
अलोहा ब्लश
हे मीच काही तरी नाव द्यायचे म्हणून दिले आहे. गुलाबी रंगामुळे हे नाव दिले.
ही संपूर्ण कल्पना आणि कृती मुलीची आहे. तिने भुनभुन लावली, इथल्या इतर पेयांचे फोटो पाहिले, सर्वांना कसं हरवता येईल याचं धोरण आखलं. मागे लागून अननस आणून घेतले. आधी मसाला घालणार नव्हतो पण प्रवेशिकेत एक मसाला हवा आहे आणि घरी Tajin किंवा टहिन हा मेक्सिकन मसाला पडून होता. येथे भरपूर वेळा ही आंबट तिखट भुकटी ड्रिंक्स वर घालून गोडाला तिखटाची फोडणी पाहिली आहे. जी कमी प्रमाणात छान लागते. काही ठिकाणी अति करून वाट लावतात पण आपण पेरूवर मिरेपूड घालून खातो तोच प्रकार आहे. यात जास्वंद फुलांचे उकळून गार केलेले पाणी, अर्धा कॅन स्प्राईट, चार फोडी अननसाच्या व पाच रास्पबेरीज आणि चिमूटभर टहिन मसाला आहे.
हा टहिन मसाला, कशासोबत तरी आला होता आणि पडून होता. तुम्ही नाही घातला तरी चालेल.
आधी कोरड्या जास्वंद फुलांचा चहा करून गाळून घेतला, ब्रू केले व थंड केले. थोड्या रास्पबेरीज, अननसाच्या फोडी, जास्वंदीच्या पाण्यासहित ब्लेंड केले. व वर स्प्राईट ओतून ombre effect आणला, किंचित टहिन मसाला भुरभुरवला.

अत्यंत रिफ्रेशिंग आणि अबोली रंगाचे पेय तयार होते. हे मीच प्यायले. 
सुंदर
सुंदर
सर्वांना कसं हरवता येईल याचं धोरण आखलं >> हे फार आवडलं
ताजिन सफरचंदावर घाला, पेरूवर
ताजिन सफरचंदावर घाला, पेरूवर घाला. पेरूच्या ज्यूसमध्ये घाला. आवडत असेल तर त्यात वोडकाही घाला.
शहाळ्याच्या मलईवरही घालतात - पण मला पेरूवरच आवडलं हे प्रकरण.
मस्त दिसतेयं सरबत..
मस्त दिसतेयं सरबत..
मुलगी हुशार आहे तुझी...
हे आज वाचलं!
हे आज वाचलं!
सरबत छानच आहे, पण पाल्हाळ जास्त चविष्ट आहे.
माझ्याकडे असाच प्लेन ग्लास आहे, आणि स्ट्रॉ पण नितळ प्लास्टिकची रियुजेबल डिशवॉशर सेफ आहे. एक ग्लास मात्र आणल्याच्या दुसर्याच दिवशी मी फोडला, अजुन तीन आहेत. हे ग्लास असे फॅन्सी काही करुन प्यायला आणले आहेत हे मला सांगण्यात आले न्हवते. त्याला चांगलं लाकडाचं फिटेड झाकण आहे त्यामुळे ओव्हरनाईट ओट्स करायला मला ते फारच परफेक्ट वाटले. परत चार एक सारखे ग्लास असल्याने माझा आनंद गगनात मावेना. टिकटॉकवर ओव्हरनाईट ओट्सवाले लोक एकदम चार ग्लास करुन ठेवतात तसं मी चारी ग्लास भरुन ओट्स करुन फ्रीज मध्ये टाकले. नेहमी काही आणली की आरंभशूर लोक नंतर त्याकडे ढुंकून बघत नाहीत ते या ग्लासच्या बाबत होणे न्हवते. पहिल्याच दिवशी लोकांना फॅन्सी ड्रिंक प्यायची होती. सगळे ग्लास ऑक्युपाईड. म्हटलं खा तो हाय प्रोटिन ब्रेकफास्ट. मग मी हाताने धुऊन देतो. हाताने धुण्यात घात झाला. खळ्ळ् खट्याक! साबणाच्या पाण्यात हात घातला की हात फार बुळबुळीत होतो
हा ताजिन कसा घरात येतो ते मला ही समजलेलं नाही. ग्लासच्याकडेला लावुन लावुन किती संपवणार असा आहे. समोर दिसला की दोनदा वापरायचा मग मागे पडला की सहा महिन्यांनी परत एकदा वापरायचा. पेरूवर छान लागला तरी वेळेला तो सापडणे हेच मुश्किलचे काम आहे. मुशकिल करोगे आसान ख्वाजा मोरे! असा पेरुया-धनाश्री गायला लागेल.
