जे आयुष्य मिळालं त्याबद्दल आता समाधानी आहे. खूप गोष्टी नाही मिळाल्या, पण आता त्याबद्दल आकर्षण नाही.
पण स्पर्धा आहे म्हटल्यावर सांगायला पाहीजे कि नको?
असं बरंच आहे कि!
अगदी लहानपणापासून आम्ही दोघे भाऊ एकत्रच फिरायचो, खेळायचो, पण नेहमी भावाची स्तुती सगळे करायचे. ते ही माझ्यासमोरच.
"तुमचा दोन नंबर काय दिसतो बाई, एकदम कृष्णच, कसला आहे" मग आई त्या बायका गेल्यावर तणतण करायची. नजर लावतात या बायका माझ्या मुलाला. आजी म्हणायची "ए नजर काढून टाक बाई त्याची"
या संभाषणात माझा उल्लेख कधीच नसायचा. नजर लागली तर माझी ना नव्हती. पण माझ्याबद्दल जे वाक्य कानावर पडायचं ते
" अहो फुल्याची आई, याला खायला घालता कि नाही? अगदी पाप्याचं पीतर आहे"
मग आई अगदी स्पष्टीकरणं द्यायला लागायची " अहो किती चांगलं चुंगलं करून घालते, पण खातच नाही. एक चपाती संपवायला दोन तास लागतात. कधी कधी तसाच झोपतो जेवता जेवताच"
ही पब्लिसिटी सगळीकडं करणारी आपलीच जन्मदाती आई आहे याचं फारच वाईट वाटायचं...
तेव्हां वाटायचं कि रूप बदलणारा तो दगड मिळाला तर डिट्टो भावाचं रूप घ्यावं...
तो दगड काही सापडला नाही. ते रूप बदलायचं गेलंच राहून.
कॉलेजला गेल्यावर पण मुली त्याच्या मागे फिरायच्या. तो नेहमी द्वारकेच्या नंदनवनात असायचा.
आमच्या बाबतीत थार नाही, सहारचं वाळवंट होतं. कुठेतरी पाणी दिसावं तर ते मृगजळ निघायचं..
त्याच्याच सारखं "एकदम सनी देओल दिसतो ना?" हे वाक्य कानी पडावं असं वाटायचं.
पण व्यायामशाळेत गेल्यावर वजन उचललं तर फासळ्ञा दुखावल्या. तिथला इन्स्टृअक्टर ओरडला "कुछ खाया पिया करो, फिर यहा आओ, कहा कहा से चले आते है"
सनी देओल सारखी बॉडी बनवायचं राहूनच गेलं.
तरी लिस्ट संपत नाही.
सहा नाही तर किमान अर्धं बिस्कीट तरी पोटावर यावं आणि रस्त्याने शर्ट काढून "ओ ओ जाने जाना" म्हणत नाचावं हे स्वप्न सुद्धा राहूनच गेलं.
जिला कधी प्रपोज करता आलं नाही तिच्या घराच्या खाली जाऊन जोरात ओरडावं
" लीना, आ गया तेरा दीवाना, बता बता कहा छिपा है वो कमीना"
हे ही राहूनच गेलं.
पण सर्वात मोठं स्वप्नं..
मायबोली वेबमास्टरांना हिप्नोटाईज करून आपणच बेवमास्तर व्हावं आणि एकदा तरी अॅडमिनला कामावरून काढून टाकावं...
च्यायला हे पण (अजून तरी) राहूनच गेलंय.
आता आयडी राहिलाच तर भेटू कुठेतरी. नाहीतर हे सुद्धा राहूनच जाईल.
मायबोली वेबमास्टरांना
मायबोली वेबमास्टरांना हिप्नोटाईज करून आपणच बेवमास्तर व्हावं आणि एकदा तरी अॅडमिनला कामावरून काढून टाकावं...>> बाब्बो! लईच ड्यांजर
च्यायला हे पण (अजून तरी) राहूनच गेलंय.
