कोणाचे ऐकावे? तज्ञांचे सल्ले!

Submitted by केअशु on 28 September, 2026 - 02:04

माझ्या पाहण्यात युट्युबवर दोन प्रसिद्ध मानसोपचार तज्ञांनी करिअर विषयक दिलेले सल्ले आले. त्या व्हिडिओ मधले दोन सल्ले मी इथे टेक्स्ट स्वरूपात देतो आहे. हे सल्ले मला एकाच्या उलट दुसऱ्याचा अशा स्वरूपाचे वाटले. मला जसे वाटले तसेच तुम्हालाही वाटते आहे का? की माझाच काही गोंधळ झाला आहे? तुम्ही आपले विचार कृपया मांडा.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

मल्टीपल इंटेलिजन्स असतात. IQ हा फक्त ठराविकच गोष्टी सांगतो. तुम्हाला संगीतात गती आहे की नाही? हे IQ टेस्टवरून नाही कळत. तुम्हाला वाद्य पटकन शिकता येईल की नाही? इक वरून नाही कळत. तुम्हाला लोकांशी सहज संवाद करता येईल की नाही? IQ वरून कळत नाही. आणि लोकांशी चांगला संवाद करता येणं, चांगलं संगीत तयार करता येणं, चांगला नाच करता येणं, नृत्य करता येणं, चांगलं गाता येणं, कविता करता येणं, ह्याच्यामध्ये पण बुद्धी आहे.
हे आजमावा. नसेल... तर तपास करा. आणि करा फाईंड आऊट की आपली बुद्धी किती आहे? आणि एकच ठरवा की माझ्याकडे बुद्धी किती आहे याच्यापेक्षा माझ्या बुद्धीचा वापर मी किती करतो हे इम्पॉर्टंट आहे. जर माझ्याकडे एव्हरेज १०० इतका जर IQ असेल तर मला १००% त्याचा वापर करता आला पाहिजे. माझं म्हणणं तर असं असतं की जेवढे एव्हरेज असतात ना तेच अधिक चांगलं करतात. कारण एव्हरेज मुलांना माहिती असतं की मी एव्हरेज आहे. आणि मी हार्डवर्क केलं तरच मी काही करू शकतो. बुद्धिमान मुलं खूपदा मागे पडतात कारण त्यांना वाटतं की आहे बुद्धी माझ्याकडे. मला अभ्यास नाही केला तरी चालेल. आणि ते अभ्यास करत नाहीत आणि मागे पडतात.
त्यामुळे हे लक्षात घ्यायचं की आपली बुद्धी किती आहे ते आधी ओळखा. डोक्यात किती कॅण्डल पॉवरचा दिवा आहे तेवढ्याचा प्रकाश मला पाडलाच पाहिजे, लोड शेडिंग चालणार नाही. १०० वॅटचा दिवा असेल तर ६० वॅटची एनर्जी मी घेणार नाही. मला १०० वॅटचाच प्रकाश पाडला पाहिजे. माझ्या बुद्धिमत्तेचा मला १००% वापर करता आला पाहिजे. केला पाहिजे. कशात माझी बुद्धी आहे ते शोधू आपण.

मल्टीपल इंटेलिजन्स नावाचं एक संकेतस्थळ तुम्ही जाऊन पहा. Google वरती 'Multiple Intelligences' म्हणून. खूप छान आहे. कॉन्सेप्ट खूप छान आहे. त्याचा वापर करा.

