यंदाचे तीनही विषय अगदी आव्हानात्मक आहेत. ‘दिसतं तसं नसतं’ हे सगळ्यात अवघड वाटलं होतं, पण यासाठी काय बनवता येईल हे डोक्यात आल्यावर करायला एकदमच सोपं होतं. कोणीही सहज करू शकेल अशी ही पाककृती (हा शब्द पण फार जड वाटतो आहे यासाठी!) आहे.
साहित्य – अर्धा किलो दही – पाणी निथळून घट्ट उरेल तेवढं , दोनशे ग्राम पनीर, दोन लसूण पाकळ्या, पांढरी मिरेपूड, शोभेसाठी एक अननसाची चकती आणि दोनतीन रंगीत जेली स्वीट्स
(फोटोमध्ये तयार मेयोनीज असल्यामुळे लसूण पाकळ्या, मिरेपूड, दही आणि पनीर वेगवेगळे दिसणार नाही)
कृती – मिक्सरच्या भांड्यात निथळलेलं दही, पनीर, चवीपुरतं मीठ, दोन लसूण पाकळ्या आणि पांढऱ्या मिरीची पूड घालून एकजीव होईपर्यंत फेटून घ्यावं. मग जेवढी उंची हवी असेल तेवढे स्लाईस घेऊन कडा कापून घ्याव्यात. प्रत्येक स्लाईसला होममेड मेयोनीज लाऊन, त्यावर अननसाचे बारीक बारीक तुकडे घालावेत. स्लाईसेस एकावर एक रचावेत. पुरेशी उंची झाल्यावर सगळ्या बाजूंनी मेयोनीज लाऊन घ्यावं. हवं तसं सजवलं की खायला तयार!
१. सजावटीसाठी इतर फळं किंवा आवडेल ते साहित्य वापरू शकता.
२. मेयोनीजमध्ये कच्च्या लसणीची चव आवडत नसल्यास इतर काही आपल्या आवडीने वापरू शकता. मी क्रीमसारखा पांढरा शुभ्र रंग रहावा म्हणून बाकी काही घातलेलं नाही.
३. सँडविच तयार झाल्यावर पंधराते वीस मिनिटं फ्रीजमध्ये ठेऊन गार केलं तर वेगळीच मजा घेता येऊ शकते - स्पेशली उन्हाळ्यात गार छान वाटेल.
अगदीच पेस्ट्री दिसतेय! फारच
अगदीच पेस्ट्री दिसतेय! फारच भारी!
वाह! दिसतय एकदम भारी आणि
वाह! दिसतय एकदम भारी आणि करायलाही सोपे
मस्तच
मस्तच
मस्तच दिसतंय, करायलाही सोपं
मस्तच दिसतंय, करायलाही सोपं आहे.
कहानी में ट्विस्ट भारी आहे
👌
कहानी में ट्विस्ट भारी आहे
फारच छान
फारच छान
धन्यवाद मॅगी, कविन, आशिका,
धन्यवाद मॅगी, कविन, आशिका, मनीमोहोर, अनिंद्य, आणि मृण्मयी!
मस्त दिसत आहे पेस्ट्री
मस्त दिसत आहे पेस्ट्री
खरच दिसतं तसं नसतं
भारी!! मला फायनल प्रॉडक्ट
भारी!! मला फायनल प्रॉडक्ट बघून अजिबात ती पेस्ट्री नसल्याची शंकासुद्धा आली नसती!
मस्त.पेस्ट्री च दिसतेय.
मस्त.पेस्ट्री च दिसतेय.
मस्त केले आहे.
मस्त केले आहे.
मस्त!
मस्त!
भारीच आयडिया आहे एकदम!
भारीच आयडिया आहे एकदम!
मस्तच आहे आयडिया!
मस्तच आहे आयडिया!
Superb
Superb
खूप छान दिसते आहे. नक्कीच छान
खूप छान दिसते आहे. नक्कीच छान लागेल.
मस्त दिसत आहे पेस्ट्री.
मस्त दिसत आहे पेस्ट्री.
भारी!!!!!
भारी!!!!!
मस्त.. हटके एकदम
मस्त.. हटके एकदम
भारीच की आयडियाची कल्पना,
भारीच की आयडियाची कल्पना, सुरेख दिसतंय.
काय सुंदर दिसतंय!! मेयो
काय सुंदर दिसतंय!! मेयो मधल्या लसणाला जरा अडखळले, लसूण नको असेल तर काय घालता येईल?
काय सुंदर दिसतंय!! मेयो
काय सुंदर दिसतंय!! मेयो मधल्या लसणाला जरा अडखळले, लसूण नको असेल तर काय घालता येईल?>>> एकदा घालून बघ अनु, आवडेल माझ्या मते. मिरची, कोथिंबीर घालून छानच लागतं.
फक्त पांढरा रंग मेन्टेन करायचा तर काय ते बघायला लागेल.
मस्त. आत भाज्या घालून
मस्त. आत भाज्या घालून आणखी फसवता येईल. धोके पे धोका.
एका कुकरी शो मध्ये हांडव्याला चक्क्याचं आयसिंग केलेलं पाहिलं होतं, ते आठवलं.
मस्तच
मस्तच
मस्त ग
मस्त ग
हे जबरी आहे. लिहिले नसते तर
हे जबरी आहे. लिहिले नसते तर अजिबात कळले नसते खरी पेस्ट्री नाहीये ते!
कमाल बनवले आहे सँडविच.
कमाल बनवले आहे सँडविच. खरीखुरी पेस्ट्रि वाटते.
मस्त झालेय सँडविच/ पेस्ट्री..
मस्त झालेय सँडविच/ पेस्ट्री.. मला आवडेल खायला ही सँडविच मधल्या लेयर मध्ये थोडे अननसाचे तुकडे घालून.
एका कुकरी शो मध्ये हांडव्याला चक्क्याचं आयसिंग केलेलं पाहिलं होतं, ते आठवलं>>> हांडवो कपकेक करून त्यावर असं चक्क्याचे किंवा चक्क + पनीर चे आयसिंग करावे अशी एक कल्पना सुचली होती. पण हांडवो वर ते कितपत चांगलं लागेल अशी शंका आल्याने नाही केलं.
मस्त.
मस्त.
पण हांडवो वर ते कितपत चांगलं
पण हांडवो वर ते कितपत चांगलं लागेल अशी शंका आल्याने नाही केलं.>>> माझ्या डोक्यात ढोकळा वापरून ही कृती करायचं आलं होतं, पण ब्रेड वापरणं सेफ बेट वाटलं.
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद सर्वांना!
Pages