जगाने जरी टाकली कात आहे

Submitted by Sanketatedu on 5 September, 2026 - 00:11

जगाने जरी टाकली कात आहे
तरी आग ही लावते जात आहे

कशाला धरावी तिची मोहमाया
तिचे लाभणे पाशवी घात आहे

गुलामी व्यवस्था कुणी पोसली ही
कुणी घेतला हा तिचा लाभ आहे

विचारू नका कोणती जात माझी
मला फक्त माणूस ध्यानात आहे

जसे बाटले पावित्र्य माणसाचे
तशी दैवते सोसती भार आहे

- संकेत महाजन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults