भोपळी मिर्ची + टोमॅटो+ ट्युना + कोळंबी

Submitted by सामो on 1 August, 2026 - 12:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ मोठ्ठ्या भोपळी मिर्ची + १ मध्यमाकारी कांदा + ३ टोमॅटो + २ लहानसे कॅन ट्युना + १ ते दीड वाटी कोळंबी + आले-लसूण पेस्ट + गूळ + ऑयस्टर सॉस (ऐच्छिक) + तिखट + धणे-जीरे पूड + हळद + हिंग

क्रमवार पाककृती: 

(१) कढईत तेल घालून त्यात फोडणी देणे
(२) चिरलेला कांदा आणि आलं-लसूण पेस्ट नीट परतणे
(३) बारीक चिरलेली भोपळी मिरची त्यावर घालून मीठ घालून झाकून शिजवत ठेवणे. होय मीठ घालायचे कारण आपल्याला ती भोपळी मिर्ची अगदी मऊ करायची आहे. मीठामुळे पाणी सुटुन ती छान शिजते.
(४) वीस ते पंचवीस मिनीटांनी झाकण काढुन, मिर्ची नीट शिजलेली आहे का बघुन, शिवाय उलथण्याने ठेचणे. मॅश करायची आहे पण अगदी पेस्ट नको.
(५) आता टोमॅटॉ + गूळ +धणे-जीरे पूड + तिखट + हळद + हिंग घालून परत सगळं शिजवत ठेवायचे.
(६) कोळंबी + ट्युना घालून परत झाकण ठेवणे. मी मोठी कोळंबी कापून घेते. जशीच्या तशी ढब्बी घालत नाही.
(६) ते सर्व मस्त एकजीव शिजले की ऑयस्टर सॉस घालून परत दणदणीत वाफ काढायची.
(७) आता लगेच वाढायला घ्यायचे नाही. दहा-पंधरा मिनीटे झाकण ठेउन वाट पहायची. सर्व चवी छान मिळून येतात.

एकंदर शिजवणे प्रकार खूप. सर्व एकजीव तर करायचय पण अगदी पेस्ट नको. आम्हाला ही डिश भयंकर आवडते. गरम भाता वरती हे सॉस(भाजी) मस्त लागते एकदम.

वाढणी/प्रमाण: 
४ जण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे रेसिपी, तेवढा गुळ सोडून.
पण करणार नाही.
कोळंबी घरात आली की कोळंबी+ बटाटा रस्सा / खिचडी करण्यात संपून जाते.

गूळ हवाच. तुम्हाला चीन्यांचं स्वीट & सावर चालतं ना? डक सॉस चालतं ना?

शर्मिला गूळ शक्यतो स्किप करु नकोस. आंबट गोड अशी सुरेख भाजी बनते. मी तर जी फोडणी घालते त्यात मेथ्याही आहे त्यामुळे आपोआप कडू चवही जाते पोटात.
बाकी तुझी मर्जी.