं होतं पण जसे दिवस वाढू लागले तसं वाटलं एवढ्या वर्षाच्या सहवासात अचानक इतक्या दिवसांचा दुरावा कसा काय अचानक आला..? हूरहूर वाटली खरी..!

दुसरीकडे जराशी चक्कर टाकली मात्र मायबोलीशी एकनिष्ठ असल्याने दुसरीकडे जवळीक वाढवावी असं वाटलं नाही.

बरं वाटलं सुरु झाली मायबोली..!

Pages

नवीन प्रतिसाद लिहा