Submitted by प्राचीन on 19 September, 2026 - 13:45
भणाणणारा वारा, सोबतीला तिचा लडिवाळ लपंडाव.. सभोवताली सुरम्य सृष्टी.. "छे!
बायनॉक्युलर आणायला हवी होती.."
"कशाला ?"
"दूरच्या डोंगरावरची साईटसीईंग करायला गं!"
"मग मोबाईल आहे ना.."
"नाही.. तूच मगाशी काढून बाजूला ठेवलास ना, दोघांत तिसरा नको म्हणून?"
"हो तर.. इथे दूरदर्शन करायला आलायस का.. जवळ ही प्रिया असताना.."
तिचा आवाज मध्येच लांबून आल्यासारखा वाटला .. म्हणून वळला तर ती दिसेचना.. तो तिसरा मात्र आलेला.. आणि.. आणि तीही.. पण त्याक्षणी ती प्रिया नव्हती कि सिया नव्हती..तिच्या मधाळ नजरेत आता कृतांंतकळा उमटली होती.. बायनॉक्युलरने त्याला जवळची घातकी घसट कशी बरं दिसणार होती..
केव्हा, कुठे, का, कुणाला..
चित्रगुप्ताने विचारले. झरणीतून शब्द झरू लागले - हरिश्चंद्र...
रस - भयानक
अलंकार - अनन्वय
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
छान, आवडली.. जमलीय
छान, आवडली.. जमलीय