कविता समीक्षकांच्या शोधात

Submitted by आर्त on 10 October, 2026 - 07:57

नमस्कर,

मी माझा पहिला कवितासंग्रह संपादित केला आहे. तो छापायचा प्रयत्न करत आहे. पण त्या आधी मला जमेल तितक्या अनुभवी वाचकांकडून अभिप्राय मिळवायचा आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे मला शिकता यावं असे. त्या व्यतिरिक्त जर मला माझ्या संग्रहाचा दर्जा वाढवता आला, तर आनंद आहे. माझ्या ओळखीत कोणी कवी नाही, आणि कोणी समीक्षकही नाही. म्हणून इथे प्रयत्न करत आहे. जर कुणाला वेळ आणि इच्छा असेल, तर नक्की सांगा. मी माझी संहिता पाठवेन.
कुणाच्या ओळखीत प्रकाशक असतील ज्यांना कविता प्रकाशित करायची इच्छा आणि सवड असेल, तर नक्की सांगावे.
मी तुमच्या प्रतिसादांची वाट बघत आहे. खूप खूप आभार!

Group content visibility: 
Use group defaults