Submitted by रानभुली on 19 September, 2026 - 02:01
नदीच्या आरशात
============
सांज धुराच्या पाउली आली,
काठावरची घेऊन सावली;
नदी निळी की रात्र विराणी,
कुणाची होती कोण जाणली.
पिंपळ हलला, चंद्र न हसला,
पाण्यावरती चांदी फुटली;
निळ्या पक्ष्याच्या कृष्णपंखी
दूर कुठेशी रात्र दाटली
रेशीमरेतीत शंख पहुडला ,
आत कुणाची झोप बोलली;
कान लावुनी ऐकित राहिली ,
लाटगहिरी सांगून गेली.
घरपरतीच्या वाटेवरती
एक पाखरू मागे उरले
डोळ्यांत तयाच्या आकाश कोणते
मावळले की पुन्हा उगवले?
रात्र नदीच्या कुशीत निजली,
तारे झाले जलकुंभी भवरे
चांदणसमई शोधत होती
तिचेच हरवले होते नखरे
पहाट फुटता काठ उजळला,
पाऊलठसे तेथेच होते;
पण ज्या दिशेने आले होते
त्या दिशेला रस्ते नव्हते.
- रानभुली
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह!! फारच गूढ कविता.
वाह!! फारच गूढ कविता.
>>>>इतुका काळ कुठे गेलेले
कुणी मला घराशी आणले?
कोण या घरात आधी
माझी वाट पाहत होते?
वेगळाच रस आहे. गूढ हाच एक शब्द मनात येतो.
------------------------------
>>>घरपरतीच्या वाटेवरती
एक पाखरू मागे मागे उरले
डोळ्यांत त्याच्या आकाश कोणते
मावळले की पुन्हा उगवले?
हे कडवेही सुंदर.
विशेषतः दुसरी कविता करतेवेळी, नक्की कोणता मूड होता तुझा - वाटल्यास जरुर सांग. आय अॅक क्युरिअस.
सामो धन्यवाद
सामो धन्यवाद
खूप वर्षांआधी वहीत लिहीलेल्या. आता लक्षात नाही खरंच.