80's Look हा ट्रेंड गेल्या दोन-तीन दिवसांत सोशल मीडियावर इतका वायरल झालाय की वाटतंय आपण पुन्हा 80's मध्येच पोहोचलो की काय 
गंमत म्हणजे या ट्रेंडमध्ये Gen Z आणि Gen Alpha पेक्षा आपली Millennials आणि Gen X पब्लिक जास्त उत्साहाने उतरली आहेत. अर्थातच, ज्यांनी तो काळ पाहिलाय, त्यांनाच त्याची खरी मजा 
तेव्हाच्या आठवणी, त्या केसांच्या स्टाईल, ती मिशी… ते गॉगल… ते कपडे… आणि काही राहून गेलेल्या इच्छा!
तेव्हा जे शक्य नव्हतं, ते आता AI महाराजांच्या कृपेने अगदी सहज शक्य झालंय
हा एक 80's Look चा सॅम्पल फोटो.. बदाम बदाम बदाम

तर मी सुद्धा कालच या ट्रेंडमध्ये उडी मारली आहे.
तुम्हीही या ट्रेंडमध्ये उडी मारली असेल तर तुमचे फोटोही इथे येऊ द्या.
आणि अजून मारलेली नसेल तर मारा च्यायला..
जर हे करायचे कसे अजून माहीत नसेल तर इथेच विचारा.
तरी थोडक्यात सांगायचे झाल्यास चॅट जीपीटी वर करायचे आणि कसे करायचे हे देखील त्यालाच विचारायचे. आळस असल्यास काही प्रॉम्प्ट मी पुरवतो. पूर्ण अभ्यास करूनच धागा काढत आहे 
तर मित्रानो आणि मैत्रिणींनो,
आमंत्रणाची वाट बघू नका,
धागा विरंगुळा विभागात आहे, तर थोडा करून घ्या
80's मध्ये परत जाण्यासाठी तिकीट लागत नाही…
फक्त एक फोटो पुरतो ❤️
मला एवढ्यातच वाचायला मिळालं
मला एवढ्यातच वाचायला मिळालं की जेव्हा LLM / AI ना ट्रेन करण्यासाठी फेशियल डेटा कमी पडतो तेव्हा असे ट्रेंड फ्लोट केले जातात. मग त्यांना कमी वेळात करोडो सँपल चेहरे / फोटो / डिटेल्स मिळतात.
चेहरे तर असेही आहेत च ना डाटा
चेहरे तर असेही आहेत च ना डाटा मधे.. फेबु, इंस्टा, लिंक्ड ईन वगैरे लॉक जरी प्रोफाईल असले तरी डिपी दिसतो. आधार पण.
ऋन्मेष, वॉकींग फोटोत सेम नागार्जुन दिसत आहेस
मी ८०'ज फोटो तर करून पाहिला पण कुठे शेयर नाही केला.
मी पण
मी पण
मी पण प्रयत्न केला. प्रथम
मी पण प्रयत्न केला. प्रथम cleanup झाले. नंतर 80s फोटोसाठी असणारा फ्री प्लान लिमिट संपल्याने करता आले नाही. पण तो clean-up फोटो मला आवडला, त्यामुळे विशेष वाईट वाटले नाही.
@ देवकी, clean-up फोटो म्हणजे
@ देवकी, clean-up फोटो म्हणजे?
मृणाली फोटो अगदी 80s vibe आला
मृणाली फोटो अगदी 80s vibe आला आहे पण हा जॅकेट बघून बघून माझे डोळे दुखले आहेत.
किती तरी जणांच्या फोटो मध्ये सेम जॅकेट पाहिले आहे
हा घ्या तुम्हाला झब्बू..
कुठलाही प्रॉम्प्ट न दिल्याने माझा पहिला फोटो याच जॅकेट मध्ये होता
ऋन्मेष, वॉकींग फोटोत सेम
ऋन्मेष, वॉकींग फोटोत सेम नागार्जुन दिसत आहेस Happy >>> हो धन्यवाद
मी मागे जेव्हा फक्त मिशी ठेवायचो तेव्हा हेअर स्टाईल सुद्धा साधारण तशीच असल्याने बरेच जण मला नागार्जुन म्हणायचे. ते छान वाटायचं कारण आमच्या लहानपणी त्याच्या शिवा कॅरेक्टरचा एक वेगळाच फॅन क्लब होता.
अर्थात पर्सनॅलिटी मध्ये मार खायचो. पण एआय ती कमतरता भरून काढतो
पण हा जॅकेट बघून बघून माझे
पण हा जॅकेट बघून बघून माझे डोळे दुखले आहेत.>>>>> सेम पिंच.. माझा पण हा पहिला फोटो
देवकी, clean-up फोटो म्हणजे?.
देवकी, clean-up फोटो म्हणजे?... सॉरी clean-up image hote.Chat gptne मला क्लीन अप इमेजचा पर्याय विचारला मी हो म्हटले. आधीचा फोटो बराच ठसठशीत करून पाठवला.
मायबोली गणेशोत्सव २०२६
उपक्रम व स्पर्धांची सूची
Pages