पहिली बुद्धी. दुसरी इंक्लिनेशन.
म्हणजे आवड काय आहे, काय करायला आवडतं. उदाहरणार्थ मी डॉक्टर असलो तरी मला बोलायला आवडतं. मला ऑपरेट करायला नाही आवडत. मला बोलायला आवडतं म्हणून मी सायकियाट्रिस्ट आहे. म्हणजे इंटरॅक्शन, कम्युनिकेशन ही माझी आवड आहे. आणि डॉक्टर हा माझा कोर्स आहे. बोलणं ही माझी करिअर आहे. आता कळला डिफरन्स? वकील पण झालो असतो मी, टीव्ही ॲक्टर पण झालो असतो. ॲंकर झालो असतो. काहीही होऊ शकलो असतो. कारण मला इंटरॅक्ट करायला आवडतं. I chose doctor as a profession, as a course. माझी करिअर बोलणं आहे. काही लोकांचं करिअर बोलणं नसतं, काही लोकांची करिअर फक्त फोकस राहून करणं असतं. काही लोकांना हँड्स-ऑन एक्सपिरियन्स पाहिजे असतात. प्रत्यक्ष हातात इन्स्ट्रुमेंट घ्यायला आवडतं त्यांना. They enjoy it.

म्हणजे आपली आवड कशात आहे ते बघा. कोर्स नको... कोर्सचा विचार करू नका इतक्यात. कोर्सने फक्त जवळ जाऊ शकता. So आपली आवड कशात आहे ते बघा.

आणि तिसरी गोष्ट आपली पर्सनॅलिटी काय आहे ते बघा. आपलं व्यक्तिमत्त्व कसं आहे बघा. व्यक्तिमत्त्व म्हणजे फार उंच आहे, छान आहे, देखणा आहे, स्मार्ट आहे... नाही! मी कशा प्रकारचा व्यक्ती आहे? मी एक्स्ट्रोवर्ट आहे की इंट्रोव्हर्ट आहे? मला लोकांशी पटकन कनेक्ट करता येतं की माझे दोन-तीनच पण जवळचे मित्र आहेत? मी ओपन आहे की नाही? मी नवीन कौशल्ये शिकायला तयार असतो की जे माझ्याकडे शिकलेलं असतं तेच मला परत परत वापरायला आवडतं? मला एखाद्या गोष्टीचं पटकन टेन्शन येतं की नाही येत? मी टेन्शन हँडल करू शकतो का? मी किती पटकन कम्युनिकेट करू शकतो? कितपत पटकन बाँड करू शकतो? माझ्यात किती अडॅप्टॅबिलिटी आहे? मी किती पट्कन अडॅप्ट करू शकतो नवीन सिच्युएशनशी? मी जर extrovert असेन तर मला अशाच प्रकारची करिअर केली पाहिजे की जिथे मला अशी संधी मिळेल. अशा प्रकारे इंटरॅक्ट करण्याची संधी. मी जर अडॅप्टेबल असेन तर मी फिरतीची नोकरी पटकन करू शकेन कारण मला सारखं नवीन नवीन ठिकाणी जावं लागतं. मी जर टेन्स असेन तर मला तीच कामं नेहमी करण्यात मला बरं वाटेल. कारण नवीन गोष्टींनी मी खूप टेन्स होतो, ॲंक्शिअस होतो, माझ्या कामाची क्वालिटी बिघडते , high neuroticism trait. मला हँडल नाही करता येत. Nothing wrong, काहीच चूक नाही त्याच्यात. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. काही लोकांची असते, काही लोकांची नसते. Nothing right and wrong about it. काही चूक आणि बरोबर हे डोक्यातनं काढून टाकायचं. हे चूक आहे का बरोबर आहे? हे प्रॉपर आहे का इमप्रॉपर? नो! काही चूक नाही त्याच्यामध्ये. तुमचे आई-वडील आणि आमचे आई-वडील आणि तुम्ही आपण करिअरचा विचार करत असताना सतत चूक का बरोबर? चूक का बरोबर? चूक का बरोबर? Is a horrible thing! Open. Keep your mind open to see काय आहे? मग ठरवा चूक की बरोबर. आधी काय आहे ते समजून घेऊया. सारखं आपण चूक की बरोबर, चूक की बरोबर याच्यात अडकलेलो असतो. आणि त्याच्यामुळे आपली खरी पर्सनॅलिटी आपल्याला कळत नाही, आपला कम्फर्ट झोन कळत नाही आपल्याला."

