Submitted by सामो on 14 September, 2026 - 12:27
आठ रेषा ओलांडत वैश्य तर कधी शूद्र कधी राजा तर कधी ब्राह्मण असे आपले अनंत जन्म आठवित लाकुडतोड्या नृसिंह सरस्वतींच्या पायाशी येउन कोसळला. आणि मग गुरू म्हणतात "सज्जनहो वादविवादासाठी आलात ना करा या लाकूडतोड्याबरोबर वेदांत चर्चा. "
आलेले ब्राह्मण चकित आणि खजिल झाले . गुरुंचा पायावर लोळण घेत, त्यांना आळवत म्हणाले,
मूढ अम्ही जरी तुझी लेकरे बरस अम्हावर कृपाघना
नेणुनी तुजला अज्ञ वदलो यःकश्चित अमुचा जन्म खरा
मूढा वदवी आठ जन्म अन थोर करी उपकार अम्हा
आता तरी तव चरणी लागू वाचव चवर्याऐंशीचा फेरा
कनवाळू, नृसिंह सरस्वतींनी त्यांना अभय दिले आणि परत अहंकार न जोपासण्याचा उपदेश करुन त्यांची रवानगी केली.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अरे व्वा सामो! पहिला नंबर
अरे व्वा सामो! पहिला नंबर लावलात.
धन्यवाद नितनवे.
धन्यवाद नितनवे.
काही समजली नाही. लाकुडतोड्या,
काही समजली नाही. लाकुडतोड्या, आठ रेषा, ८४ फेरा, अहंकार आणि लाकुडतोड्याचा वेदांत.. सगळं डोक्यावरुन गेलं. यात शांत रस का?
अमितव गुरुचरित्रामधील गोष्ट
अमितव गुरुचरित्रामधील गोष्ट आहे ती.
जर गोष्ट आधीच माहीत असेल तर कदाचित हे शशक वाचताना, शांत आणि लीन होइल मन असे वाटले.
ओके.
ओके.
छान.
छान.
मस्त!
मस्त!
गुरुचरित्रामधील गोष्ट आहे ती.
गुरुचरित्रामधील गोष्ट आहे ती.... हे वाचल्यानंतर 84 लक्ष योनींचा फेरा कळला. पण 8 रेषा वगैरे नाहीच कळले.
माझा चहाचा कप नाही.
माझा चहाचा कप नाही.
देवकी,
देवकी,
एकदा काही पंडीत त्रिविक्रम भारतींकडे आलेले. की आम्ही वेदांत पारंगत आहोत आणि आम्हाला कोणी हरवु शकत नाही. तेव्हा त्रिविक्रम त्यांना घेउन नृसिंह सरस्वतींकडे गेले. ते पंडीत तिथेही ताठ्याने तसेच बरळू लागले. मग नृसिंहसरस्वतींनी ८ रेषा आखलेल्या आणि एक एक रेषा ओलांडण्यास एका लाकूडतोड्यास सांगीतले होते. प्रत्येक रेष ओलांडली की त्याला त्याचा एक जन्म आठवत असे. आठवी ओलांड ल्यावर त्याला आठवले की पूर्वजन्मी तो एक वेदांतपंडीत ब्राह्मण होता.
मग गुरु त्या विजयपत्र द्या म्हणाणार्या ब्राह्मणांना म्हणाले " एवढा गर्व आहे तर करा आता या लाकूडतोड्याशी वेदांत चर्चा.'
मग ते ब्राह्मण खजील झाले व माफी मागून निघून गेले.
अच्छा, धन्यवाद सामो !
अच्छा, धन्यवाद सामो !