जीवन गाणे

Submitted by Meghvalli on 5 August, 2026 - 07:06

जीवन गाणे...
व्हावे...
गातच येणे...
गातच जाणे...

या धरेवर...
न जाणे कितीदा...
झाले येणे-जाणे...

जीवन गाणे...
व्हावे...
गातच येणे...
गातच जाणे...

नव्या जन्माचे...
नवेच गाणे...
क्षितिजापलीकडून...
नवे सूर अन् नवे तराणे...

जीवन गाणे...
व्हावे...
गातच येणे...
गातच जाणे...

गाणे तुझे नि माझे गाणे...
मिळून गाऊ आपुले गाणे...
कोण जाणे, भेट पुन्हा कधी...
अन् कधी अचानक...
निघून जाणे...

जीवन गाणे...
व्हावे...
गातच येणे...
गातच जाणे...

बुधवार, ५/८/२६ , ४:२५ PM
अजय सरदेसाई -मेघ

Group content visibility: 
Public - accessible to all site users