Submitted by सिद्धेश्वर विला... on 5 August, 2026 - 08:45
सुवाच्च्य अक्षरांच्या संगमात
एकदा अंघोळ केली होती
अंगावर चिखल उडाला
अलंकारिक शिवी दिली होती
मनाचे गटार तुडुंब भरले
शब्द कोपऱ्यात पडलेले
अलंकार नेसून बाहेर आले
तरीही परत धडपडलेले
तलम, मुलायम ते शब्द सारे
दुसऱ्याला स्पर्शून हरवले
आरशातल्या त्या प्रतिमेसारखे
माझ्याकडेच पुन्हा वळले
मळमळ वाढत चालली होती
साथ देईना जिव्हाही
घराण्याचा उध्दार झाला
मन शांत होई तेव्हा
अहाहा, उहूहूहू एकदम शांत
अथांग सागर उसळलेला
एका शब्दाच्या सत्याने
वणवा अलंकारिक विझलेला
मी पण तसाच हरवलेला
शब्दांमध्ये गुंतलेला
मला राहू द्या तसेच इथे
भावनांतच अडकलेला
जे दिसेल ते लिहीत जाईन
ना मुखवटा, ना दिखावा
शब्दांच्या या पाट्यांमधून
पाझरत जाईल लाव्हा
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults