निवडुंगांची सद्दी

Submitted by अनन्त्_यात्री on 7 September, 2026 - 01:37

निवडुंगांची सद्दी, सुकला सोन्याचा पिंपळ
भ्रमास किनखापी अंगरखा, सत्य नग्न, बेहाल
जलपर्णी फोफावे, करपे काठावर हिर्वळ
उत्सव नुरले, उधाण उरले, मंजुळ किती गोंधळ
तर्क बिर्क खुंटीवर आता गुद्द्यांचाच सुकाळ
डी जेचा थर्थराट, फुटला मृदंग, तुटला टाळ

Group content visibility: 
Use group defaults

कसलं भारी
शेलक्या शब्दात हजामत...

खरंच भन्नाट लिहिलंय! शब्दांच्या उपरोधातून आजूबाजूचं विद्रूप वास्तव इतकं जिवंत उभं केलंय.
विशेषतः शेवटच्या ओळींनी तर अगदी फॅन्ड्री मध्ये शेवटी जब्याने समाज व्यवस्थेवर मारलेल्या दगडासारखे वाटले.

भिडणारे वास्तव...
दुर्दैवाने ज्यांना कळायला हवे तेच यात नाचत आहेत

वाह!