लेखन उपक्रम- गेले करायचे राहुन - किल्ली

Submitted by किल्ली on 23 September, 2026 - 08:37

करायचं राहून गेलं
खूप गोष्टी आहेत अशा, तसे काही regrets नाहीत पण होत्या काही गोष्टी.
यादीच लिहिते आता इथे Lol
1. Onsite परदेशात जायचं होतं एकेकाळी फार आकर्षण होतं. नंतर एका मित्राला tcs ने onsite म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र च्या ब्रांच वर पाठवलं एका गावात मग म्हटलं जाऊ देत. जिकडून आलं तिकडेच जायचं आकर्षण नाहीये.
2. अजून मागे गेलं तर मला हिस्टरी किंवा मराठी विषय घेऊन BA, MA करायचं होतं फार आवडायचं मला आर्टस्, आर्टस् कॉलेज त्यांचं निवांत वातावरण, सतत उत्साहाने काही ना काहीतरी करत राहणे, मस्त कपडे घालून फिरणे, वेगवेगळ्या फेस्ट्स ऍक्टिव्हिटी हे करायचं असेल तर आर्टस् च असं होतं डोक्यात, आई म्हणाली इंजिनीरिंग कर मग काय करायचं ते कर त्याच्यानंतर. म्हटलं ठीक आहे, मग हेच क्षेत्र आवडलं. आणि आर्टस् राहून गेलं.
3. मला ना टीचर व्हायचं होतं शाळेत. माझी मावशी शिक्षिका तिला बघून वाटायचं असं. तिची style, साड्या, मुलांना शिकवणे, पुस्तके, तिची शाळेतली खुर्ची, मनगटावरच नाजूक सोनेरी घड्याळ सगळं आवडायचं, तसंच करायचं होतं. हे आकर्षण जास्त दिवस टिकलं नाही, पण लक्षात आहे जसंच्या तसं मनात कोरलं गेलंय, मावशीची शाळा, तो वर्ग तिचं स्थान फार गोड आठवण आहे ती.
4. आणि बहुतेक जणांना वाटतं तसं मलाही लव्ह marriage करायचं होतं पण नंतर लक्षात आलं आपल्याला कुणी आवडेल हे काय शक्य नाही, त्यामुळे तेही राहिलं.
...
बाकी आठवलं काही तर update करते.
...
५. बोयनवाड चा निळ्या पेटीतला चिवडा खायचा राहिला
Ref अस्मिता चा चिवडा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.

याला काय अर्थ आहे राव? यु.एस.ए. मध्ये राहून सुद्धा परदेशात Onsite जायची ईच्छा बाकी आहेच का अजून?

आवडलं लेखन.
उगाच टँजंट झब्बू.
TCS चे लोक ऑनसाइट आमच्या ऑफिसात पण होते. पण ते दक्षिण मुंबईत होतं.
आर्ट्स कॉलेजचं वातावरण आवडतं म्हणून बी ए करायचं होतं की ते विषय आवडतात म्हणून ? इंजिनीयरिंग कॉ लेजेस मध्ये फेस्ट्स होत नाहीत? मी अटेंड केलेले दोन्ही फेस्ट्स इंजिनीयरिंग कॉ लेजेसचेच होते. एक व्हीजेटीआयचा. आय आय टीचा फेस्टही फार प्रसिद्ध आहे. मला सायन्स कॉलेजेसच्या विस्तीर्ण कॅम्पसेसचं अप्रूप वाटलं होतं. सगळ्यांचंच नसेल तेवढं.
मला पण शिक्षक व्हायला आवडलं असतं. पण आपल्याकडे तो आवाज नाही हे कळलं आणि त्या काळी तसा विचार बोलून दाखवणंही कठीण होतं. ती तहान टुशन्स घेऊन भागवली.

आमच्याकडे होते फेस्ट्स
पण अभ्यास इतका मरणाचा त्याहून जास्त त्याचं दडपण
पुण्यात नवीन होते मी
मार्क्स आलेच पाहिजेत नाहीतर नौकरी मिळणार नाही हा stress
त्यामुळे फेस्ट्स च्या वाट्याला गेले नाही.
...
विषय पण आवडीचे होते इतिहास मराठी
मी वाडिया कॉलेज ला इंजिनीरिंग केलंय तिकडे आमची building कोपऱ्यात होती तिकडून कॅन्टीन च्या दिशेने जाऊन जरा नेस, नेवील ला गेलं की जजबात बदल गये, वक्त बदल गया व्हायचं, बाहेर इतकी चहलपहल असायची, उत्साहाने फसफसणारे चेहरे आर्टस् कॉमर्स कॉलेज चे आणि इकडे पॉलीटेकनिक इंजिनीरिंग side ला आलं की lecture च्या वेळात शुकशुकाट असायचा. बोअरिंग वाटत असू आम्ही त्यांना.
त्यांचा फॅशन सेन्स पण भारी वाटायचा मला.
आम्हाला युनिफॉर्म होता
..
शिक्षक होण्याची हौस ट्युशन घेऊन मीही भगवली आणि आता इंडस्ट्री expert म्हणून कॉलेजस मध्ये अध्ये मध्ये lecture देते पण त्यात तशी मजा नाय
....
धन्यवाद सर्वांना
विशाल दादा ऐसे scheme नही बताने का सबको

<विषय पण आवडीचे होते इतिहास मराठी >
दूरस्थ शिक्षण संस्थेत शिकता येतील. IGNOU, ycmou आहेत.
मुंबई विद्यापीठाचं IDOL होतं, त्याचं आता CDOE झालं. मी तिथून बी ए केलं गेल्या दशकात.
पुणे विद्यापीठाचंही CDOE आहे. परीक्षेला जायला लागेल. तीन तास लिहायला लागेल.

