Submitted by झेलम on 15 September, 2026 - 14:05
समोर दिसणाऱ्या भज्यांकडे तो आशाळभूत नजरेने बघत राहिला.
गेले दोन दिवस तो भज्यांच्या गाडीसमोरून जात होता. एकदा हिय्या करून चोरी करायचं ठरवलं तेवढ्यात भजी तळणाऱ्या भैय्याचं त्याच्याकडे लक्ष गेलं. कसाबसा हरणाच्या वेगाने भैय्याच्या तावडीतून सुटला तो.
उन्हाळ्यात आटलेल्या विहीरीगत फडताळातले डबे रिकामे झाले होते म्हणून असं दारोदार फिरावं लागत होतं त्याला. उपवासामुळे त्याचं शरीर काडीसारखं झालं होते. सकाळपासून पोटात अन्नाचा कण नव्हता. भूक आता वणव्यासारखी शरीरभर पसरत होती.
तहानलेल्याला वाळवंटात पाण्याचा तलाव दिसावा तसं ती भजी बघून त्याला वाटलं.
भैय्या कुठे दिसत नव्हता. स्मशानासारखी शांतता होती तिथे.
चपळाईने भज्यांचा घास घ्यायला तो पुढे सरकला आणि पिंजऱ्याचं दार खाटकन् बंद झालं.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा मस्त ट्विस्ट
व्वा मस्त ट्विस्ट
आवडली.
आवडली.
छान, जमलीय.
छान, जमलीय.
मस्त! कडक ट्विस्ट.. अचानकच
मस्त! कडक ट्विस्ट.. अचानकच आला
भारीच! मस्त जमलाय twist.
भारीच! मस्त जमलाय twist.
भारी आहे twist.
भारी आहे twist.
आधी दया येत होती. शेवट वाचून हुश्य झालं.
अनपेक्षित शेवट.
अनपेक्षित शेवट.
हल्लीच यातून म्हणजे पिंजरा लावण्याच्या अनुभवातून गेलोय. पण तो भलताच हुशार. पिंजर्यातलं खाद्य अलगद पळवून पसार.
जबरदस्त
जबरदस्त
सह्हीये ट्विस्ट! खूप आवडली
सह्हीये ट्विस्ट! खूप आवडली कथा.
आवडली.
आवडली.
भारीच ट्विस्ट
भारीच ट्विस्ट
ट्विस्ट आवडला
ट्विस्ट आवडला
जमली आहे!
जमली आहे!
जमलीय..
जमलीय..
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
सही!
सही!
एकच नंबर
एकच नंबर
आवडली.
आवडली.