
अलोहा ब्लश
हे मीच काही तरी नाव द्यायचे म्हणून दिले आहे. गुलाबी रंगामुळे हे नाव दिले.
ही संपूर्ण कल्पना आणि कृती मुलीची आहे. तिने भुनभुन लावली, इथल्या इतर पेयांचे फोटो पाहिले, सर्वांना कसं हरवता येईल याचं धोरण आखलं. मागे लागून अननस आणून घेतले. आधी मसाला घालणार नव्हतो पण प्रवेशिकेत एक मसाला हवा आहे आणि घरी Tajin किंवा टहिन हा मेक्सिकन मसाला पडून होता. येथे भरपूर वेळा ही आंबट तिखट भुकटी ड्रिंक्स वर घालून गोडाला तिखटाची फोडणी पाहिली आहे. जी कमी प्रमाणात छान लागते. काही ठिकाणी अति करून वाट लावतात पण आपण पेरूवर मिरेपूड घालून खातो तोच प्रकार आहे. यात जास्वंद फुलांचे उकळून गार केलेले पाणी, अर्धा कॅन स्प्राईट, चार फोडी अननसाच्या व पाच रास्पबेरीज आणि चिमूटभर टहिन मसाला आहे.
हा टहिन मसाला, कशासोबत तरी आला होता आणि पडून होता. तुम्ही नाही घातला तरी चालेल.
आधी कोरड्या जास्वंद फुलांचा चहा करून गाळून घेतला, ब्रू केले व थंड केले. थोड्या रास्पबेरीज, अननसाच्या फोडी, जास्वंदीच्या पाण्यासहित ब्लेंड केले. व वर स्प्राईट ओतून ombre effect आणला, किंचित टहिन मसाला भुरभुरवला.

अत्यंत रिफ्रेशिंग आणि अबोली रंगाचे पेय तयार होते. हे मीच प्यायले. 
मस्त दिसतय
मस्त दिसतय
चव छानच असेल. टहीन मसाला असाच येऊन पडण्याची शक्यता -१०० पण अडत नाही, देसी पर्याय वापरुन करुन बघेन
मस्तंच..
मस्तंच..
अरे! मी आत्ता टेक्स मेक्स
अरे! मी आत्ता टेक्स मेक्स माबो नाव छान आहे लिहायला आले तर गॅझेट मधे नाव बदलल्याची नोंद
By the way हे ही लिहायच
By the way हे ही लिहायच राहीलं होतं की त्या मागच्या मनी प्लांटची पोझिशन या सेटिंग मधे मस्त वाटतेय
मुलीला आवडलं नाही, तिने
मुलीला आवडलं नाही, तिने बदलायला लावलं.
थॅंक्यू कविन.
भारी!! एक नंबर दिसते आहे.
भारी!! एक नंबर दिसते आहे.
फार रिफ्रेशिंग दिसतेय ड्रिंक
फार रिफ्रेशिंग दिसतेय ड्रिंक.कल्पना आणि कृती मुलीची, त्यामुळे तिचेही कौतुक.
मस्त!
मस्त!
लेकीचं खास कौतुक, तिच्यामुळे
लेकीचं खास कौतुक, तिच्यामुळे एक देखणी कलाकृती (सरबतकृती) निर्माण झाली. तिने प्यायलं का नाही हे.
काय सुंदर दिसतंय!! त्या
काय सुंदर दिसतंय!! त्या ग्लासवर नक्षी नसती तर अजून खुलून दिसले असते.लेकीचं कौतुक.मस्त सुचवले आहे.
< सर्वांना कसं हरवता येईल
< सर्वांना कसं हरवता येईल याचं धोरण आखलं> म्हणून लहान मुले निर्मल मनाची असतात.. लपवत नाहीत काही
छान आंबट गोड गुलाबी दिसत आहे पेय.
मुलीने एवढ्या हौशीने सहभाग
मुलीने एवढ्या हौशीने सहभाग घेतला हेच मस्त वाटलं बाकी रेसिपी छानच.
त्या ग्लासवर नक्षी नसती >> अनु मला ही असंच वाटलं.
भारी दिसतंय.
भारी दिसतंय.
ग्लासवरच्या नक्षीबद्दल सर्वांना मम.
