
ही स्पर्धा जाहीर झाल्या झाल्या मी मनात 'डिब्स ऑन टोमॅटो' ओरडले.आमच्याकडे हमखास मिळणाऱ्या 3च गोष्टी: कांदा बटाटा टोमॅटो.
या सर्व रेसिपी करायला अप्पम पीठ भिजण्याचा वेळ सोडून 1. 5 तास लागला.अजून 2 करायचे मनात होते पण हे सर्व मावेल अशी सिरॅमिक डिश मी 3 महिन्यांपूर्वी फोडली.त्यामुळं आता नवी खरेदी नको वाटली.हा मागच्या वर्षी वरणभात चॅलेंज ला नवा घेतलेला ओणम प्लॅटर. याचा पहिला बड्डे झाला म्हणजे.
टोमॅटो म्हणावा तितका छान कलर देत नाहीये, फूड कलर वापरावा असे मोहाचे क्षण अनेक आले.पण त्यांच्यावर मात केली.मुंढे महाराज संस्कार.
या माझ्या पद्धतीने रेसिपी.
प्रयत्न1-टोमॅटो हलवा
1. यात एकच लक्षात ठेवायचे आहे की नीट शिजवून टोमॅटो च्या व्यक्तिमत्वाची गळचेपी केल्याशिवाय कोणीही त्याला गोड पदार्थ म्हणून स्वीकारणार नाही.
2. छोट्या कढईत अर्धा चमचा तूप टाकावे.यावर टोमॅटो ची मिक्सर मधून काढून बनवलेली प्युरी टाकून आणि साधारण 1 टोमॅटो ला 2 चमचे साखर या प्रमाणात साखर टाकून झाकण घालून नीट शिजवावे.
3. टोमॅटो चा टॉमेटीय वास जाऊन साखरेचा गोडसर वास यायला लागला की त्यात कंडेन्स मिल्क आणि तुकडा काजू आणि दुधात मिसळलेले केशर घालावे.
4. घट्ट झाले, वडी थापता येईल असे वाटले कि गॅस बंद करावा.
5. एका ताटात तुपाचा हात लावून चप्पट वडी थापावी.मी चॉकलेट चे गुलाब आकार साचे वापरून पाहिले.पण ते वडी साच्यातून काढल्यावर गुलाब दिसायला तयारच होईनात.कुकी कटर पण नव्हते.मग हातानेच बदाम आकार दिला.
प्रयत्न2-टोमॅटो झुणका(हा वाटीत आहे बदामाशेजारी)
1. टोमॅटो चिरून त्यात सुमारे एका टोमॅटो ला पाव चमचा या प्रमाणात मीठ घालून मिसळून झाकून ठेवावे.
2. सुमारे 2 तासांनी टोमॅटोला पाणी सुटले असेल.झुणका त्यातच बनवायचा.जास्त पाणी बाहेरून घातले की फाऊल धरले जाते.
3. खोल तव्यात 2 चमचे तेल घालून थोडे धुरावले की मोहरी जिरे हिंग घालून लगेच टोमॅटो आणि klm(कांदा लसूण मसाला.हा मस्ट. साधे तिखट आणि साधा गोडा मसाला घातल्यास फाऊल धरले जाते.
4. टोमॅटो मऊ शिजला की यात मावेल इतकेच बेसन(साधारण एका मिडीयम टोमॅटो ला 2 साधे खायचे चमचे शिग टाकून) घालून पटापट मिक्स करावे व एक मिनिट झाकण ठेवून लगेच भाकरी बरोबर खायला घ्यावे.गिल्ट नसल्यास वरून पाव चमचा तेल चालेल.
प्रयत्न3-घी टोमॅटो राईस
1. तांदूळ भिजवून निथळायला बाजूला ठेवावे.कोणतेही वापरू शकता.बासमती किंवा आंबेमोहोर असल्यास उत्तम.
2. आले लसूण कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे
3. भांडे गॅसवर गरम करून त्यात 2 मोठे चमचे तूप घालावे.तूप तापल्यावर हिंग जिरे.आणि लगेच आपण स्टेप 2 मध्ये बनवलेलं वाटण घालून चमच्याने हलवत राहावं.खमंग बटाटेवडे टाईप वास पसरेल.लोक नक्की काय बनतेय हे बघायला डोकावून जातील.
4. आता या मिश्रणात तुकडा काजू(स्वस्त पडतो आणि स्वतः कापावा लागत नाही) 2 चमचे घालून नीट परतावे.काजू वाटण टाकण्याच्या आधी टाकला तरी चालेल.पण करपू नये म्हणून नीट लक्ष ठेवा.
5. आता निथळलेला तांदूळ यात घालून खमंग परतावे.तांदूळ तेलकट सोनेरी चमकला पाहिजे.