आता आयडी राहिलाच तर भेटू कुठेतरी. नाहीतर हे सुद्धा राहूनच जाईल.>>
हाहाहा फार मस्त लिहीलेले आहे
हाहाहा
फार मस्त लिहीलेले आहे. कधी हसवलत कधी वाईट वाटलं 
खूप भारी लिहिलंय! स्वतःवरच
खूप भारी लिहिलंय! स्वतःवरच इतकं मोकळेपणाने आणि मिश्कीलपणे हसत राहून ‘राहून गेलेल्या’ गोष्टींची अशी भन्नाट यादी करणं जमणं हीच मोठी गोष्ट आहे.
आवडलं.
आवडलं.
अगदी पाप्याचं पीतर आहे">>
अगदी पाप्याचं पीतर आहे">> पोरगी फार काटकुळी आहे.. हे असं ऐकलंय मी माझ्यासाठी..!
लेख आवडला.
भारी लिहिलंय!! सध्याचा ट्रेंड
भारी लिहिलंय!! सध्याचा ट्रेंड असा आहे की 'पाप्याचं पितर' बॉडी साठी लोक नवस सायास करतील
तो दगड काही सापडला नाही. ते
तो दगड काही सापडला नाही. ते रूप बदलायचं गेलंच राहून.>> पोहोचलं.
" मोठीचा प्रश्न नाही.... धाकटीचं मात्र थोडं...." असं लहानपणापासून ऐकत होते. त्यामुळे "रंग गोरा व्हावा... केस लांसडक व्हावे... चष्मा तेवढा जावा...." असं वाटायचं नेहमी.
सध्याचा ट्रेंड असा आहे की
सध्याचा ट्रेंड असा आहे की 'पाप्याचं पितर' बॉडी साठी लोक नवस सायास करतील Happy>> सौदर्यांचे निकष बदलले आता...
धन्यवाद सर्वांचे.
धन्यवाद सर्वांचे.
नास्तिक असल्याने आणि गंभीर लिहावं असं वाटत नसल्याने घाईघाईत उरकला लेख. खरं तर आयुष्याबद्दल आता तक्रारी नाहीत. मागे वळून बघताना आयुष्याला थँक्यू म्हणावंसं वाटतं. भाऊ गेल्यापासून नास्तिक असूनही पुन्हा पुढच्या जन्मी तो धाकटा भाऊ असावा असे वाटतं. तो गेल्यापासून पल्याडची ओढ लागली. असं वाटतं कि पुढच्या आयुष्यातही असंच अधुरंपण यावं. त्यात मजा आहे. अधुरं, अपुरं असण्यात गंमत आहे. जे मला मिळालं नाही ते भावाला मिळालं याचा अभिमान पण असायचा, अर्थात तो समोर नसताना. भावांचं किंवा बहीणींचं असंच असावं असं वाटतं. स्पर्धा असते पण भावाने जिंकण्याचं समाधान पण असतं. प्रत्येकाचं आयुष्य सारखं असतं तर सगळेच अंबानी, टाटा किंवा अमिताभ बच्चन झाले असते. प्रत्येक मुलगी ऐश्वर्या राय किंवा मेरी क्युरी, गार्गी मैत्रेयी झाली असती. कधी कधी मक्खली गोशालला शरण जाणं श्रेयस्कर असतं. तो म्हणतो जगात प्रत्येक गोष्ट ठरलेली आहे. तर कधी बुद्धाला शरण जावं. प्रयत्नवाद , नियतिवाद यांचा तोल सांभाळण्याचं कौशल्य आयुष्याने शिकवलं तर गेले करायचे राहून ही भावनाच राहत नाही.
भाऊ गेल्यापासून नास्तिक
भाऊ गेल्यापासून नास्तिक असूनही पुन्हा पुढच्या जन्मी तो धाकटा भाऊ असावा असे वाटतं. >> आई गं...
राज अज्ञानी>>> भावना पोचल्या
राज अज्ञानी>>> भावना पोचल्या..
___/\___ रुपाली, शर्मिला जी
___/\___
रुपाली, शर्मिला जी