सरबतकृती छान आहे. याचे कॉकटेल
सरबतकृती छान आहे. याचे कॉकटेल वर्जनही छान होईल.
तो ombre effect मात्र ग्लासच्या रंगीत नक्षीनी हाणून पाडलाय.
सुरेख दिसतं आहे आणि नावही छान
सुरेख दिसतं आहे आणि नावही छान. बरं झालं चेंज केलेस नाव ते. टेक्स मेक्स कुठलंतरी सँडविच आहे ना?
अस्मे एक नंबर झालंय ड्रिंक.
अस्मे एक नंबर झालंय ड्रिंक.
(आधी सरबत लिहीलं होतं, नंतर फारंच ममव म्हणून बदललं.)
करून बघायची लिस्ट वाढत चालली आहे.
हे पुढच्या वर्षी राहून गेलेल्या गोष्टींमध्ये नको यायला.
छान दिसते आहे
छान दिसते आहे
छान आहे आयडिया! चव इमॅजिन
छान आहे आयडिया! चव इमॅजिन करता आली!
रंग अप्रतिम आलाय..
रंग अप्रतिम आलाय..
स्वगत.. या कॅटेगरीत सर्वच सरबतांचे ( धनुडी ला म म व वाटले तर वाटू दे, आहे शेवटी सरबतच) रंग इतके छान आहेत की प्रत्येक ठिकाणी रंगाबद्दल वेगवेगळे शब्द शोधणे खूप कस बघणारे आहे .
संयोजकांनी आधी " प्रतिसाद द्या" अशी स्पर्धा घ्यायला पाहिजे.
क्या बात है! फार फार सुरेख
क्या बात है! फार फार सुरेख रंग आहे कृती सोपी आहे. तहिन माहीत आहे. मस्त आंबट गोड असतो.
>>>>> हे मीच प्यायले. Happy
हाहाहा
छान दिसत आहे
छान दिसत आहे
मस्त दिसतो आहे आलोहा ब्लश!
मस्त दिसतो आहे आलोहा ब्लश! नावही आवडलं.
अहा! ❤️
अहा! ❤️
छान आहे रेसिपी. ग्लास मात्र
छान आहे रेसिपी. ग्लास मात्र प्लेनच घ्यायला हवा होता.
छान दिसत आहे
छान दिसत आहे
धन्यवाद सर्वांना. पोस्टी नीट
धन्यवाद सर्वांना.
पोस्टी नीट वाचल्या सगळ्या.
आता त्यामागचे पाल्हाळ ऐका, उत्सव आहे आणि तो तसा वाटायला चार माणसं गोळा व्हावी लागतात. गोळा झाली की मी गोष्ट सुरू करते.
ही भुनभुन शनिवार पासून सुरू झाली होती, मी फक्त तिला इथली इतर पेये दाखवून आपणही करून बघू म्हणत होते. पण तिला फारच इंटरेस्टींग वाटली ही स्पर्धा त्यामुळे आपण भागच घेऊ म्हंटली ती. मग मला तिला अटी समजावून सांगताना आम्ही मसाल्यावर अडत होतो. जास्वंद घरात होते पण एकवेळ हडप्पात जुन्या गोष्टी सापडतील पण आमच्या कपाटात खाली गेले की गॅरंटी नाही. तरीही सापडले. मग ते एडिबल आहे का नाही पाहून घेतले.
मी: दालचिनी घालू चांगली लागते गोड पदार्थात, किंवा जायफळ घालू. पास्त्यात सुद्धा असतं बरेचदा, अगदी किंचित.
ती: दालचिनी म्हणजे/ जायफळ म्हणजे ?
मी : सिनॅमन आणि नटमेग.
नाही पटले. मग बरेचदा खटारा सामान फेकून दिल्यावर त्याची गरज पडते तसेच या टहिनचे झाले असते, बहुतेक चार पैकी दोन बाटल्या दिल्यात टाकून. दोन उगाच हिला बाटली क्यूट वाटते म्हणून ठेवल्या होत्या. एखादा बाटली, डबा क्यूट वाटल्याने सुद्धा आम्ही अनावश्यक सामान घेऊन ठेवतो आणि नंतर त्याच्यात संत्रा गोळी, चॉकलेट भरून ठेवतो.