6. आता यात भरपूर टोमॅटो प्युरी आणि मीठ घालून(1 छोटी वाटी तांदूळ असतील तर 5 मिडीयम टोमॅटो चालतील.) परत परतावे.
7. 3 मिनिट परतल्यावर यात पाणी घालून(टोटल लेयर च्या किमान 3 पेर वर आले पाहिजे पाणी.) नीट मिक्स करावे.
8. हवा असल्यास klm घालू शकता.किंवा आवडीचा कोणताही जास्त उग्र नसलेला गोडा मसाला.पंजाबी गरम मसाला जरा उग्र होतो.टोमॅटो चे कम्फर्ट फूड अस्तित्व झाकोळते.
9. साधारण 3 व्हॉटसप मेसेज लिहिल्यावर एकदा या रेट ने ढवळत राहावे.
10. भात शिजायला 25 मिनिटे लागतील.शिजला असं वाटलं की पटकन बंद करून ताटात वाढून अजून अर्धा चमचा तूप घ्यावे.बरोबर बटाटा साबुदाणा पापड असल्यास झकास.नसल्यास असुदे.
प्रयत्न4-टोमॅटो आमटी
1. तूरडाळ कुकरला नेहमीप्रमाणे शिजवावी
2. 1 मोठा टोमॅटो चिरून ठेवावा
3. कुकर गार झाला की डाळ काढून ठेवावी आणि चमच्याने थोडी मॅश करावी.
4. भांड्यात 3 चमचे तेल घालून ते धुरावले की मोहरी जिरे हिंग घालून ते तडतडले की त्यात टोमॅटो परतावे
5. टोमॅटो मऊ झाले की त्यात klm आणि मीठ घालून 1 मिनिट परतावे.आणि तूरडाळ घालून नीट ढवळत राहावे.
6. सर्व एकजीव झाल्यावर आणि उकळी आल्यावर बंद करावे.
7. मऊ भातासोबत वरून तूप घालून खावे.आम्ही अप्पम बरोबर खाल्ले.
प्रयत्न5-टोमॅटो अप्पम
1. याची तयारी 1.5 दिवस आधी चालू करावी.1 वाटी तांदूळ 7 तास भिजवावे.नंतर त्यात अर्धी वाटी पोहे, 1 चमचा शिग टाकून (हिपड स्पून) मैदा, हवे असल्यास ओले खोबरे घालून एकदम गंधगोळी वाटावं.
2. आता यात मीठ घालून आणि पाण्यात मिसळलेले ड्राय यीस्ट घालून नीट मिसळून उबदार जागी ठेवून विसरून जावे.
3. सुमारे 20 तासांनी किंवा उकाडा असल्यास आधी मिश्रण फरमेन्ट झाले असेल.त्यात चिरा पडल्या असतील.
4. टोमॅटो प्युरी टाकून नीट मिक्स करावे.मिश्रण पातळ हवे.पळीवाढे.
5. अप्पम चिट्टी(हा साधा झाकणाचा उथळ नॉन स्टिक तवा असतो.कोणतेही अंतर्वक्र पॅन चालेल.) नीट तापवून त्यात पळीने मिश्रण ओतून लगेच कढई हाताने धरून गोल गोल हलवावी.मिश्रण कडेपर्यंत गेले पाहिजे.मध्ये खूप जाड नको. आणि झाकण ठेवावे.सुमारे 2 मिनिटांनी याला मस्त जाळी पडून कडापासून वेगळे होईल.गरम गरम अंतर्वक्र अप्पम काढून दुसरा टाकावा.मी जो अप्पम चा भाग टोमॅटो मेणबत्ती लावून झाकला आहे तो जाळी न पडलेला दडस झालाय.कारण तांदूळ घाईत नीट बारीक वाटले नाहीत.पण तुमचे असे होणार नाही, घाबरू नका.सच और साहस है जिसके मन मे, अंत मे जीत उसीकी रहे.
प्रयत्न6-फेटा टोमॅटो सलाड
1. फेटा अतिशय खारट असते.त्यामुळे त्याचा सामना करायला टोमॅटो चा आंबटपणा लागतो.
2. टोमॅटो उभ्या फोडी आणि अगदी बारीक फेटा क्यूब नीट मिसळावे.
3. याचे सद्गुण अजून वाढवायला यात 1 मोठा चमचा सनफ्लॉवर सीड घालून लगेच खावे.
4. फेटा नसल्यास पगडी म्हणजे नॉर्मल पनीर क्यूब पण पळतील. तुकडे बारीक करा.

मस्त झालेत सगळे पदार्थ.. आणि
मस्त झालेत सगळे पदार्थ.. आणि प्लेटिंग पण छान झालंय. लेखनात अनु टच दिसतो आहेच त्यामुळे वाचताना ही मजा आली.
