गंमतखेळ - मराठी चित्रपट आणि मालिकांवर मीम्स

Submitted by संयोजक on 13 September, 2026 - 01:29

नमस्कार मायबोलीकर मंडळी!

ज्या उत्कटतेने तुम्ही गणेशोत्सवाची वाट पाहतो होता, त्याच उत्कटतेने तुम्ही वर्षभर या धाग्याची वाट पाहत होता, हे त्या गणरायानचे आम्हांला सांगितलं.

यंदा मीम्ससाठी विषय आहे मराठी चित्रपट आणि मराठी मालिका.

काही काही मराठी चित्रपट आणि मराठी मालिका यांचे पिसे मायबोलीकरांना अधूनमधून लागत असते आणि मग तुम्ही काय करता?

तेच इथे करायचे आहे मीम्सच्या रूपात.

मीम्स तयार करताना काही गोष्टी लक्षात ठेवू.

१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
४. हा गंमतखेळ झब्बूसारखा खेळायचा. एक मायबोलीकर कितीही मीम्स देऊ शकतो. पण सलग दोन मीम नाही. एक मीम दिल्यावर थोडा धीर धरायचा आहे. अन्य कोणी मीम द्यायची वाट पाहायची आहे.

चला तर! बसूया मीम्सच्या बुलेट ट्रेनमध्ये!

गणपतीबाप्पा मोरया!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपट ओळखा, हे कुठे जाताहेत ते सांगा आणि अख्खं ड्रोन एक दिवसासाठी फुकट तुमचं.>> सतीच वाण. सोमनाथ ला चालली आहे आ का आणि तिचे वाण.

हा धागा ओस पडलाय!
शोनाहो!

महाराजांवरच्या चित्रपटांची फॅक्टरी प्रॉडक्शन लाइन, त्यातले भॉ करून शत्रूसैन्याला घाबरवणारे मावळे, चरित्रपट , शेंगदाणा लाडूची भूमिका असलेला चित्रपट, हे कमी पडलं तर आका, सुबो, दाकों , स्वजो, सता यांना लावा कामाला.

मीम्सचा विषय नीट कळला नाही. मराठी चित्रपट/ मालिकांची पिसे काढणारे मीम्स करायचेत की मराठी चित्रपट मालिका वापरून माबोकरांची पिसे काढायची आहेत? बहुतांश मीम्स दुसर्‍या प्रकारचे वाटले. पण सूचनांवरून पहिला प्रकार अपेक्षित आहे असं वाटलं आणि अमितवचा एक मीम फक्त त्यानुसार वाटला. संयोजक कृपया उलगडा करावा. (“काहीही चालेल” - हे अपेक्षित नसावं ही अपेक्षा)

संपादनः भरत यांचे मीम्स पण पहिल्या प्रकारात मोडतात

मराठी चित्रपट/ मालिकांची पिसे काढणारे मीम्स करायचेत>> हो हाच विषय आहे पण आम्ही थोडं स्खलनस्वातंत्र्य घेतलं आहे.

Pages