'चालू घडामोडी' ह्या सदरात धागा निर्माण करू शकलो नाही.
=====
नेपाळमधील फोटो, व्हिडीओ सगळ्यांनी पाहिले असावेत. क्षणार्धात होत्याचे नव्हते होताना दिसत आहे. असेही उडत उडत कोठेतरी वाचले की चीनने काहीतरी जाणूनबुजून केले. खरे खोटे माहीत नाही. पुराचे परिणाम बिहारपर्यंत पोचले आहेत. अश्या संकटसमयी काही दुष्प्रवृत्ती उफाळून येऊ शकतात. निसर्गाच्या रौद्र रूपाचा गैरफायदा घेऊन लुटालूट होऊ शकते.
बसेस, ट्रक, मोटारी वाहून चालल्या होत्या. एक पूलही वाहून गेला. भारताचे शंभरएक पर्यटक संपर्काच्या बाहेर असल्याचे समजते. १५७ माणसे मेली असे कळले. भारताने शक्य ती मदत पुरवण्याचे आश्वासन दिले.
कोल्हापूरमधील पंचगंगा नदीच्या पुरात काय वाताहत झाली होती ते स्वतःच्या डोळ्यांनी बघूनच मी हादरलो होतो. ती बाब किरकोळ वाटावी अशी घटना नेपाळमध्ये झाली आहे.
हे का व कसे झाले आहे हे माहीत नाही म्हणून येथील त्या विषयाबाबत अधिक जाण असणाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी हा धागा काढला आहे.
अतिशय दुःखद घटना !!!!
अतिशय दुःखद घटना !!!!
पर्यावरणवादी अनेक वर्ष तिथल्या रस्ते, धरण, विद्युत प्रकल्पांबाबत धोक्याचा इशारा देत आहेत . आत्ताच्या आपत्तीचा त्याच्याशी खरंच संबंध आहे का हे माहित नाही पण जाणकार सांगू शकतील.
योगायोगाने नुकतेच एक सिडने
योगायोगाने नुकतेच एक सिडने शेल्डन चे पुस्तक वाचले. त्यात अशा घटना मानव निर्मित दाखवल्या आहेत, उच्च तंत्राच्या सहाय्याने.
देवभूमी म्हणवणाऱ्या उत्तराखंड
देवभूमी म्हणवणाऱ्या उत्तराखंड मध्ये देखील निसर्गाने आपला हिसका दाखवला होता. विकासाच्या नावाखाली अमर्यादित वृक्षतोड, नदीचे प्रवाह अडवणे/वळवणे, बांधकामांना दिलेली अविचारी परवानगी ... अशी अनेक कारणे असू शकतात.
तिबेटमध्ये एक ग्लेशियर तुटला आणि त्यामुळे नेपाळमध्ये.ही स्थिती उद्भवली असेही वाचनात आले. पण घटना दुर्दैवी आहे!
>>हे का व कसे झाले >>
>>हे का व कसे झाले >>
>>अशा घटना मानव निर्मित दाखवल्या आहेत,>>
>>बांधकामांना दिलेली अविचारी परवानगी ..>>
बरोबर.
१.नेपाळ काय किंवा इकडे उत्तराखंड, हिमाचलप्रदेशात नदीच्या पात्रांत इमारती( हॉटेले) बांधली आहेत वाढत्या पर्यटकांच्या { सोयीसाठी}!.
२. ज्या भागांत पूर्वी वर्षभरांत वीस ते चाळीस सेंटीमीटर पाऊस होतो तिथे अचानक एका दिवसांत पन्नास- साठ सेंटीमीटर पाऊस पडतो. मोठा अनपेक्षित लोंढा येतो. ( उदा तिबेट, इकडे गुजरात.)
३. बर्फ वितळत आहे, मोठा कडा कोसळतो.
माझा वर्गमित्र आणि त्याची
माझा वर्गमित्र आणि त्याची बायको असे दोघेजण नेपाळच्या या पुरात बेपत्ता झाले आहेत, असे कॉलेजच्या मित्रांकडून आजच कळले. अगदी माहितीतली जवळची व्यक्ती अशी गायब होणे, असा हा पहिलाच अनुभव आहे. खरंच धक्कादायक
पूर आणि झालेल्या विध्वंसाची
पूर आणि झालेल्या विध्वंसाची दृश्ये खरेच हादरवणारी आहेत. मृतांचा आणि बेपत्ता लोकांचा खरा आकडा फार मोठा (काही हजार) असण्याची शक्यता आहे, authorities आकडे कमी सांगत असाव्यात अशी दाट शक्यता.
