
संयोजकांनी अतिशय कल्पक अशा पाककृती स्पर्धांचे आयोजन करून चांगलीच धमाल आलीये यावेळी.
तर ह्या तिसऱ्या स्पर्धेत अगदी शेवटच्या क्षणी हि प्रवेशिका.
आपल्या देशात इतकी विविध प्रकारची फुले आणि फळे उपलब्ध आहेत कि असंख्य मॉकटेल्स ह्यातून तयार होऊ शकतात असे ह्या स्पर्धेच्या निमित्ताने विचार करतांना लक्षात आले. तर झालं असं आवडत्या गुलाबापासून एखादे पेय करावे असे डोक्यात होते पण त्यासाठी गावठी गुलाब हवा आणि तो काही फुललाच नाही. अध्ये मध्ये तीन-चार फुले आली पण बाप्पाचा मान मोठा म्हणून बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आली. हि स्पर्धा सुरु झाल्यावर एके रात्री आईच्या घरी असतांना बहरलेला पारिजातक पाहिला आणि ठरवले कि ह्यापासूनच काहीतरी करावे.

मला अनेकविध रंग असलेले नेत्रसुखद पेय करायचे होते आणि म्हणून एकापेक्षा अधिक फुलांचा वापर करायचे ठरवले. इथे अर्थात आई बाबांच्या मदतीशिवाय काही होणार नव्हते कारण फुलांची जमवाजमव तेच करणार होते. म्हणून ह्या स्पर्धेच्या निमित्ताने शोध लावलेली हि रेसिपी माझ्या आई बाबांना समर्पित.
साहित्य -
फळे -
१. डाळिंब
२. पेअर
फुले -
१. निळा गोकर्ण
२. पारिजातक
मसाले -
१. वेलची पावडर
२. बडीशेप
इतर - साखर आणि सजावटीसाठी फुले.
कृती -
पूर्वतयारी -
१. गोकर्णाच्या फुलांचा गडद रंगाचा चहा तयार करून घ्यावा. थोडा चहा थंड करायला ठेवून उरलेल्या चहाचा बर्फ करायला ठेवावा.
२. पारिजातकाची फुलं आइस ट्रे मध्ये घालून फुलांचा बर्फ करायला ठेवावा.
३. तसेच बडीशेपेचे पाण्यात उकळलेले सरबत हि बर्फ करावे.
४. साधारण ४ मोठे चमचे साखरेपासून पाक करून घ्यावा. ह्या पाकातच थोडी वेलची पूड घालावी आणि पारिजातकाची देठे घालावी. साधारण दोन मिनिटानंतर गॅस बंद करावा. अतिशय सुरेख केशरी रंगाचे सिरप तयार होते.
हे हि थंड करायला ठेवावे.
कृती -
५. आता पेअरचे तुकडे करून घट्ट ज्युस करावा.
६. थोडे डाळिंबाचे दाणे कुस्करून रस आणि दाणे एकत्रच असू द्यावे.
७. आता हे पेय असेम्बल करावे.
पारिजातक सिरप + पारिजातक आइस क्यूब - पेअर घट्ट ज्युस - क्रश केलेले डाळिंब + डाळिंब आइस क्यूब - बडीशेप आइस क्यूब - गोकर्ण आइस क्यूब + थंड गोकर्ण चहा
निवांत ह्या पेयाचा आस्वाद घ्यावा. (अर्थात इतरांनी, मला स्पर्धेची वेळ संपायच्या आत पाककृती पोस्टायची घाई)
हे पेय जितके सुंदर दिसते तितकेच चवीला सुरेख लागते.

त. टी.
१. आवडत असल्यास थोडे काळे मीठ घालू शकता. त्याने चव खुलते.
२. ह्यात प्लेन सोडा पण मस्त लागेल. अर्थात आवडत असेल तर घालावा.
मस्त.नेत्रसुखद दिसतेय पेय.
मस्त.नेत्रसुखद दिसतेय पेय.
पारिजातर फुलाचे आइसक्यूब !!!
पारिजात फुलाचे आइसक्यूब !!! आयडियाची कल्पना भारी आहे. ही मी ढापणार (खाण्यासाठी नाही)
प्रेझेंटेशन तर वरचा क्लास !
व्वा... काय सुरेख आहे
व्वा... काय सुरेख आहे
पाककृती नसती तर कॅरेबियन कॉकटेलच (Bahama Mama) वाटलं असत.
कॅरेबियन कॉकटेलच.. +१
कॅरेबियन कॉकटेलच..
