Submitted by Meghvalli on 28 July, 2026 - 08:48

माझी एक झुंज वाऱ्याशी,
जो उडवू पाहतोय सर्वस्व।
एक झुंज माझ्या मनाशी,
जे जडून राहतं हट्टाशी॥
एक झुंज या काळाशी,
जो थांबत कधीच नाही।
एक झुंज माझ्या स्वप्नांशी,
जी झंझावातात विझून जातात॥
एक झुंज माझ्या अश्रूंशी,
जे डोळ्यांबाहेर पडू पाहतात।
एक झुंज माझ्या स्मिताशी,
जे दुःखात हरवून जातात॥
एक झुंज नियतीशी,
जी रोज नवा डाव मांडते।
एक झुंज माझ्या धैर्याशी,
जे हरूनही पुन्हा उभं राहतं॥
जगतो आहे मी हे आयुष्य,
पण जगणं इतकं सोपं नाही।
जगण्यासाठी रोज झुंजावं लागतं
आयुष्याशीच — दुसरं काही नाही॥
या झुंजींच्या वाटेवर,
मीच माझा सखा ठरलो।
हार कितीही समोर आली,
तरी लढतच राहिलो॥
सोमवार, २७/७/२०२६ , ११:५० AM
अजय सरदेसाई -मेघ
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा