Submitted by संयोजक on 7 September, 2026 - 11:58

आमच्या घरचा बाप्पा
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
नमस्कार मायबोलीकर.
ज्या क्षणाची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आला आहे.
आपल्या लाडक्या गणरायाचे ढोल-ताशा, टाळ-मृदुंगाच्या आवाजात दमदार आगमन झालेले आहे.
आपल्या मायबोलीवरदेखील गणपतीबाप्पाची प्रतिष्ठापना झालेली आहे.
तुम्हां सगळ्यांकडे सुद्धा बाप्पा थाटात विराजमान झाले असतील ना?
मग पाठवा लगेच तुमच्या घरातील बाप्पांचे, मखराचे, सुंदर सजावटीचे फोटो.
तसेच तुमची यंदाची सजावट काही वेगळी असल्यास त्याबद्दल नक्की लिहा.
मग वाट कसली बघताय, घ्या मोबाईल, करा क्लिक आणि द्या इथे फोटो.
गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळ्यात छान धागा. मी वर्षभर
सगळ्यात छान धागा. मी वर्षभर वाट बघते. सगळे बाप्पा आणि मखर उत्तम आहेत.
आमचा यंदाचा बाप्पा..
आमचा यंदाचा बाप्पा..

सर्व अष्टविनायक मीच घरी बनवले आहेत.
… गणरायाचं रुप प्रत्येकाकडे
… गणरायाचं रुप प्रत्येकाकडे वेगळं पण प्रत्येक रुप सुंदर दिसतं….
+ १
खूप सुंदर प्रसन्नवदन गणपती बाप्पा आणि सजावटी 👌
जुई आहाहा.
जुई आहाहा.
सुरेख मूर्ती आणि आराशी आहेत.
सुरेख मूर्ती आणि आराशी आहेत.
गणपती उत्सवात गणपतीच्या मूर्ती आणि आरास बघणे फार आवडते.
दादा कडच्या महालक्ष्मी !
दादा कडच्या महालक्ष्मी !

माझ्या भावाकडच्या महालक्ष्मी
माझ्या भावाकडच्या महालक्ष्मी
जुई, आमच्या घरी गेल्यावर्षी
जुई, आमच्या घरी गेल्यावर्षी ही थीम होती
सर्वांकडचे गणपती, गौरी आरास
सर्वांकडचे गणपती, गौरी आरास मस्तच आहेत.
आमच्या गौरी . .
आमच्या गौरी



.
.
ऋतुराज वाह!
ऋतुराज वाह!
प्राजक्ता, स्निग्धा आवडल्या गौरी.
ऋतुराज, किती सुंदर आहेत
ऋतुराज, किती सुंदर आहेत तुमच्याकडील गौरी
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!
यावेळचे डेकोरेशन - डिस्पोजेबल कप्सची झाकणे वापरून केलेली फुलांची परडी. एका लेयर मधे साधारण ३० आणि एकावर एक अशा २१ लेयर्स - इतकी झाकणे वापरली आहेत. त्यातली बरीचशी आमच्याकडे न वापरलेली होतीच. फक्त थोडी आवर्जून आणली. सर्वात वरती कापसाची एक लडी आहे. हॅण्डल म्हणून इथे स्टायरोफोमची फोम नूडल/पूल नूड्ल मिळतात ती दोन सगळीकडून तासून परडीच्या प्रमाणात लहान करून त्यावर दोरी गुंडाळून चिकटवली आहेत. परडीचा आकार लंबगोलाकृती आहे. पुढे जसा दिसतो तसा मागेही आहे. झाकणे एकावर एक बसवताना ग्लू वापरून चिकटवली आहेत आणि आडवी एकमेकांना पेपर मॅशे वापरून. डिंक/खळ वाळल्यावर ती व्यवस्थित राहिली. सुमारे ५-६ आठवडे अधूनमधून एकेक लेयर लावत गेलो. साधारण ३०-४० मिनिटे लागली एकेका लेयरला. यात कौशल्याचे काम म्हणजे ती नाजूकपणे रचत जाणे, झाकणांना डिंक लावता येईल असा पृष्ठभाग कमी असल्याने ती व्यवस्थित लावणे आणि मधल्या काही लेयर्स आत नेणे, तर काही बाहेर आणणे.
लेयर लावत होतो तोपर्यंत नक्की कशी दिसणार आहे याचा अंदाज येत नव्हता. पण रंगवल्यानंतर लगेच परडी वाटू लागली. या थीम बरोबर शोभेल अशी बालगणेशाची मुर्तीही आम्हाला मिळाली
या परडीमधे आत एक भरीव बॉक्स ठेवून त्यावर चौरंग आणि त्यावर मुर्ती ठेवली या लेव्हला वर असावी म्हणून.
वाह काय भारी.इतकी झाकणं जपून
वाह काय भारी.इतकी झाकणं जपून ठेवली हे मोठं काम.
थोडी आवर्जून आणली म्हणजे?आमच्या शनिपारा समोर 'येथे बरण्यांची झाकणे मिळतील.कृपया मूळ बरणी आणावी.' असं दुकान आहे तसं तिकडे कप पार्सल न घेता नुसत्या कप ची झाकणं मिळणारं दुकान आहे का?
व्वा मस्तच.
व्वा मस्तच.
सुंदर सजावट आणि देखणा बाळ गणेश.
एवढी झाकणं एकावर एक रचणे फार लक्षपूर्वक करायचे काम आहे.
सर्वच फोटो गौरी गणपती सुंदर
सर्वच फोटो गौरी गणपती सुंदर आहेत.
ऋतुराज, तुमच्या कडच्या ओळखू आल्या. मुखवटे लक्षात होते. खूप सुंदर आहेत.
या आमच्याकडच्या महालक्ष्या -

फारेंडा, सुंदर सजावट
फारेंडा, सुंदर सजावट
किती सुरेख फोटो आहेत इथे.
किती सुरेख फोटो आहेत इथे.
बाप्पा आणि गौराई / महालक्ष्मीना नमस्कार
सुंदर बाप्पा, गौरी !
सुंदर बाप्पा, गौरी !
झाकणांच्या परडीची कल्पना - सुपरलाइक 👍
फारेन्ड कल्पक आणि सुरेख
फारेन्ड कल्पक आणि सुरेख बाप्पा आरास. गणपतीची मूर्तीही फार गोंडस आहे. पट्टकन परडी उचलून गंपूला घरी न्यावेसे वाटते आहे
सर्व गणपती बाप्पा, गौरी आणि
सर्व गणपती बाप्पा, गौरी आणि सजावटी सुंदर
व्वा ... सर्वांचे बाप्पा ,
व्वा ... सर्वांचे बाप्पा , गौराई व आरास खूप सुंदर...
अस्मिता गौरी सुरेख गं.
अस्मिता गौरी सुरेख गं.
....एवढी झाकणं एकावर एक रचणे
....एवढी झाकणं एकावर एक रचणे फार लक्षपूर्वक करायचे काम आहे....
अगदी खरे... खूप सुंदर झाले आहे झाकणांची परडी बनवणे... सुंदर
WhatsApp Image 2026-10-03 at
WhatsApp Image 2026-10-03 at 17.29.33.jpeg (160.23 KB)
Pages