Submitted by Madan Hunkare on 17 October, 2026 - 02:23
भारत देशातल्या विविध प्रांतांची भाषा, कला आणि संस्कृती यांची ओळख व्हावी यासाठी मायबोली चालवत असलेले दाक्षिणात्य चित्रपट कसा वाटला?, दाक्षिणात्य भाषेतून डब्ड चित्रपट कसा वाटला? इंग्रजीतून डब चित्रपट कसा वाटला, मराठी चित्रपट कसा वाटला हे सर्व उपक्रम आवडले.
पण यात हरियाणवी, राजस्तानी, भोजपुरी, गुजराती, बंगाली, तुळु, मैथिली, अवधी, बंगाली, नेपाळी या भाषेतल्या चित्रपटांचा समावेश नाही.
हरियाणवी चित्रपटांची ओळख व्हावी व त्या भाषेतल्या चित्रपटावर चर्चा व्हावी म्हणून हा उपक्रम.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लव का चक्कर हा सुपरहीट
लव का चक्कर हा सुपरहीट हरियाणवी चित्रपट पाहिला.
https://www.youtube.com/watch?v=UQKYVF5NNyc
वेळ छान गेला. प्रसन्न हलकी फुलकी लव स्टोरी बघायची इच्छा असेल तर बघा.
जाट बुद्धी हा धम्माल विनोदी
जाट बुद्धी हा धम्माल विनोदी चित्रपट आहे. बघा नक्की.
https://www.youtube.com/watch?v=1wE-fSHyakk
जो लेख लिखे राम ने
जो लेख लिखे राम ने
हा चित्रपट काळीज पिळवटून टाकतो. हा आणखी एका नावाने उपलब्ध आहे.
"शादी से पहले फौजी शहीद, तो क्या करे फौजन?"
https://www.youtube.com/watch?v=hAA561QTv6Q
भोजपुरी सिनेमे बघायला सुरुवात
भोजपुरी सिनेमे बघायला सुरुवात केली पाहिजे.
इंग्रजी, हिंदी, मराठी, सौदेंडियन चा कंटाळा आला.
माझी पण इच्छा आहे भोजपुरी
माझी पण इच्छा आहे भोजपुरी चित्रपट बघण्याची, पण नेमके काही बघायला जावे तेव्हा विसरतो आणि यादीतले काहितरी पहातो-क्वचित पूर्ण बहुत करून १५-२० मिनिटे.
चांगले/गाजलेले चित्रपट माहीत असतील तर नावे सुचवा राअ.
चांगले/गाजलेले चित्रपट >>
चांगले/गाजलेले चित्रपट >> भोजपुरी मधले दुसर्या प्रकारचेच माहिती आहेत, ते शीर्षकांमुळे लक्षवेधी वाटतात. नेमकं काय असतं हे बघायची उत्सुकता आहे.