मग अननस दोनदा दुकानात जाऊनही फक्त त्या सेक्शन मधे न गेल्याने किंवा अति आत्मविश्वास असल्याने यादी न करताच तोंड वर करून जाण्याने विसरले. त्या दुकानात सुंदर ग्लास मिळत नाहीत म्हणून दुसरीकडे जाऊ म्हंटले. पण अननस मिळते ते लक्षात नाही. जिथे ग्लास मिळतो तेथे गेलो होतो मागच्या आठवड्यात पण तेव्हा भाग घ्यायचा नव्हता म्हणून पाहिलेच नाही. अरे संसार संसार!
त्यात अननस आणल्यावर ती वेगळेच काहीतरी बदल काढून सगळं बदलू लागली. मी म्हंटले, ए बाई मला आधीच होत नाहीये. माझं काम वाढवू नकोस नव्या आयडिया काढून. आहे तोच ग्लास तिला पटला नाही, त्यातल्या त्यात हा बरा वाटला. मलाही रंगरंगोटी पेक्षा प्लेन आवडला असता. मग गुलाबी स्ट्रॉ जी मोठी आणि जास्त छान दिसली असती ती माझ्या हातातून खाली पडली. ती घाण झाली, मग बारकी गुलाबीच शोधली. कारण ती नेमकी शेवटची होती.
तुला काहीच डेकोरेट करता येत नाही आणि नवा शब्द तू अजिबात demure नाहीस. तुला धड अननस चिरता आलं नाही. तिथं बसून सतत वटवट. गॉर्डन रॅमझी समोरच्या स्पर्धकाचा आत्मविश्वास घालवतो बोलत राहून तसेच साधारण. आपल्या घरात कुणालाच काहीच येत नाही म्हंटली शेवटी. या सगळ्यात कोकोनट सतत तेथेच असतो. ह्या दोन गोजिरवाण्या सर्वेलन्स कॅमेरा समोरच करत राहावं लागतं. नंतर त्यालाही तीर्थ दिलं धनवन्ती.
आई, बाबा, ताई आणि कोकोनट सर्वांनी प्यायलं. मग मी पटकन लिहीत नाही म्हणून भुनभुन पार्ट २ . शुक्रवारी संपणार आहे वगैरे विचारून घेतले होते. चिवड्यावर वेळ घालवू नको म्हणाली, ते "फन" नाही म्हणे. काल रात्री लिहिले तर नाव पटले नाही कारण यात टेक्स मेक्स काही नाही, मग ब्लश सारखे गुलाबी आणि अलोहा जरा रिफ्रेशिंग शब्द म्हणून ते जोडून बारसे केले. तिची इच्छा नसती तर मी यात भागच घेतला नसता. हे सगळे तिला मजा यावी म्हणून केले. 
हो ऋ, आपल्या मुली माबोवर आल्या तर त्यांचा आयडी उडेल दहा दिवसांत.
एकदम निर्भीड, बाणेदार.
भारी झालंय ड्रिंक/ सरबत.
भारी झालंय ड्रिंक/ सरबत.
बाकी लिखाण/ पाल्हाळ पण मस्त.
आपल्या घरात कुणालाच काहीच येत
आपल्या घरात कुणालाच काहीच येत नाही म्हंटली शेवटी.
जास्वंदी चहाचा असा उपयोग
जास्वंदी चहाचा असा उपयोग भारीच आहे. नक्की करून बघणार - मसाला आणि रास्पबेरीज वगळून. रास्पबेरीज सहजासहजी मिळत नाहीत म्हणून आणि तो मसाला आवडत नाही म्हणून. तो मसाला आवडला असता कदाचीत, पण लेकीने आंब्यावर पेरून खायला दिला. आंबा आणि मसाला हे समिकरण मला झेपले नाही आणि तो मसाला नावडता झाला.
आंब्यावरच देतात तो सहसा माधव,
आंब्यावरच देतात तो सहसा माधव, मग आंबाही जातो आणि तोंडाची चवही.
मी पण खाल्ला आहे. किंवा मग परतलेल्या मक्यांच्या दाण्यावर. तो मसाला अति आंबट, खारट आणि तिखट आहे. एकत्र करून कुटल्यासारखं भरड टेक्स्शर आहे.
Pages