थोड्या फार फरकाने मी ही ह्या स्टेजेस मधून गेलो आहे.
मन की बात जणू.
मजा आली वाचताना. पुनर्जन्म असेल तर ह्या चुका सुधारीन. निदान त्यासाठी तरी पुर्जन्मावर विश्वास आहे. तोच एक सहारा.
आवडलच,
Clear Clean lingo!

मजेशीर यादी आहे.

पण इंजिनियरिंग/ सायन्स व अस त्याकाळी बऱ्याच मुलांचं व्हायचं.

दहावीला चांगले मार्क मिळाले की सायन्स आणि नंतर इंजिनिअर/ मेडिकल
दुसरा काही विचार केला जायचा नाही जास्त. : |

अरे किल्ली मस्त मस्त! काही बाबतीत अनुमोदन अगदी. मलाही संस्कृत एम ए करायचे होते, आणि पीएचडी सुद्धा. काही गोष्टी तुला अजूनही करता येतील. छान साड्या वगैरे. चिवडा आपण शोधू. Happy

मस्त to the point यादी

तुझ्या ४ नंबर मधले 'बहुतेक जण' ओळखीचे वाटतायत पण त्यांचं दु:खं मोठं आहे. प्रॉपर्टीची वाटणी व्हावी आणि एका भावाला मुंबईतलं घर मिळावं आणि दुसऱ्याला ठाण्यापल्याड जावं लागावं आणि मग पिढ्यान पिढ्या ते तसच पुढल्या पिढीला पास ऑन व्हावं याचं दु:खं अजून मोठं आहे. जे आडात नाही ते पोहऱ्यात येतच नाही करे तो क्या करे Proud

केशवकूल ते मी माझ्याबद्दल लिहिले आहे. बहुतेक जणांना वाटते (बहुतेक आधी ते बहुजनांना वाटते असे लिहीले होते) माझ्या कमेंटला पर्सनल मेसेजचा संदर्भ आहे. मी एका कॉमन गृपवर कमेंट लिहीली होती on funny note - भाग के शादी करते है वाली इच्छा राहून गेली. कारण काकांच्या फॅमिलीला वारशात ती मिळाली आणि बाबांकडे वारशाने ॲरेंज मॅरेज प्रथा आली)

अर्र तुम्ही तुमचा प्रतिसाद उडवलात पण तेव्हढ्यात. असो राहूदे आता माझा तसाच. मला ठिपक्यांची रांगोळी नाही काढायचेय Lol

किल्ली आवडलं तू लिहिलेलं.
पॉईंट ४ फारच पटला. त्याची हौस मी इतरांना बांद्रा कोर्टात पोहोचवून पुरी केली.

मी एव्हढेच लिहिले होते की मला प्रतिसाद कळला नाही. प्रेम विवाह वगैरे विषयी नाही. पुढचे ते संपत्तीची वाटणी इत्यादी हे किल्लीच्या लेखात आलेले नाही. ते नव्हते समजले. आता कळतंय की ते व्यक्ती सापेक्ष असावे.
इतकेच.

करायचे राहून गेलेलं

१. स्काय डायव्हिंग शिकणे (अत्यंत खर्चिक आहे भारतात)
२. अरबी / फारसी भाषा शिकणे (अतिशय सुंदर लिपी)
३. पुरातत्व शास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन एखाद म्युझियमचे क्युरेटर व्हायला आवडले असते पण लहान गावात काहीच दिशा नसल्यामुळे अभियांत्रिकी हेच सिक्युर समजून उडी घेतली वाहत्या गंगेत.
४. पुरातत्व न करता एम ए इतिहास आणि दस्तऐवज अभिलेखनाचे (डॉक्युमेंट आर्कायव्हल) मध्ये ट्रेनिंग घेऊन राष्ट्रीय अभिलेखागरात नोकरी मिळवणे .

छान लिहिलंय!

४. विषयी मी डबल लकी आहे. मी प्रेमविवाह केलाय, तोही दोनदा… त्याच मुलीशी! Wink आधी दोघांनी घरच्यांना न सांगता पळून जाऊन मंदिरात लग्न केलं, आणि ठरवले कि जोपर्यंत राहण्यासाठी भाड्याचे घर वैगेरे मिळत नाही तोपर्यंत घरी सांगायचेच नाही आणि लगेच २-३ दिवसांनी बातमी आली कि तिच्या घरचे तयार झालेत मग काय तारीख वैगेरे ठरवून पुन्हा रीतसर वैदिक पद्धतीने कोर्ट मॅरेज केलं! पहिल्या लग्नाविषयी अजूनही दोन्ही घरी काहीच माहित नाही. सगळी गोष्ट सांगायला बसलो तर ती एखाद्या सिनेमालाही लाजवेल… पण त्यासाठी आधी सौ.ची परवानगी घ्यावी लागेल! Happy

छान लिहिलंय..!
मलाही वाटते कधीतरी की, शिक्षिका व्हायला हवे होते.

वॉन्टेड टुडू लिस्ट Lol
>> मला ना टीचर व्हायचं होतं शाळेत
+१ मी या उपक्रमात लिहिलं नाही पण लिहीलं असतं तर एक पॉईंट हा नक्कीच असता.

किल्ली, कधी मला संधी मिळाली तर माझ्या कामाच्या ठिकाणी डोमेन एक्सपर्ट म्हणून मी तुला गेस्ट लेक्चरसाठी नक्की बोलवीन. शाळकरी नसली तरी तसाच दंगा करणारी पोरंपण असतील वर्गात... तुझी इच्छा पूर्ण होईल बघ! Lol (आणि मग ती पोरं बघून तुला पुन्हा शाळेत शिकवावंसं वाटणारही नाही! Light 1 Proud )