ऋतू बरवा

Submitted by दत्तात्रय साळुंके on 11 September, 2026 - 01:05

डोंगर काठाडी पाऊस आला

झाकले डोंगर झाकले मांगर
काजळ पखरण आभाळभर
व्हळात ओंकार ध्वनी नादला

घर कौलारू धारात न्हाले
अंग अंग त्याचे शहारले
लपेटून घेई धुकट शेला

तडम तड तड तडम तड तड
कौलांवरती ताशा तडाडं
पन्हाळीनंही ताल धरिला

रेशीम धारांची लगबग कोण
गावं शिवारं घेती व्यापून
शगुणाचे कुंकू गावागावाला

हर्षले डोंगर हर्षली झाडे
रानावनाला हिरवे सडे
ऋतू बरवा बहराशी आला

थिरकले अंबर अन गोकुळ
गोवर्धन अन् यमुना जळ
मुरली धून रानावनाला
© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली.
ह्या वृत्ताला म्हणजे तीन ओळींच्या वृत्ताला काय म्हणतात?

ए आय उवाच - तीन ओळींच्या वृत्ताला (काव्यप्रकाराला) 'त्रिपादी' किंवा मराठी साहित्यात प्रामुख्याने 'ओवी' असे म्हणतात
---------
उत्तम कविता दसा

ओवी तीन चरणांची नसते.
ओवीमध्ये साधारणपणे चार चरण (पदे) असतात. पहिले तीन चरण लहान आणि चौथा चरण त्याहून लहान किंवा वेगळ्या लयीचा असतो. मात्र पूर्ण ओवी अत्यंत लयबद्ध / गेय असते.

चारोळी सारखे तीनोळी म्हणायचे का?
का हा दासा ह्यांनी केलेला नवीन प्रयोग आहे?

केशवकूल
रुपालीताई
सामो
बेफिकीरजी
फार‌एण्ड
अनंन्तजीं

खूप धन्यवाद

केशवजी तीन ओळींची काव्यरचना दोन प्रकारे झाली आहे.
एक मी लिहिली तशी व दुसरी सुरवातीला दोन ओळी नंतरची कडवी तीन ओळींची.

मी गुगल AI केलं तर ह्या प्रकाराला इटालियन काव्यप्रकार Terzina किंवा इटालियन हायकू असं म्हणतात हे समजलं.

हायकूची पध्दती जपान मध्ये तीन ओळीत एखादं निसर्ग दृष्य चितारण्यासाठी झाली.
हायकूत तीनच ओळी असतात आणि हायकू जपानी आहे हे सर्वश्रुत आहे. आपल्याकडे कवयत्री शिरिष पै यांनी विपुल हायकू लिहिले. हामकूत यमक नसतं.

मी लिहिलंय ते हायकू नाही. तसं अनेक प्रसिद्ध कविंनी लिहिले आहे. या पैकी पाडगावकरांची एक रचना

रडतच आलो येताना, पण हासत जावे जाताना

अंगावर आसूड विजेचे
झेलून घेती घन वर्षेचे
सार्थक झाले कोसळण्याचे, तृषित धरित्री न्हाताना...

सामो ओवीचे उदाहरण

आतां विश्वात्मके देवे | येणे वाग्यज्ञे तोषावे
तोषोनि मज द्यावे| पसायदान हे ||१||

दसा
हे माझ्यासाठी नवीन होते.
समजाऊन सांगितल्या बद्दल आभार!