प्रकाशचित्रांचा झब्बू २ - जुनी नवी उपकरणे/ गॅजेट्स

Submitted by संयोजक on 6 September, 2026 - 12:38

मायबोली गणेशोत्सव २०२६ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू

आजचा विषय आहे जुनी नवी उपकरणे/ गॅजेट्स

t12.jpg

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.

१. ही स्पर्धा नसून हा खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुना रेडीओ. मी सतत ऐकते. रेडिओचा चार्म यु ट्युबला नाही. त्यात जे 'सरप्राईझ' एलिमेंट असते ते. वॉलनट वुड आहे. जुना आहे. सेकंड हॅन्ड विकत घेतला आणि तरी महाग होता.
.

थॅ़क्स जाई. तबकडी प्लेअर (टर्न टेबल) ही आहे. ते नवर्‍याचे. तो फोटो टाकेन. आम्हा दोघांना गाणे आवडते. फरक हा आहे की ही इज ऑडिओफिल (त्याला आवाजाचे अप्रुप) तर मला गाण्यातील काव्याचे.

भारत पाकिस्तानच्या १९६५च्या युद्धात शूर भारतीय सैनीकीनांनी ताब्यात घेतलेली पाकिस्तानची

"गाडी"
Jeep.JPG

त.टी.: फोटो काढला तेव्हा तो सेपिया टोन मध्येच असल्याने तसाच इथे देत आहे

Pages