शुभेच्छापत्र - ओम - किल्ली

Submitted by किल्ली on 21 September, 2026 - 03:40

ग्रीटिंग कार्ड म्हणजे बड्डे ला द्यायचं गिफ्ट असा एक नियम आहे आमच्याकडे.
ज्यांचा बड्डे येणार आहे ते विचारून घरात मिळेल त्या कागद पुठ्ठा इत्यादीवर रंगीबेरंगी इंद्रधानुष्य आणि एक गर्ल काढून आमचं ग्रीटिंग सुमारे साडेतीन मिनिटात तयार होतं. जेव्हा ओम ला मी सांगितलं की शुभेच्छापत्र बनवायचं आहे, त्या कामासाठी अर्धा रविवार खर्ची पडला, राडा, झाला
काहीही productive output आलं नाही दोघांकडून, माझा संयम संपल्यामुळे मी सगळं गोळा करून ठेवून दिलं उद्या बघू म्हणून.
तर आज शहाण्या बाळासारखा येऊन ओम म्हटला मी बनवतो ग्रीटिंग आज मी अजिबात हस्तक्षेप केला नाही, त्याला दिलेला कागद घेऊन आला त्याने तो मध्ये फोल्ड केला आणि म्हणाला ही बंद पडलेली lift आहे, मी मध्ये मॅन draw करतो, तो ती lift दुरुस्त करेल आणि आपण lift ला decorate करू कारण ती बंद आहे. मग तो मॅन अडीच मिनिटात रंगवून सुद्धा झाला तिथे, स्टिकर लावले मग मला आठवलं की ठसे वापरायचे आहेत. असंही एकटाच मॅन होता आणि ग्रीटिंग ला purpose हवा म्हणून मामा चा बड्डे येतोय म्हणून त्याला शुभेच्छा लिहिल्या, उरलेल्या जागेत भेंडीचे ठसे दिले. पर्पल आवडता कलर म्हणून तो वापरला त्याने.

सादर करत आहोत
बंद पडलेली डेकोरेटेड lift आणि दुरुस्त करणारा मॅन
सादरकर्ते ओम सर
वय पाच वर्षे,जुनिअर kg
१.
Screenshot_20260921-124650~2.jpg
२.
Screenshot_20260921-125917~2.jpg

मॅन असा का आहे ह्याचे explanation हवे असल्यास ओम ला जाऊन विचारा Lol

Group content visibility: 
Use group defaults

Lift उंच असते म्हणून रिपेअर करणारा पण उंच दाखवलाय गं ओमने

या आईला काहीच कसं कळत नाही Proud

मस्तच रे ओम. मस्त केलयस ग्रिटिंग कार्ड

मस्तंच

भारी आहे लिफ्ट दुरुस्त करणारा मॅन! शाब्बास, ओम! Happy
बंद पडली म्हणून लिफ्ट डेकोरेट करायची आयडिया म्हणजे गांधीगिरीV2.0 आहे! Lol

मस्त!
बंद पडली म्हणून लिफ्ट डेकोरेट करायची आयडिया म्हणजे गांधीगिरीV2.0 आहे! >> पुण्याचे लोक आहेत ते!

किती कल्पकता, फारच क्युट. लिफ्ट रिपेअर मॅनला सन्मान दिल्याबद्दल खास टाळ्या ओमसाठी.

शाबास ओम.

सहीच!

फॅण्टॅस्टिक !!!
थक्कच एकदम. या वयात कसली क्रिएटिव्हिटी यांच्यात!!

भारीच कल्पना आहे ओम सरांची... कार्डही सुंदर बनवलय..

आता सरांना च कशी शाबासकी द्यावी Lol

एक कॅडबरी दे माझ्यातर्फे सरांना! Happy

अगं किती भारी आयडीया आहे! बंद पडलेली लिफ्ट सजवायची... Lol मोठ्यांना पण सुचलं नसतं हे करायला!

धन्यवाद सगळ्यांना
आज रमा ओम ला वाचून दाखवणार आहे सगळ्यांच्या प्रतिक्रिया Happy ❤️

Pages