चमचमीत तुकड्या 
मासे...?
नाही.. नाही.. तुम्हाला वाटताहेत तशा ह्या माशांच्या तुकड्या नाहीत.
तर हे आहे सुरणाचे काप!
साहित्य:-
अर्थातच
सुरण – मुख्य घटक.
+ आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, - हिरवं वाटण - मॅरिनेट करायला.
+ लिंबाचा रस (चवीला), हळद, लाल तिखट, मीठ – मॅरिनेट करायला.
+ तेल. – शॅलो फ्राय करायला.
कृती:-
आता कृतीला सुरवात करूया.
१. तर आधी निवांत वेळी भाजी बाजारात (निवांत वेळ तुमची नाही तर भाजीवाल्याची!) जाऊन सुरण नीट कापून आणायचा. सुरणाचे साधारण पाऊण इंच जाडीचे काप हवेत. नेहमी सुरण घेतांना तो ओबडधोबड कापलेला मिळतो. म्हणूनच निवांत वेळ असं सांगितलं.
२. आता घरी आल्यावर सुरणाचे माशांच्या आकाराचे काप करावे. ते तुम्हाला येत नसतील घरातल्या एखाद्या कला कौशल्य येणाऱ्या सदस्याची मदत मिळाली तर उत्तम. माझ्याकडे बाजारात जाण्यापासून ते काप करेपर्यंत चे काम +१ ने केलं.
३. तुकड्या स्वच्छ धुवून एका पसरट भांड्यात ठेवून (भांड्यात पाणी नं टाकता, कुकरमधे तळाला पाणी टाकायचे!!!) कुकरला दोन शिट्या करायच्या.
४. आता आलं + लसूण + हिरव्या मिरच्या + कोथिंबीर हे हिरवं वाटण तयार करायचं.
५. त्यात लिंबाचा रस (चवीला) + हळद + लाल तिखट + मीठ एकत्र करून कुकरमधून शिजलेल्या आणि थोड्या गार झालेल्या तुकड्यांना लावायचे.
६. थोडा किंवा जास्त वेळ (तुमच्या सोई प्रमाणे) मॅरिनेट करायचे. भरपूर वेळ मॅरिनेट झाले तरी बिघडत नाही. रात्रीच्या जेवणाला सकाळीच मॅरिनेट करून फ्रीज मधे ठेवले तरी चालेल.
७. ह्या तुकड्यांना तांदळाचे पीठ किंवा बारीक रवा लावून खरपूस शॅलो फ्राय करायचे.
गरमागरम तुकड्या तयार!
८. शक्यतो गरमच वाढायचे किंवा खायचे.
अवांतर:-
स्टेप दोन मधील माशांचे आकार नाही जमले तर आपल्याला जमतील तसे काप करावे. चवीत फरक पडत नाही. “ दिसतं तसं नसतं” हे दाखवायला मी माशांच्या आकारात (नवऱ्याकडून) कापून घेतले.
स्टेप ४ आणि ५ मधील घटक चवी प्रमाणे कमी-जास्त करायचे.
बरोबर एखादी चटणी असली नसली तरी फरक पडत नाही. लिंबू कांदा पुरेसा आहे.
मांसाहार नं चालणाऱ्या दिवसात किंवा घरी शाकाहारी मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे लोकं आले तर हा पदार्थ शाकाहारी लोकांकरीता करता येतो.
********************
>>>>>>और कुछ मटन को सूरन!
>>>>>>और कुछ मटन को सूरन! (शेवटी बायकोकडे बघत Happy )
हाहाहा
छान आहेत सुरणाचे काप.
छान आहेत सुरणाचे काप. शाकाहारी असल्याने तसं रिलेट केलं नाही. सुरणाचे काप करते बरेचदा, पण कच्च्याचे करते. ह्या रेसिपीने करून बघायला हवं.
मी शाकाहार आणि मांसाहार
मी शाकाहार आणि मांसाहार दोन्ही करत असल्याने सांगते, हे सुरणाचे काप खुपसे सुरमई, हलवा... ज्यांच्या चवीकडे जातात.
छानच दिसतायेत सुरणाचे काप.
छानच दिसतायेत सुरणाचे काप.
तुम्ही लिहिलं नसतं तर मी ही
तुम्ही लिहिलं नसतं तर मी ही फसले असते..
जराही ओळखू येत नाहीत ते सुरणाचे काप आहेत म्हणून..
सुरणाच्या आठवणी म्हणजे सुरण अंगणात खूप असायचे... सुरण- कोळंबी रस्सा मला आवडतो.
लहानपणी माझी एक मैत्रिण विरारहून गावी सुट्टीत यायची मग आम्ही दोघी, माझी बहिण घराजवळ असलेल्या शेतात जेवणाचा डबा घेऊन जायचो.. रोजच..! एकदा तिच्या आजीने सुरणाचे काप असेच रवा लावून तळून दिलेले डब्यात.. मला ते काप इतके आवडलेले की, विश्वास बसत नव्हता ते सुरणाचे काप असतील असं..!
सुरण- कोळंबी रस्सा>> हे नवीन
सुरण- कोळंबी रस्सा>> हे नवीन आहे रुपाली माझ्यासाठी.
मी नेहमी बटाटे कोळंबी रस्सा करते.
हे नवीन आहे रुपाली माझ्यासाठी
हे नवीन आहे रुपाली माझ्यासाठी.
मी नेहमी बटाटे कोळंबी रस्सा करते.>>> बटाटा सुरणाचा मावसभाऊ वाटतो मला.. सुरणाचा वरचा देठ ( म्हणजे जमिनीत सुरण असतो तेव्हा) कोळंबी आणि वालाच्या भाजीत टाकतात.. चव चांगली लागते
. कोळंबी- बटाटा, कोळंबी - शेवग्याच्या शेंगा, कोळंबी - वांग- बटाटा, कोळंबी- कच्ची कैरी रस्सा, कोळंबी - खारवलेला कच्चा आंबा .. ह्या भाज्या माझ्या आवडीच्या आहेत.
Pages