शुभेच्छापत्र - रमा - किल्ली

Submitted by किल्ली on 21 September, 2026 - 06:08

रमाचं ग्रीटिंग कार्ड बनवायचं म्हटल्यावर आधी लाजून, नाचून गाल गुलाबी होईपर्यंत हसून झालं. मग मामाचा बड्डे येणारे म्हणून त्याचे नाव लिहायचं ठरलं होतंच तिच्या बंधू राजांच्या सांगण्यावरून.
आज शाळेतून आल्यावर तिने काल कागद क्लाऊड च्या आकारात कापला होता त्याला निळी बॉर्डर दिली, नेहमीप्रमाणे आवडतं इंद्रधनुष्य काढलं. स्टिकर ची फुलं चिकटवली आणि मधल्या भागात ठसे उमटवले.
Yellow वर हिरवं छान दिसेल असं तिनेच सांगितलं आणि जमतील तेवढे ठसे मारलेत. सकाळची तीच भेंडी कामाला आली.
आता मामा खूप खुश होणारे म्हणून हिचंच टाळ्या वाजवून उड्या मारून झालं
आता ते ग्रीटिंग गिफ्ट पॅक करायचं आहे त्यासाठी wrapping paper शोधायचा आहे.
एक होता तो ओम ने त्याचं greeting पॅक करायला वापरून टाकलाय.

तर मंडळी, सादर करीत आहे, रमाताईंच्या स्वहस्ते बनलेलं हैप्पी मूड वालं शुभेच्छापत्र:
१. Front side
Screenshot_20260921-152912~2.jpg
२. शुभेचपत्राच्या आतली side
Screenshot_20260921-152840~2.jpg

Group content visibility: 
Use group defaults

फार गोड!
>>>>>>रमाचं ग्रीटिंग कार्ड बनवायचं म्हटल्यावर आधी लाजून, नाचून गाल गुलाबी होईपर्यंत हसून झालं.
आई ग्ग!! सो क्युट. आय मिस सच डेज.

किती गोड अग्गोबाई ढग्गोबाई!! Happy
शाब्बास, रमा!

म्हणजे ओम प्रॉब्लेम सॉल्व्हर आणि रमा ड्रीमर आहे असं म्हणता येईल. Happy

Cute !!!
खूपच सुंदर बनवलंय. क्लाऊडची आयडिया एकदम मस्त !!!

वॉव! कसाटा आईस्क्रीम सारखं मस्त रंगीबेरंगी शुभेच्छापत्र…+१
खूप गोड शुभेच्छापत्र… रमासारखेच.

शाब्बास रमा
ढगांचे शुभेच्छा पत्र आणि त्यावर इंद्रधनुष्य...ही कल्पनाच भारी आहे.

शाब्बास रमा!
छान कलरफुल बनवलं आहेस ग्रीटिंग कार्ड! Happy

माचं ग्रीटिंग कार्ड बनवायचं म्हटल्यावर आधी लाजून, नाचून गाल गुलाबी होईपर्यंत हसून झालं.> किती गोड Happy
मामा लकी आहे . कार्ड खूप cute बनवले आहे रमाताईने .
रमाला सगळे रिप्लाय नक्की दाखव

Pages