हो, ते ओट्सचे माझेही स्वप्न
हो, ते ओट्सचे माझेही स्वप्न आहे. तुमच्यापेक्षा आम्ही बेकार असू, हिच्यासाठीच एक सुंदर नक्षीकाम केलेला ग्लास आणला होता, तो आणल्यावर असा प्लास्टिकच्या पिशवीतच होता. पण कुत्र्याच्या मागे घरात चिलटं झाली होती मग बाबांनी तिकडून आणली एक बॅट आणि बरोबर पिशवीवर हाणली. चिलट तर उडालं, ग्लास पिशवीतच फुटला. म्हणून तर ती आपल्या घरात कुणालाच काहीच येत नाही म्हणत असते.
तुझ्या लक्षात आले आहे का की हे नक्षीकाम केलेले मग, ग्लास सहसा ओतीव असतात, मग ते पटकन फुटतात धुताना वगैरे. मी मग फोडले आहेत. आपला काही दोष नाही.
>>>>>माझा भांड्यांमधे जीव
>>>>>माझा भांड्यांमधे जीव नाही,
आवडले.
>>>>>मला फक्त मजा आवडते म्हणून मला हा ग्लासांमधला पांढरा हत्ती वाटतो आहे.
हाहाहा
सरबत छानच आहे, पण पाल्हाळ
सरबत छानच आहे, पण पाल्हाळ जास्त चविष्ट आहे....+१.
स्ट्रॉ काचेची आहे का? आमची
स्ट्रॉ काचेची आहे का? आमची प्लास्टिकचीच आहे. ती टफरवेअर
आहे. काचेची स्ट्रॉ असती तर माझं डोकंच फिरलं असतं.
लाकडाचे झाकण डिशवॉशरला नाही टाकत. ती झाकणं शक्यतो कुणाला सापडणार नाहीत अशी ठेवली आहेत, की कोणी वापरायला नको म्हणजे रिमच्या आत बुरशी वगैरे यायलाच नको.
बाकी पेरुया-धनाश्री जोकला हसा. मलाच फार आवडला आहे तो जोक. हे म्हणजे आपल्याला जे दिसलं आहे ते समोरच्याला न दिसण्याच्या आणि त्यामुळे पाल्पिटेशन वाढण्याच्या सिंड्रोम या तुझ्या दुसर्या लेखासारखं होणारे. या सिंड्रोमला एक छान नाव द्या!
पूरीया-धनाश्री रागातली मुशकिल करोगे आसान ही प्रसिद्ध बंदिश आहे.
त्यामुळे पाल्पिटेशन
त्यामुळे पाल्पिटेशन वाढण्याच्या सिंड्रोम या तुझ्या दुसर्या लेखासारखं होणारे. या सिंड्रोमला एक छान नाव द्या!
>>> "तसंच पाहिजे" सिंड्रोम.
तुम्हाला आमचं कळलं नाही मग आम्हाला तरी तुमचं का कळेल. बसा तसेच तडफडत.