मस्त झालेत सगळे पदार्थ.. आणि
डबल प्रतिसाद
आता तुमच्याकडे हमखास फक्त
आता तुमच्याकडे हमखास फक्त कांदा आणि बटाटा मिळणार!!!
मस्त! काही बाकी ठेवलेच नाही. आमच्याकडे आणखी एक केचप चिप्स लेज मिळतात. पापड कुरडया म्हणून त्या लेज चिपा पण चालून जातील.
लिखाण आणि पाकृ दोन्ही चमचमीत
लिखाण आणि पाकृ दोन्ही चमचमीत आहे.
मस्त!
मस्त!
एवढे टोमॅटो एकत्र शेवटचे जिंदगी ना मिलेगी दोबारा मध्ये पाहिले होते.
त्या टोमॅटो मेणबत्तीला हॅपी बड्डे बोलून फुंकर मारली तर स्मोकी फ्लेवर टमाटर म्हणून तो सुद्धा कचाकचा खाता येईल
टोमॅटीय
टोमॅटीय
खास अनू टच वाली प्लेट आहे. आवडली. हलवा सोडून सर्व खाणार!
हेहे
हेहे
धन्यवाद मंडळी
रुन्मेष बाय द वे मी फोटो काढल्यावर लगेच मेणबत्ती काढून टोमॅटो कापून खाऊन टाकला.फूड वेस्टएज यु नो.डॅट इज नो नो.
टोमॅटो बटाट्याइतकाच गुणी आहे.
टोमॅटो बटाट्याइतकाच गुणी आहे. तुम्ही त्याचं चीज केलेलं दिसतं आहे.
नेहमीचे पदार्थ न करता टमाट्यांना जगभर फिरवून आणल्याने ते गहिवरले असतील.
बरं. ही तुमच्यासाठी खास पालखी आहे.
मस्तच!
मस्तच!
अनु, जमलाय टोमाटिना फेस्टिवल!
अनु, जमलाय टोमाटिना फेस्टिवल!
मस्त आहे
मस्त आहे
मस्त आहे
मस्त आहे
फोटो, प्रेझेन्टेशन देखील सुरेख
फारच भारी लिखाण आणि पाकृ तयार
फारच भारी लिखाण आणि पाकृ तयार करायला बरेच कष्ट घेतले आहेत
लिखाण तर नेहमीसारखे खुसखुशीत.
लिखाण तर नेहमीसारखे खुसखुशीत..
काही फु सल्ले..
या स्पर्धेत बक्षीस ( मिळाल्यास ) म्हणून एक मोठी अनब्रेकाबले ( घ्या समजून, मला काय हे ठीक होईना) प्लेट घे.
ही रेसिपी ( अनेक ) श श क म्हणून त्या स्पर्धेत पण एन्ट्री टाक. संयोजकांनी खूपच हरकत ( मराठीत ऑब्जेक्शन) घेतले तर एक एक पराग्राफ ( समजून घ्या काय लिहिले आहे ते) एक एक श श क म्हणून टाक.
रस, तुला आवडेल तो.. प्लेट फुटली त्याचा करुण, बाकी सगळे हास्य इ इ..
फू स समाप्त
इतके सल्ले देते आहेस, तू लिही
इतके सल्ले देते आहेस, तू लिही आधी! वाट बघतोय तुझ्या एंट्रीची!
लपून बसलेली ईमोजी
लपून बसलेली ईमोजी

मस्त आहे टोमॅटो थाळी आणि
मस्त आहे टोमॅटो थाळी आणि लेखनही खुसखुशीत ..
खुसखुशीत
खुसखुशीत
टोमॅटोच्या व्यक्तीमत्वाची गळचेपी
खुसखुशीत लेखन आणि जबरद्स्त
खुसखुशीत लेखन आणि जबरद्स्त टोमॅटो रेसिपीज. तुला बघून छान वाटलं अनु, किती तो उरक.
टोमाटिना फेस्टिवल जबरदस्त
टोमाटिना फेस्टिवल जबरदस्त 👍
छान रेसिपीज... फोटो थोडा
छान रेसिपीज... फोटो आणखी थोडा ब्राईट असता तर जास्त छान दिसला असता
छान पाकृ.
छान पाकृ.
वॉव!!
वॉव!!
आमची धाव तितकीच. 
ती टोमॅटो पोखरुन लावलेली मेणबत्ती फार म्हणजे फारच आवडली. तो पदार्थ करुन पहाण्यात येइल
अरे हा वाचायचा राहिला.
अरे हा वाचायचा राहिला.
मस्त लिहिले आहे. पदार्थ सुद्धा छान.
६ प्रयत्नांती टमाटर प्रसन्न झाले आहे.
त्या दिव्याची कल्पना भारीच.
किती मेहनत घेतली आहेस तू..!
किती मेहनत घेतली आहेस तू..!
छान आहेत रेसिपीज..