+१
नेत्रसुखद!
नेत्रसुखद!
अ फ ला तू न
अ फ ला तू न
भारी दिसतेय
भारी दिसतेय
अहाहा.
अहाहा.
सुपर टेंप्टिंग दिसत आहेत माॅकटेल्स
अप्रतिम
काय इनोव्हेटिव्ह आहेस
गजब!!!!
सुपर
सुपर्ब
काय सॉलिड इनोव्हेशन आहे!! आणि
काय सॉलिड इनोव्हेशन आहे!! आणि दिसायला मोहक.या रेसिपी चे पेटंट घ्यावे.
अफलातून!
अफलातून!
काय इनोव्हेटिव्ह आहेस>> +१
डेकोरेशन अति आवडले.
डेकोरेशन अति आवडले.
खुप सुंदर दिसतय पण मला
खुप सुंदर दिसतय पण मला पारिजातक फुलाच्या खाद्यउपयोगाबद्दल शंका आहे. कारण त्या झाडावर सदैव काळे, जाड, मिलीपिड्स असतात. साॅरी, इकडे हे लिहून रसभंग केल्याबद्दल.
जबरदस्त.
जबरदस्त.
Very innovative...so colorful
हे तर नक्की म्हणजे नक्की करून बघणार...
या रेसिपी चे पेटंट घ्यावे>>>>>+११
फोटो आणि सादरीकरण एक नंबर..!
फोटो आणि सादरीकरण एक नंबर..!
जबरदस्त कल्पकता, कलरफुल
जबरदस्त कल्पकता, कलरफुल नेत्रसुखद.
प्राजक्ताची ओम रांगोळीही मस्त.
वा! भारी दिसतय!
वा! भारी दिसतय!
सिमरन, अनिंद्य, ज्यु, कविन,
सिमरन, अनिंद्य, ज्यु, कविन, मी_अनु, वर्षू, मानव दा, सामो, सुनिती, ऋतुराज, पराग, रुपाली, अंजू आणि सगळ्यांचेच भरभरून प्रतिसादासाठी मनापासून आभार.
सिमरन, अनिंद्य, ज्यु, कविन,
@मी_अनु @ऋतुराज, पेटंटचे मनावर घेते. तसेही मी इतर काही गोष्टींसाठी पेटंट आणि ट्रेडमार्कची प्रोसेस करतेच आहे.
@सुनिती, मी ही रेसिपी डेव्हलप
@सुनिती, मी ही रेसिपी डेव्हलप करत असतांना पारिजातकाच्या फुलांचा थोडा अभ्यास केला आहे. हे फूल तसे सुरक्षित आहे आणि अधिकची काळजी घ्यायची असेल तर खालील बाबी लक्षात ठेवाव्या असे कळले -
१. पारिजातकाच्या झाडाला खूप रासायनिक खतांचा वापर नको
२. शक्यतो पूजेची फुलं वापरू नयेत
३. खूप जास्त प्रमाणात खाऊ नये
४. फुले आणि पाने स्वच्छ धुवूनच वापरावीत. (इथे तुम्ही म्हणताय त्या मिलिपिड्स मुले असेल कदाचित).
मी माझ्या आईच्या बागेतील पारिजातकाची फुले वापरली. ते झाड विना रासायनिक खतांचं वाढवलं आहे. आणि केशरी दांड्या सिरप मध्ये थोडा वेळ उकळून घेतलेल्या आहेत. अगदी एक चमचा सिरप एका मोठ्या ग्लाससाठी पुरेसं आहे आणि त्यामुळे सुरक्षितही आहे.
तुम्ही वरील पद्धतीने पारिजातकाच्या फुलांचा वापर करू शकता.
जबरदस्त दिसतेय हे. प्राजक्त
जबरदस्त दिसतेय हे. प्राजक्त एकदम आवडीचा. खूप कल्पक आहे.
धन्यवाद अस्मिता.
धन्यवाद अस्मिता.
वाह! काय भारी दिसतंय.
वाह! काय भारी दिसतंय.
दुसरा साष्टांग दंडवत घ्या.
खतरनाक.. पहिला फोटो बघून
खतरनाक.. पहिला फोटो बघून फालुदाच वाटत आहे !
हे छान आहे. पण पेअर नसतं तरी
हे छान आहे. पण पेअर नसतं तरी चाललं असतं. खुपच चवींचा मारा वाटतो.
अनामिका, तुम्हाला आवडलं का?