कुणालाच सापडणार नाही असे व्यवस्थित ठेवलं तर आमच्याकडे खरंच कुणालाच सापडणार नाही. खूप वर्षं झाकण लोळत असतं, कशाला खटारा पसारा म्हणून झाकण फेकून दिली की बाटली सापडते/ डबा सापडतो. मग आता झाकणच नाही तर डब्याचा काय उपयोग म्हणून डबाही फेकून द्यायचा.
थॅंक्यू सुनिधी, देवकी तै, रूपाली आणि सामो.

सर्वांना धन्यवाद.
>>>>>मुशकिल करोगे आसान ख्वाजा
>>>>>मुशकिल करोगे आसान ख्वाजा मोरे! असा पेरुया-धनाश्री गायला लागेल. Wink
हा जोक आवडला होता
मस्त दिसत आहे हे. अलोहा
मस्त दिसत आहे हे. अलोहा ब्लशचे वेगळे स्पष्टीकरण द्यायला नको होतेस - असे पेय प्रचलित असून त्याचे हेच नाव आहे असा समज होऊ द्यायचा
पाल्हाळ महाधमाल आहे
हडप्पा, पांढरा हत्ती, चिलटे आणि ग्लास वाली हकीकत, अननस आणि ग्लास एकत्र मिळू शकणारे दुकान सगळेच 
अमितची रागदारीही कहर
पण त्या ग्लासांचे इतके रोमहर्षक वर्णन वाचून नंतर त्यात ओट्स घातले हे वाचून त्यातली काच हेचि फळ मम तपाला म्हणाली असेल. सुरूवातीच्या दिवसांत जेव्हा भारतातून येणार्या खाऊचे अप्रूप असायचे तेव्हा एका मित्राकडे दिवाळीनंतर त्याची आई आली व त्यांनी तो फराळ करायला आम्हाला बोलावले. तेथे टेबलवर भारतातून आलेले सगळे इस्टमनकलर पदार्थ आम्ही खातोय व त्या मित्राची मुले तेथे बाउल मधे कलरलेस ओडरलेस सिरीयल खात आहेत असे दृश्य होते. ते आठवले 
परत चार एक सारखे ग्लास असल्याने माझा आनंद गगनात मावेना >>>>
एका ठराविक वयानंतर (म्हणजे विशी-तिशीनंतर
) तुम्हाला अगम्य गोष्टींमधे आनंद वाटू लागतो असे वाचले आहे. एकवेळ चार एकसारखे "भरलेले" ग्लास असले तर झालेला आनंद समजू शकतो. मी डिशवॉशर कलात्मकरीत्या लोड करतो. म्हणजे लोड केल्यावर त्याला अॅस्थेटिक लुक आला पाहिजे असे
कानावर हेडफोन लावून टीव्ही समोर सुरू असतो त्यामुळे यात indulge होता येते.
मी डिशवॉशर फुल कपॅसिटी
मी डिशवॉशर फुल कपॅसिटी काठोकाठ भरतो. अॅस्थेटिक्स काय समजत नाही.

पूर्वी आमच्याकडे प्रवासाची बॅग म्हणून एक व्हीआयपी बॅग होती. ती बॅग बाबा इतकी भरत असत की बंद करायला त्यावर आम्ही बसायचे की वजनानेच ती बंद करणे शक्य होत असे. किंवा गावाला डुक्कर रिक्षा जशी भरतात तसा मी डिशवॉशर लोड करतो. सगळी भांडी स्वच्छ विसळली गेली पाहिजेत 'बट नो वन लेफ्ट बिहाईंड'. एव्हरी भांडं मॅटर्स!!
गावाला डुक्कर रिक्षा जशी
डिशवॉशर कलात्मकरीत्या लोड करतो. म्हणजे लोड केल्यावर त्याला अॅस्थेटिक लुक आला पाहिजे असे >>>
मी मध्यम असेन कलात्मक डुक्कर!
गावाला डुक्कर रिक्षा जशी
गावाला डुक्कर रिक्षा जशी भरतात तसा मी डिशवॉशर लोड करतो. >>>>
कलात्मक डुक्कर! >>>
Pages