तसाही नेपाळचा तो भाग फार विपन्न आहे - त्यात हा दुष्काळात तेरावा महीना. गरीबी में गीला आटा. So sad. 😢
दु:खद आणि भयंकर घटना आहे.
दु:खद आणि भयंकर घटना आहे. निसर्ग जेव्हा रुद्रावतार धारण करतो तेव्हा ....... माणसाचा अहंकार पार चुरगाळून टाकू शकतो.
काही हजार) असण्याची शक्यता
काही हजार) असण्याची शक्यता आहे.>>> नक्कीच.
मला एक प्रश्न पडतोय, इतक्या विस्तृत प्रदेशात साचलेला गाळ/चिखल ( काही काही ठिकाणी १०-१५ फूट) उपसणार कसा?
गिरीश कुबेरांनी अशा भीषण दु
गिरीश कुबेरांनी अशा भीषण दु:खद प्रसंगी लोकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे उदात्त काम केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
ते म्हणतातः
हा सगळ प्रदेश मंदिरांचा. त्यामुळे रग्गड यात्रा आणि यात्रेकरू. त्यातील अनेक जण यात अडकलेले दिसतात. भारतातील कुण्या एका सद्गुरूचे अनुयायीही यात मोठ्या संख्येने अडकल्याचे वृत्त आहे.
(लक्षात घ्या कुण्या एका सद्गूरूचे, म्हणजे किती अफाट आदर दाखवला आहे कुबेराने! त्यांचे नाव घेण्याइतकेही सौजन्य नाही.)
आपल्या दुसर्या एका सद्गुरूने पर्यावरणास खुंटीवर टांगत नदीपात्रात आपल्यतील दिव्य अनुभुतीचा साक्षात्कार भगत गणास घडवला. तथापि त्या आध्यात्मिक गुरुमुळे काही पर्यावरण र्हास झाला नसल्याचा निर्वाळा संबंधितांनी दिला.
(दुसर्या कुणा गुरूचा, त्याच्या नदीपात्रात शिरण्याचा इथे काय संबंध? कुबेरच जाणे!)
दुसर्या एका सद्गुरूचे भक्तगण या नेपाळच्या दुर्घटनेत अडकल्याचे कळते. आपल्या आध्यात्मिक ताकदीने हे सद्गुरू त्यांची निस्चित सुटका करतील. खरे तर गुरुच्या ठायीच ब्रह्मा, गुरु म्हणजेच विष्णू इत्यादि असताना या सद्गुरुच्या भक्तांस नेपाळात वणवण करायची गरज नव्हती असो.
(किती वाईट, कोती वृत्ती आहे. हे सगळे लोक मृत असण्याची शक्यता आहे. अनपेक्षित नैसर्गिक आपत्ती येऊन ते मरण पावले तर जायची काय गरज होती. गुरू, त्यावर असणारी श्रद्धा असली शेरेबाजी करण्याची ही वेळ आहे का? बिचार्यांची प्रेते देखील मिळाली नसताना त्यांची टिंगल करून काय मिळते? मक्केच्या हज यात्रेत काही अपघात होऊन काही यात्रेकरू दगावले तर असे म्हणतील का की अल्ला सगळीकडे आहे तर मक्केला वणवण करत का गेले? )
असो. या संकटातून सर्व सुखरुप येवोत ही भावना सर्वांचीच आहे.
(नाईलाजाने शेवटी एक वाक्य जिथे ते सुखरूप असावे अशी इच्छा पाटी टाकल्यासारखी व्यक्त केली आहे)
इतका हीन पातळीवर उतरणारा संपादक ( संज्या राऊत सोडला तर) कुणी आठवत नाही.
या संकटातून सर्व सुखरुप येवोत
या संकटातून सर्व सुखरुप येवोत ही भावना सर्वांचीच आहे. >> +१
बाकी त्या नतद्रष्ट संपादकांच्या नादी न लागलेलेच बरे.
गाळ/चिखल ( काही काही ठिकाणी १०-१५ फूट) उपसणार कसा? >>
माझ्या मते तर नाहीच उपसू शकणार. कुणी गाळात अडकले आहे, अशी खात्री असेल तर शोध घेण्यासाठी प्रयत्न करतील, अन्यथा इतक्या गाळात शोध घेणेसुद्धा खूप कठीण आहे.
हिन पातळी कशी काय? हा जो कोणी
हिन पातळी कशी काय? हा जो कोणी सद्गुरू असेल तर त्याने आपल्या भक्तांची सुखरूप सुटका करावीच की.