डॉ. राजेंद्र बर्वे

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

तुम्ही ज्याच्याविषयी पॅशनेट असाल ना तेच तुमचं करिअर असलं पाहिजे. थांबा. पॅशन मला कशाचीही असू शकते. म्युझिकची असू शकते, पेंटिंगची असू शकते, ट्रेकिंगची असू शकते, पण ते necessarily माझ्या अर्थार्जनाचा सोर्स होईल असं नाहीये. म्हणजे असं सतत त्याचा विचार करत राहणं हा भाग खूप म्हणजे मला असं वाटतंय की हा वेडेपणा आहे.

पॅशन असेल, पण त्याच्या जोडीला जो महत्त्वाचा टिकऊ धरणारा जो मुद्दा आहे ना, तो आहे पर्पज. What gives me that sense of purpose? मला ते अर्थपूर्ण वाटतंय का मी जे करतीये ते? तर हा भाग आहे. आणि काही लोकांच्या बाबतीत ह्या सगळ्याचा एक सुवर्ण योग तयार होतो, तो म्हणजे माझ्याकडे ॲबिलिटी पण आहे, मला इंटरेस्ट पण आहे, आणि त्याच्यात संधी पण आहेत. So interest, ability आणि opportunity हा सुवर्ण योग काहीच लोकांच्या बाबतीत येतो.

पण ॲबिलिटी आणि opportunity ह्या दोनच गोष्टी असतील तर तिथे जॉब करता येतो ना. तिथे हा सुवर्ण योग असणार नाही. माझ्या इंटरेस्टच्या गोष्टी मी वेगळ्या करत राहीन. ज्याविषयी मी पॅशनेट आहे ते वेगळं करत राहीन आणि माझी ॲबिलिटी आणि opportunity जिथे जुळून येतीये, तो जॉब मी करत राहीन.

म्हणजे मुळातच ह्या सगळ्याचा एक अट्टाहास करण्याचं काही कारण नाही. हा सुवर्ण योग ज्यांच्या वाट्याला येतो जेवढा काळ येतो, पुन्हा तो सातत्याने तसाच राहतो असाही भाग नाहीये. त्यामुळे तो जेवढा काळ येतो, तेवढा काळ ठीक आहे, पण प्रत्येकाच्या आयुष्यात हा आला पाहिजे असं नाही.

त्यामुळे निवड करताना साधारणपणे याची एक सांगड घालून की संधी कशामध्ये आहे, माझ्यामध्ये क्षमता कुठल्या आहेत? आणि इंटरेस्ट किंवा पॅशन म्हणजे that motivates me because I am very passionate or interested about it. So interest आणि पॅशन हे तुमचं शिकण्यासाठीचं मोटिव्हेशन होऊ शकतं. त्याची गल्लत करिअरशी करू नये.

शिरीषा साठ्ये

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

करिअर - व्यवसाय धंधा ( स्वतंत्र / भागिदारी) , नोकरी ( खाजगी/ सरकारी), पेशा ( कमिशन एजंट, करमणूक, वकिली, वैद्यकीय शेती दुकानदारी राजकीय उमेदवारी वगैरे) यासाठी काही ठराविक ग्रह कारक असतात ते पाहावेत. पण उत्पन्नाचे साधन कोणतेही असो त्यामध्ये किती भरभराट होईल त्यासाठी योग असतात तेवढेच यश मिळते. सल्ले कुणाचेही घ्या, मार्गदर्शन, आशिर्वाद कुणाचेही घ्या, ते फक्त श्रेय ढापतात. तुमचेच योग बरोबर नसतील तर ते काहीही ( घं*) फरक पाडत नाहीत.

ज्योतिष भविष्य या सदरात का टाकावसं वाटले? यात एकाच्या विरुद्ध दुसर्‍याचे मत असे नाही वाटले. विश्लेषण फक्त वेगळ्या पद्धतीचे आहे.

मल्टीपल इंटेलिजन्स वर सल्ले देणारे "पुण्यात आपलं दुकान भाड्याने देऊन महाराष्ट्र व्यवसाय धंद्यात मागे का?" यावर भाषणं ठोकणार्‍यांतलेच वाटतात.
एक ना धड, भाराभर चिंध्या.