गंमतखेळ - मराठी चित्रपट आणि मालिकांवर मीम्स

Submitted by संयोजक on 13 September, 2026 - 01:29

नमस्कार मायबोलीकर मंडळी!

ज्या उत्कटतेने तुम्ही गणेशोत्सवाची वाट पाहतो होता, त्याच उत्कटतेने तुम्ही वर्षभर या धाग्याची वाट पाहत होता, हे त्या गणरायानचे आम्हांला सांगितलं.

यंदा मीम्ससाठी विषय आहे मराठी चित्रपट आणि मराठी मालिका.

काही काही मराठी चित्रपट आणि मराठी मालिका यांचे पिसे मायबोलीकरांना अधूनमधून लागत असते आणि मग तुम्ही काय करता?

तेच इथे करायचे आहे मीम्सच्या रूपात.

मीम्स तयार करताना काही गोष्टी लक्षात ठेवू.

१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
४. हा गंमतखेळ झब्बूसारखा खेळायचा. एक मायबोलीकर कितीही मीम्स देऊ शकतो. पण सलग दोन मीम नाही. एक मीम दिल्यावर थोडा धीर धरायचा आहे. अन्य कोणी मीम द्यायची वाट पाहायची आहे.

चला तर! बसूया मीम्सच्या बुलेट ट्रेनमध्ये!

गणपतीबाप्पा मोरया!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिक्चरचा व्हिडीओ अमेरिकेत दिसत नाही. पण माझं सौभाग्य हे नाव वापरून शोधल्यावर गाण्याचा हा व्हिडीओ मिळाला, जो इथे चालतोय
https://www.youtube.com/watch?v=HhPHdjQMlY0&list=RDHhPHdjQMlY0&start_rad...

गाण्यांत ठहराव कोणीही आणेल. पण इथे सबटायटल्स मधे ठहराव आहे. त्यामुळे गाणे व सबटायटल्स "वो मुखडे पे थी, मै अंतरे पे था" सारखे चालतात. मधे एकदा साधारण २:४० ला स्क्रीन वर "मंजूर या उवा" इतकाच मजकूर दिसतो.

मीम्स वरवर चाळल्या होत्या. आता नीट वाचतो Happy भरतच्या धमाल आहेत हे तेव्हाही जाणवले होते.

माझं सौभाग्य या नावावरून अख्खा चित्रपट मीमवर्दी असावा असं वाटत़य.
विक्रम गोखले, आताच्या जिजाऊ, विजयेंद्र घाटगे, श्रीयुत वाड असे कलाकार आहेत.
मृणाल कुलकर्णीला मेकप नाही किंवा मेकप करून फिकट केलीय.
मला गीतकार कोण हे शोधायचं होतं म्हणून सुरुवातीची पाचदहा मिनिटं पाहिला.

अनु, फारेण्डसोबत मीमसाठी collab करा. तो आयडिया देईल. तुम्ही मीम बनवा.

मी अनु, पाहिले गाणे.
महाराष्ट्र व्यापार, चित्रपट क्षेत्रात मागे का? महत्वाचे कारण म्हणजे करंटा प्रेक्षक.
त्याला अय्ययो सुकू सुकूम उय्यमा उय्यमा उय्यमा अशी किंवा सुनील शेट्टी नामक नृत्यनिपुण अभिनयसम्राटाची अनेक अर्थहीन शब्दांची गाणी खटकणार नाहीत, पण गुळासोबत येणारा तीळ हा अर्थपूर्ण शब्द खटकतो, अशा प्रेक्षकांच्या जोरावर कुठलीच चित्रपटसृष्टी तग धरून राहू शकत नाही.

लु. प. पांडदेशे
(ता.क. : गाणे सुरू होण्याआधीच्या मिटींगमधले महत्वाचे मिनटस पेण्टॅक्स कॅमर्‍याने टिपणारा फोटोग्राफर टकलावरून ओळखण्यात आलेला आहे,)

माझं सौभाग्य
रामचंद्र सडेकर या त्या काळी गाजलेल्या लेखकांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित चित्रपट
पिक्चर रिलीज झाल्यानंतर लायब्ररीत कादंबरी साठी नंबर लावावे लागत होते
जवळपास 450-500 पानांची कादंबरी होती
अगदी हौसेने वाचली होती
आज मात्र पाच पानं तरी वाचेन की नाही शंका आहे

ते साहेब(आदराने बरं का) फार डोक्याला ताप इमोशनल कांदबरी लिहायचे.हमखास 10 चमचे अश्रू गाळून रडलंच पाहिजे.त्यावेळी सरकारी लायब्ररी ची आईबाबांना फी कमी असल्याने त्यांच्या सगळ्या कादंबरी वाचल्यात. एक रिंकू पाटील कांडावर पण होती ज्यात खुन्याला ग्लोरिफाय केलं होतं.
एक लग्नापूर्वी एका टपोरी प्रियकराचं बाळ होऊन तिचा लग्न करून सांभाळ करणाऱ्या सालस मुलाची गोष्ट होती.

मराठी मालिकातले दिव्य स्त्री पुरूष सकाळि उठून ब्रश करताना, परसाकडे जातानाही दागदागिने, भरजरी शालू / रेशमी झब्बे, फेटा या अवतारातच जात असतील ना?

Pages