Submitted by मीस्वच्छंदी on 23 September, 2026 - 00:58

“थांब जरा, या वर्षी नाही गेलास तर..”
“तर.. माझे करोडो भक्त निराश होतील“
“होऊ दे झाले तर.
तिकडे स्पीकरच्या भिंती लोकांचे कान फाडतायत म्हणे!
तुझे तर एव्हढे मोठे कान..!
मी काही पाठवायची नाही तुला यंदा.
आणि शिवाय ते अचकट विचकट नाचणं..
उगा बिघडवतील ती भुतं तुला”
“माते, एका हाताची बोटंसुद्धा सारखी नसतात.
तसंच कित्येक भक्त रात्रंदिवस राबून उत्कृष्ट देखावे तयार करतात, वर्षभर माझ्या वाटेकडे डोळे लावून असतात.
मी भावाचा भुकेला..!
मनी नाही भाव,
आणि देवा मला पाव
आपण नसतोय जात तिथं..” गणू हसत म्हणाला.
तेवढ्यात, झांजा आणि गणरायाच्या भजनाने त्यांचे लक्ष वेधले.
“आता तूच सांग,
मी कसा नको जाऊ..?”
----
रस - वात्सल्य, भक्ती, करुण, हास्य
अलंकार - दृष्टांत, रूपक, अतिशयोक्ती, यमक, प्रश्नालांकर/ काकू
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायलेक १ , २ नंतर या वर्षी ३
मायलेक १ , २ नंतर या वर्षी ३ hi गवसला.
आवडलं.
आवडलं.
छान आवडली,
छान आवडली,
काल मित्राच्या घरी गणपतीनिमित्त एक भजन सोहळा करून आलो. त्याचा दहा बारा वर्षांचा मुलगा सुद्धा पूर्णवेळ टाळ वाजवत होता. तेव्हा हाच विषय होता. हेच टिकवून पुढच्या पिढीत न्यायचे आहे.
(No subject)
मुलांना आवडलं तर ते आपसूक
मुलांना आवडलं तर ते आपसूक उचलतात.
ऋन्मेऽऽष, शर्मिला आणि सामो धन्यवाद!
छान आवडली.
छान आवडली.