पाककृती स्पर्धा २ - सहेली - पायनापल पेस्ट्री उर्फ मेयोनीज सँडविच

Submitted by सहेली on 22 September, 2026 - 06:10

यंदाचे तीनही विषय अगदी आव्हानात्मक आहेत. ‘दिसतं तसं नसतं’ हे सगळ्यात अवघड वाटलं होतं, पण यासाठी काय बनवता येईल हे डोक्यात आल्यावर करायला एकदमच सोपं होतं. कोणीही सहज करू शकेल अशी ही पाककृती (हा शब्द पण फार जड वाटतो आहे यासाठी!) आहे.

साहित्य – अर्धा किलो दही – पाणी निथळून घट्ट उरेल तेवढं , दोनशे ग्राम पनीर, दोन लसूण पाकळ्या, पांढरी मिरेपूड, शोभेसाठी एक अननसाची चकती आणि दोनतीन रंगीत जेली स्वीट्स
ingredients.jpg
(फोटोमध्ये तयार मेयोनीज असल्यामुळे लसूण पाकळ्या, मिरेपूड, दही आणि पनीर वेगवेगळे दिसणार नाही)

कृती – मिक्सरच्या भांड्यात निथळलेलं दही, पनीर, चवीपुरतं मीठ, दोन लसूण पाकळ्या आणि पांढऱ्या मिरीची पूड घालून एकजीव होईपर्यंत फेटून घ्यावं. मग जेवढी उंची हवी असेल तेवढे स्लाईस घेऊन कडा कापून घ्याव्यात. प्रत्येक स्लाईसला होममेड मेयोनीज लाऊन, त्यावर अननसाचे बारीक बारीक तुकडे घालावेत. स्लाईसेस एकावर एक रचावेत. पुरेशी उंची झाल्यावर सगळ्या बाजूंनी मेयोनीज लाऊन घ्यावं. हवं तसं सजवलं की खायला तयार!
meyo sandwitch.jpg

१. सजावटीसाठी इतर फळं किंवा आवडेल ते साहित्य वापरू शकता.
२. मेयोनीजमध्ये कच्च्या लसणीची चव आवडत नसल्यास इतर काही आपल्या आवडीने वापरू शकता. मी क्रीमसारखा पांढरा शुभ्र रंग रहावा म्हणून बाकी काही घातलेलं नाही.
३. सँडविच तयार झाल्यावर पंधराते वीस मिनिटं फ्रीजमध्ये ठेऊन गार केलं तर वेगळीच मजा घेता येऊ शकते - स्पेशली उन्हाळ्यात गार छान वाटेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Pages