एकच डीपी कायम ठेवणाऱ्यांचा स्वभाव

Submitted by Madan Hunkare on 7 August, 2026 - 07:14

वर्षानुवर्षे अजिबात डीपी न बदलणे चांगले कि वाईट?
एकदा डीपी लावल्यावर तो कधीच न बदलणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव / व्यक्तिमत्त्व कसे असेल असे तुम्हाला वाटते?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजिबात डीपी न लावणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव / व्यक्तिमत्त्व कसे असेल असे तुम्हाला वाटते?

मला हा डीपी फंडाच कधी समजला नाही. कश्याला आपला फोटो आपल्या अकाउंटवर ठेवायचा. लोकांना दाखवायचा. आपण त्यांचा बघायचा. काय लॉजिक आहे यामागे कधीच कळले नाही. सवयीने एक फॅसिलिटी आहे ती वापरली नाही तर आपले नुकसान होईल या विचाराने वापरली जाते इतकेच.

हा धागा बघितल्यावर मी माझा dp कोणता आहे बघितले. पार विसरून गेले होते. फोन सतत हातात असला तरी dp बघण्याचे/ बदलण्याचे कधी लक्षातच येत नाही.
क्वचित कधीतरी स्वतः: चा एखादा बरा फोटो आला आहे असं वाटलं आणि लक्षात आलं तर बदलल्या जातो dp आणि नंतर लगेच विसरल्याही जातो.

अरे DP लावणे- न लावणे- बदलणे- न बदलणे यामागे तर लोकांना लेबलं चिकटवण्याचा मोठ्ठा कारभार आहे आजकाल.

१} स्वत:च्या चेहऱ्याचा डीपी न लावणारे =

कुरूप असेल, लठ्ठ असेल, केस उडून टक्कल पडलं असेल म्हणून डीपी फुलापानांचे लावतो/ते.

२} स्वत:च्या चेहऱ्याचा डीपी लावणारे =

माय लाइफ ईज ओपन बुक, आपण कसे मोकळेपणाने वागतो, ओळख लपवत नाही वगैरेबद्दल अभिमान

३} स्वत:च्या चेहऱ्याचा डीपी लावणारे आणि तो वारंवार बदलणारे =

Hungry for validation and appreciation, स्वप्रतिमेच्या प्रेमात असलेली narcissistic व्यक्ती. हे लोक कुणी कुणी आपल्या डीपीवर लाइक्स दिलेत ते दर तासाला मोजतात म्हणे.

४} स्वत:च्या चेहऱ्याचा डीपी लावणारे पण spouse सोबत डीपी कधीही न लावणारे =

पटत नसेल त्यांचं. सोडून गेली/गेला असेल. डिव्होर्स झालाय का कोण जाणे.. आणि प्रत्यक्ष भेटीत त्याची आडून आडून चौकशी Lol

५} नेहेमी ग्रूप फोटो किंवा पार्टी फोटो डीपीला ठेवणारे =

Show offish. मी किती पॉपुलर आहे बघा !

६} celebrities सोबतचे स्वत:चे फोटो डीपी ठेवणारे =

परप्रकाशित wannabe सिलेब्रिटी. सारखं मला किती मोठे लोक ओळखतात, मी किती भारी हे दाखवायची गरज असलेली व्यक्ती.

७} जगत्प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या background ला काढलेले फोटो डीपी ठेवणारे =

फुकट कूल असल्याचे दाखवणारे, पैश्याचा शो ऑफ करणारे, प्रसिद्धीला हापापलेले वगैरे (इथे कुणाला खरोखर फिरण्याची आवड असू शकते ही शक्यता अजिबात कंसिडर करायची नाही Happy )

८} एकच डीपी वर्ष वर्ष ठेवणारे =

बोअर, आळशी

(वि सू : ही माझी मते नाहीत, असे अन्य लोकांना बोलतांना ऐकले आहे म्हणून लिहिले. क्लियर केलेले बरे Happy )

अजूनही असतात असे judgements. आठवा तुम्हीच.

… ए आय वापरून बनवलेला डी पी ..

हो ते एक राहिलंच.

जेन झी पब्लिक डीपीवर खूप काम करतं. एकाचाही चेहेरा स्पष्ट दिसत नाही. चेहऱ्यावर केस, बटा, जटा, हात, बोटं, टोपी, फोन, सावली असं काहीतरी आणून चेहरा झाकलेला DP शेकडा ९५ जणांचा असतो.

बाकी सारं दिसतंय पण चेहरा झाकलेला, ही त्यांची मला सर्वात आवडलेली आयडिया आहे. नाहीतर आजवर इनबॉक्स बंद, प्रोफाइल लॉक्ड, ब्लू टिक बंद, असे नाना उद्योग चालायचे.
मला हे लोक माझ्यासारखेच वाटतात. आवडतात. त्याचं मुख्य करण किसिको घुटणोपे लाके रख दिया हेही असेल कदाचित Proud

कोण बोलतय बघा Lol>>> Lol मी पण तेच म्हणणार होते..
पण आहे ती फॅसिलिटी नाही वापरली तर नुकसान होईल हे उत्तर पुढं आल्याने नाही म्हणाले Lol

कुठला डी. पी. ठेवला आहे त्यावर लैच काही अवलंबून असेल

images (40).jpeg

हा असेल तर काही खास वाटणार नाही, आपल्या आपल्यात मस्त असणार एखाद प्राणी, भूतलावर आनंदी असणारा एक दुर्मीळ जीव वाटेल.

images (41).jpeg

हा डी. पी. ठेवला असेल तर मात्र विचार करावा लागेल क्षणभर थांबून शांतपणे ! हा व्यक्ती एकदम गहिरे अथांग पाणी, जबरदस्त डेंजर इत्यादी वाटू शकतो (मला तरी)