पाककृती स्पर्धा २ - साक्षी - व्हेज अंडा मसाला

Submitted by साक्षी on 25 September, 2026 - 03:05

पूर्वतयारीचा वेळ: २० मिनिटे

प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३०-४० मिनिटे

लागणारे जिन्नस:
1.jpg
उकडलेले बटाटे - ३-४
कुस्करलेले पनीर किंचित हळद आणि मीठ घालून - २-३ चमचे

तेल - २-३ चमचे
तमालपत्र - २
वेलदोडे - २
मिरी - ३-४
दालचिनी - १ इंच तुकडा
चक्रिफुल - १
बारीक चिरलेले कांदे - २
टोमॅटो - ४ प्युरी करुन
आलं-लसूण पेस्ट - १ चमचा
गरम मसाला - १ चमचा
धनेपूड - १ चमचा
लाल तिखट - १ चमचा
कसुरी मेथी - ३/४ चमचा
बटर - १ चमचा
साखर - चवीनुसार
मीठ - चवीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती:
१) उकडलेल्या बटाट्यांच्या उभ्या दोन फोडी करा. चमच्याने प्रत्येक फोडीचा मधाला भाग गोल आकारात पोखरुन छोटा खोलगट भाग तयार करा. कुस्करलेले पनीर हाताने मळून घेउन त्या बटाट्यांच्या खोलगट वाटीत भरा.
2.jpg
२) पॅन मधे १ चमचा तेल घेउन त्यात हे बटाटे अलगद शॅलो फ्राय करुन घ्या.
3.jpg
३) कढईत १ चमचा तेल घ्या. तेल तापले की त्यावर खडे मसाले घाला. बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परता. मग टोमॅटो प्युरी घाला. ५-७ मिनिटे शिजू द्या.
5.jpg
४) ह्यात धणेपूड, लाल तिखट, ठेचलेला आलं लसूण, गरम मसाला घाला.
6.jpg
५) कसूरी मेथी, १ चमचा लोणी/बटर, मीठ, चिमूट्भर साखर घालून गरजेनुसार पाणी घालून ७-१० मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्या. शिजल्यावर बटाटे घालून १ वाफ काढा.
8.jpg
६) कोथिंबीर पेरून गरम गरम वाढा.
9.jpg
फोटोत कोथिंबीर विसरले आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लय भारी

नर्गिसी कोफ्ताचे रूप पालटून डायरेक्ट अंडाकरी !!
सरप्राईज जमलेय एकदम.

आवडली व्हेज अंडा करी.
इथे आधीच बटाटा असल्याने बटाट्या च्या ऐवजी अंडं वापरलं तर चालेल का असं विचारतो. मायबोलीची रीत पाळायला हवी.

भारीच दिसतायत. फसगत होणार बघून.

मागे मायबोलीवर दिनेशदांनी पण "कृत्रिम कवठे" नावाची शाकाहारी अंड्यांची रेसिपी टाकली होती ते आठवले. पण ती स्वीटडिश होती बहुतेक.