शशक स्पर्धा - नितनवे - अपहरण - (श्लेष अलंकार, शृंगार? हास्यरस)

Submitted by नितनवे on 15 September, 2026 - 06:46

अपहरण

रोज पक्याच्या घरासमोरून जाताना पांड्याला ती अंगणात दिसायची.

तिचं गरगरीत शरीर… ती कुऱ्यात चालण्याची ढब, पांड्याने सायकलची घंटी वाजवताच त्याच्याकडे तिचं ते मान वळवून सावध नजरेने बघणं; त्याला सगळंच आवडायचं. कसली मजा येईल राव! तिचं मांसल शरीर बघितलं की त्याच्या मनात विचार यायचा.

पांड्याचा खूप दिवसांपासून तिच्यावर डोळा होता.

आज अखेर त्याने संधी साधली. पक्याच्या घरात कुणीच नव्हतं. पांड्याने चाहूल लागू न देता हळूच जाऊन तिला मागून धरलं.

तिने थोडावेळ सुटकेसाठी धडपड केली; पण मग त्याच्याकडे रागाने बघत कुरकुरत गप्प बसली.

पांड्याने समाधानाने तिला पिशवीत टाकलं. पिशवी खांद्यावर घेतली आणि सायकलला टांग मारत तो हसत पुटपुटला, “चला…आता श्रावण सुटला!”

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जमलीय Proud

पण शीर्षकामुळे ट्विस्ट येणार हे आधीच कळले मला.
हे पाहता गरज नाहीये शीर्षकात रस किंवा अलंकार टाकायची असे वाटते.

हाहाहा! भारी!
सुरूवातीलाच ट्विस्ट ओळखला होता.

Lol

कुऱ्यात चालण्याची ढब, पांड्याने सायकलची घंटी वाजवताच त्याच्याकडे तिचं ते मान वळवून सावध नजरेने बघणं>> साधारण कल्पना आली कोंबडी असावी.